‘आधी मित्र बनू कि प्रियकर? :P ’

प्रेम अनोळखी व्यक्ती सोबत सुद्धा होतं, नुकतीच ओळख झालेल्या व्यक्तीसोबत पण होतं किंवा अगदी १० वर्ष जुनी ओळख असलेल्या व्यक्ती सोबत सुद्धा होऊ शकतं. तर यावर एक सिम्पल प्रश्न आहे, जेव्हा एखादी मुलगी प्रेमात पडते, तेव्हा तो (नशिबवान :p ) मुलगा तिचा चांगला मित्र असतो, कि नुसताच मित्र असतो, कि कोणी अनोळखी सुद्धा असू शकतो?

हा प्रश्न विचारण्यामागचा मुख्य हेतू हा कि आम्हाला बऱ्याच मुलांनी अशी शंका विचारली आहे कि ‘जेव्हा आम्ही एखाद्या मुलीला प्रपोज करतो तेव्हा तिच्या मनात नक्की काय असतं?’ कारण बरीच मुलं ‘तू तर माझा मित्र आहेस रे!’ किंवा ‘मी तर तुला ओळखत पण नाही, मग असा कसं उत्तर देऊ!’ अशा रिप्लाय ने रिजेक्ट होतात.
मुलींना मित्राच्या प्रेमात पडण आवडत कि प्रेम करून त्यात मैत्री शोधण आवडतं, कि अजून काही दुसरंच उत्तर आहे याचं! कोणाला माहित असेल तर प्लीज आपल्या भावांना मदत करा 😀 . हा प्रश्न तर मला वाटतंय ‘कोंबडी आधी कि अंड आधी’ असा आहे, म्हणजे ‘आधी मित्र बनू कि प्रियकर? 😛 ’

Facebook Comments

Related Posts

Leave a Reply