बालमित्राला २ शिव्या द्या – बरं वाटेल

जेव्हा तुम्ही वयाने आणि मनाने दोन्ही प्रकारे लहान होता, तेव्हाची हि गोष्ट असेल कदाचित. तेव्हाची तुमची निरागस मैत्री? तुमचा असा मित्र जो पावसाळ्यात तुमची हाफ चड्डी आणि हिवाळ्यात तुमचाच स्वेटर तुम्हाला न सांगता अगदी हक्काने घरी येऊन घेऊन जायचा. तुमच्या दोघांची शरीरयष्टी सारखी आहे हेच एक कारण नव्हतं त्या मागे हे हि तितकंच खरं. त्या स्वेटरमध्ये एक वेगळीच उब होती, मैत्रीची उब. तो शाळेचा शर्ट त्याच्याच शाईने खराब होण्यासाठी शिवला गेला असेल कदाचित, म्हणून कितीही खराब असला तरी अगदी तोऱ्यात तुम्ही तो वर्षभर फाटेपर्यंत वापरला.

आई-बहिणी वरून दिलेल्या आयुष्यातल्या पहिल्या शिवीची चाचणी त्याच्यावरच का झाली कुणास ठाउक. लांब लांब चालून वाटखर्चीच्या साठलेल्या २ रुपयाची ‘सुकी भेळ पार्टी’ त्याच्याच सोबत भारी का वाटली कुणास ठाउक. आयुष्यातल्या बऱ्याच पहिल्या गोष्टी तूम्ही त्याच्या सोबत केल्या. मग ते कुठल्या मुलीची खोड काढण असेल किंवा खोटं बोलल्यामुळे बाईंचा खाल्लेला मार असेल. शाळेतली १० वर्ष एकसाथ कशी गेली ते कळाल सुद्धा नाही.

वेगळ कॉलेज हे तर नुसतं निम्मित, पण मोठ झाल्यावर तुमचा तुमच्या बालमित्राशी कमी संबंध यायला सुरुवात होते. आयुष्यात इतर माणसं इतकी वाढत जातात कि त्यांना वेळ देता देता आपल्या बालमित्राला वेळ देणं राहून जातं. असं नाही कि बरीच वर्ष भेटलो नाही म्हणून आज तुमचा तुमच्या मित्रावर आधी एवढा हक्क उरलेला नाही. गोची हि होते कि त्याच्यावर हक्क दाखवणारे फक्त आपण एकटेच उरलेलो नाही हे आता कळून चुकायला लागलेलं असतं. वाढत्या वयाने आम्हाला हे अशा प्रकारे ‘समजूतदार (लाचार)’ बनवलंय हे लक्षात येतं.

कोणी नसताना तुम्ही दोघं वागतही असाल बेफिकीर, बेधुंद एकमेकांना शिव्या हासडत. पण काय आहे ना.. आजूबाजूला कोणी नाही असे मोके पण आता कमीच मिळतात. तुमच्या मित्राची ऑफिसमधली पोस्ट थोडी सिनिअर झालीय ना मग त्याला आता त्या लहानपणीच्या नावाने चिडवण बर वाटत नाही. मोठं झाल्यानंतर मित्राला शिवी देऊ वाटली किंवा चिडवू वाटलं तरी आत्तापर्यंत स्वतःला कसं आवरलंय तुम्ही समजू शकतो मी हे. आम्ही दोघं तर जगाला फसवून पहिली bating त्याची आणि दुसरी माझी असे नंबर पाडून खेळणाऱ्यातले, पण आता पुन्हा एकदा जगाला फसवून लहानपणीसारखं वागण नाही होत आहे.

वाढत्या वयासोबत मैत्रीतले हक्क कमी झाल्याची भीती वाटतीय. बोलायला मुद्दा नाहीय म्हणून मूर्ख वायफळ बडबड सुरु करायला कसं तरीच वाटतय..  मला वय वाढल्यामुळे मैत्रीतले हक्क कमी झाल्याची भीती वाटतीय. ‘बालमित्र’ ‘मोठे’ झाल्यावर असे ‘विचित्र’ का होतात यार…!

Note : हे तुझ्या अशा मित्रा सोबत शेयर कर ज्याला तुला शिव्या द्यायच्या आहेत पण नाही देता येत… कारण तुम्ही मोठे झाला आहात.. ( ऑर एल्स वी कॅन से… कारण त्याच्या गर्लफ्रेंडला तुम्ही तसं केलं तर नाही आवडत.. :p ). खाली कॉमेंट बॉक्समध्ये मित्राचं नाव आणि त्याच्यासाठी २ अमूल्य अशा शिव्या लिहा.. थोडं बरं वाटेल जीवाला  .

Related Posts

  • Reply Yogesh Vedak July 8, 2018 at 2:48 pm

    Yash…बुचकळ्या

  • Reply Sonali Sabale July 8, 2018 at 2:48 pm

    Amit kutrya bhikarya

  • Reply Sumit Satardekar July 8, 2018 at 2:49 pm

    Siddhesh Bhos……

  • Leave a Reply