टाईम बॉम्बचा स्फोट (लेखक – राहुल बोरुडे)

 दिवसेंदिवस युवा मनाची तब्येत बिघडत चालली आहे. लवकरच त्यासाठी काही केले नाही तर.. काही खैर नाही! एखाद्या ‘टाईमबॉम्ब’ सारखा हा असंतोष त्यांच्या मनात दडून राहिला आहे, त्याचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हिंदू-मुस्लिम-शीख-क्रिश्चन अशा नावांखाली एकत्र यायला भाग पाडून आपण आधी भारतीय आहोत ही भावनाच त्यांना आपण विसरण्यास भाग पाडत आहोत का? असा प्रश्न आजच्या भारतात उभा राहतो.

नाही… धर्म असेल हो महत्वाचा (ह्यावर दुमत आहे) पण तो रस्त्यावर का म्हणून आणायचा ? धर्म हा घरात जोपासायची गोष्ट वाटते मला… बाहेर तुम्ही फक्त आणि फक्त एक भारतीय असता असा माझं स्पष्ट मत आहे!

आमचा धर्म एक म्हणून आम्ही एक, ह्या पेक्षा “आमचा विचार एक” हे कारण का नाही आपल्याला मोठं वाटत? भारतीयत्व हा एक फार मोठा विचार आहे (India is a modern idea) हा विचार आपण गेले ६७ वर्ष मानाने पुढे नेला आहे… एकात्मतेसाठी संपूर्ण जग भारताकडे पाहते… ह्याचा नक्कीच आपणास अभिमान असायला हवा.

भारतीयत्व टिकवायला हवं… आणि त्यासाठी आपल्यातला मेलेला (Nationalism) भाव पुन्हा जागा करायला हवा… नाही ओ, १५ ऑगस्ट जवळ आल्यामुळे नाही असा लिहित आहे, पण मन कधी तरी अस्वस्थ झालं, कि काही खुपत असलेल्या गोष्टी बाहेर पडतात (ह्या अशा)… त्यातील ही एक म्हणून समजा.

तिथे आपल्या शेजारी, धर्माच्या नावावर पाकिस्तानने प्रयत्न केला आहे देश चालवायचा… पण आपले भवितव्य मशिदीपेक्षा संसदेत जास्त सुरक्षित आहे हे नक्कीच कळून चुकले आहे त्यांना. त्यांच्या चुकांवरून काही शिकणार आहोत कि नाही आपण? आपले भारतीयत्व फक्त भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यापुरत संकुचित नका ओ होऊ देऊ. त्याला जोपासा आणि येणाऱ्या नवीन पिढीला संस्कार रुपात देऊन टाका..

एक चांगला नागरिक बनूनही आपण खूप चांगली देशसेवा करू शकतो… ह्याची जाणीव करून घेऊ आपण. भारतीय असताना मी कर्नाटक मध्ये आहे कि उत्तर प्रदेश कि महाराष्ट्र ह्याने काहीच फरक पडत नाही… (Nationalism is a need of an hour over statism) सर्वांचा विचार एक असताना धर्म आणि राज्य ह्या गोष्टी दुय्यम ठरतात आणि भारतीयत्व तिथे जिंकते! आपण तिथे जिंकतो….देश तिथे जिंकतो…! (let us live to win) एका सुखी कुटुंबाचे (देशाचे) बरेच फायदे असतात नाही? ह्या विचारातूनच एक Champion पिढी आपल्याला तयार करायची आहे…

तर ज्या टाईम बॉम्बचा उल्लेख मी आधी केला त्याला तसाच ठेऊन त्याचा स्पोट होऊ दे मनात आणि त्या उर्जेचा वापर आपण आपल्या भारताला मोठं करण्यात केला तर नक्कीच सर्व फायद्यात राहू…(nowadayz profit-loss are SI unit of everything) म्हणून फायद्या तोट्याचा गोष्टीत समजवाव लागतं!

बापहो, स्वातंत्र्य फार मेहनतीने कमावलय ओ… इज्जत करूया त्याची… आपण स्वातंत्र्य मिळवायला काहीच दिलेलं नाही… निदान टिकवायला आणि पुढच्या पिढ्या घडवायला नक्कीच योगदान देऊ शकतो आपण, हाच एक विचार सांगावा वाटतो!

जय भारत !


राहुल बोरुडे

लिहायला वेळ नसलेले बरेच लेखकी मेंदू आपल्या आसपास वावरतात, त्यातलाच हा एक. शक्यतो अशाच विषयांवर लिहितो ज्यांवर डिबेट्स होतात (मुद्दाम-आवर्जून). www.stampmyvisa.com चा मालक. आणि अशा बऱ्याच उद्योगधंद्यांमध्ये अनुभव असलेला उद्योजक. नाशिकला कॅम्पिंगच होस्टिंग पण करतो. भेटू कधी तरी तिथे आणि डिटेलमध्ये बोलू!

Visit Facebook Profile 

Related Posts

Leave a Reply