ती सध्या काय करते..?

‘ती सध्या काय करते?’ ह्या सिनेमाचं नाव पहिल्यांदा ऐकलं कि लगेच मनात नकळत आपल्या ‘ती’ चे विचार यायला सुरुवात होते. हे विचार इतक्या सहजरित्या येऊन जातात की ते घालवण्या ऐवजी त्याच विचारांत आपण तासभर गुरफटून कधी गेलो हे कळत सुद्धा नाही.
तो लहानपणीचा कोवळ्या मिशीचा मुलगा आणि जाडजुड़ वेणी असलेली बारीक़ मुलगी कुठे कुठे फिरुन आले होते त्या ठिकाणांवर बसल्याजागी आपण जाऊन येतो. मनातल्या मनात सगळे सीक्रेट स्पॉट फिरून होतात
आणि शेवटी मनात येतो तो तोच प्रश्न ‘ती सध्या काय करते?’

ह्या valentine day ला तुम्ही तुमच्या पहिल्या प्रेमासोबत असाल तर मजाच आहे बुआ तुमची, पण पहिलं प्रेम आठवणीत साठवून हा Valentine साजरा करणाऱ्या प्रेमवीरांनी आमच्या सोबत त्यांच्या feelings शेयर करा. तुमची ‘ती’ तुमच्या सोबत नसली तरी तिची आठवण आहे ना! तिच आम्हाला सांगा. आम्ही ते तिच्या पर्यन्त पोहचवण्याचा एक निरागस प्रयत्न नक्की करू.
तुमच्या feelings खऱ्या नावानेच सांगायला हव्या असही काही नाही. अनोळखी किंवा एखाद्या लाडाच्या सीक्रेट नावाने सांगीतलत तरी चालेल. कुणास ठाऊक तुमची ‘ती’ तुम्ही ठेवलेल्या सीक्रेट लाडाच्या नावाने तुम्हाला reply पण देईल!
आणि तुमच्या feelings पाहिजे त्या व्यक्ति पर्यन्त पोहचल्या की मग हे कुठल्या पेपर मध्ये छापून येतय की मासिकात हे तुमच्यासाठी तितकस महत्वाच नसेल. तरी आवड़तील ते reply आम्ही print media मध्ये नक्कीच पब्लिश करू.

Facebook Comments

Related Posts

4 Comments

 • Reply निरंजन द. जोशी January 9, 2017 at 6:14 pm

  *ती सध्या सुखात आहे*

  हो, ती ख़रच सध्या सुखात आहे!
  नाही, मला कोणी भेटुन नाही सांगितल तस, पण मी जाणतो की आता ती कशी आहे आणि काय करते ते!

  अहो विश्वास ठेवा माझ्यावर,
  मी नाही भेटालो तिला गेल्या ४ वर्षात!
  पण तरीही सांगतो *ती सध्या सुखात आहे*

  हा याचा अर्थ मी तिला भेटायचा प्रयत्नच नाही केला अस नाही बर का, मी आमच्या *ता-टा-तू-टी*, (so called *break up*) च्या दिवसांपासून खूप प्रयत्न करतोय तिला भेटायचा पण ती आजवर तरी नाही भेटलेली.

  आमचा Break up म्हणजे काही साधा सुधा नाही बर का, एकदा ठरवल “break up के बाद” बिलकुल नाई मिलनेका, पण काय करणार मी पडलो कन्या राशीवाला त्यामुळे by default हळव मन आणि त्यात हा प्रेमविरह;
  कस सहन होणार?

  So, मी तोडल माझच (मी म्हणून तीला दिलेल) शेवटच वचन, आणि लागलो तिला शोधयला।
  गांवभर हिंडलो पण नाही भेटली हो, खुप जणांकड़े चौकशी केली,
  तेव्हा मला कोणीतरी म्हणाल,

  *मेलेली माणस पुन्हा जीवंत होत नाहीत*

  अरे हो की,

  मी ही तिच्या अंत यात्रेत तिला हेच म्हणालेलो,
  *अग तुझ तर heart तर आधीच fail झालय, त्यात उगीच आपल्या break up चा त्रास कशाला? तेव्हा, पुढच्या जन्मी करू की continue तेच जून प्रेम, पुन्हा नव्या अवतारात*!

  हा हा,

  पण ते काहीही असो;
  मला अजूनही खात्री आहे, *ती सध्या सुखात आहे*

 • Reply Anonymous January 9, 2017 at 7:15 pm

  ‘ती सध्या काय करते?’ याचा मला जास्त विचार करावा लागत नाही. कारण मला माहितीय ती काय करते. आम्ही एकाच शाळेत काम करतो सध्या. आणि आम्ही लहानपणी एकाच शाळेत शिकलो सुद्धा. आता मी आमची पूर्ण ‘जाने तू जाने ना..’ स्टोरी सांगत बसत नाही. कारण आपला मेन मुद्दा ‘ती सध्या काय करते’ हा आहे.
  मी बघितला नाहीय हा मूवी. पण जाहिरातीवरून तरी असं वाटतंय कि ‘ती’ चं कोणासोबत तरी लग्न होतं किंवा होणार आहे असं काहीसं असेल. माझी स्टोरीना.. थोडी वेगळीच आहे. नॉर्मली अशा Sad Love Stories मध्ये मुलीचं आधी लग्न होतं, पण इथे तिचं नाही माझं लग्न झालंय.!! ‘जमाना बदललाय बॉस’ हे सगळ ठीक आहे, पण आमच्या घरचे नाही बदलले, ते अजूनही २५व्या वर्षी लग्न केलं पाहिजे अशा विचाराचेच आहेत.
  कधी कधी मनात प्रश्न येतो, कि कदाचित तिच्याच मनात हा प्रश्न येत असेल कि ‘तो’ सध्या काय करतो?. कारण सध्यातरी तिच्यासाठी बनवलेलं मंगळसूत्र कुणा दुसरीच्याच गळ्यात आहे. मी तिची खबर कशी न कशी घेतोच, शेवटी आम्ही मुलं आहोत, इथून तिथून खबरी येतात ‘ती’च्या. पण माझ्या लग्नानंतर माझं तिचं बोलण जवळजवळ थांबल्यातच जमा आहे. तिला माझी हाल हवाल कशी मिळत असेल?, का ती मला विसरली असेल? हे असे नॉर्मल प्रीयाकारांना पडणारे प्रश्न मला पडतातच. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा पडतो कि ‘तिला पण असे प्रश्न पडत असतील?’.
  हा.. तिचं माहित नाही पण मी सध्या हे करतोय, ’अनोळखी व्यक्ती बनून तुमच्या प्रश्नाच उत्तर देतोय’. मनात कुठे तरी आस आहे कि तुम्ही हे तिच्यापर्यंत पोहचवाल. आणि I hope माझ्या ‘ती’ला हे समजेल कि मी तीच्या बद्धलच लिहिलंय हे सगळ. आणि नाही समजलं तरी ठीक आहे ना .. तसं ह्वायचं झालंच आहे!

 • Reply Radha January 18, 2017 at 11:16 am

  ‘ती ‘ असणंच गरजेचं आहे का ?
  ‘तो ‘ आणि ‘त्याच्या ‘ आठवणी असतील तर 🙂

  • Reply YashwantHo January 19, 2017 at 5:31 am

   चालेल कि 🙂

  Leave a Reply