think and grow rich dale carnige marathi book review

विचार करा आणि श्रीमंत व्हा!

पुस्तक तसं खूप दशकं जून आहे, पण त्यात लिहिलेल्या गोष्टी अजूनही लागू पडतात, आणि चिरंतर लागू पडत राहतील. एखादी डिग्री जशी तुमच्या सोबत आयुष्यभर राहते, तसं ह्या पुस्तकाचं सुद्धा आहे. विचार करण्याच्या पद्धतीला दिशा देऊन जाणार हे पुस्तक. (अशी पुस्तकं वाचताना मला कायम असं वाटतं कि ह्या धड्यांना शालेय अभ्यास क्रमात जागा असावी.)

एकाच बैठकीत संपेल असं हे पुस्तक नाही. वाचनाची सवय नसणाऱ्यांना काही धडे क्लिष्ट (अवघड) वाटतील, पण थोडं स्वतःला PUSH करा, म्हणजे पुस्तकाच्या शेवटी (आपोआप) खूष रहाल. स्वतःच्या विचारांना योग्य दिशा मिळाल्याचं समाधान मिळेल.

हे पुस्तक कोणी वाचावं?

सर्वांनी.  पुस्तकात काय आहे हे ह्या छोट्याश्या ब्लॉग मध्ये लिहिण अशक्य आहे. त्यात मांडलेल्या विषयांचा एक धावता आढावा खालील प्रमाणे.

इच्छाशक्ती, आत्मविश्वास, कल्पनाशक्ती ह्यांचा दिग्गज मंडळी कसा वापर करतात आणि समाजात एक अढळ स्थान कसं प्राप्त करतात ह्याची उदाहरणं तुम्हाला पहिल्या काही धड्यांमध्ये मिळतील. पुस्तकाच्या मध्यापर्यंत येण तितकस अवघड नाही. त्यातल्या लक्षवेधी किस्से-कहाण्या तुम्हाला इथवर वाचायला भाग पाडतील.

पण त्या पुढील ऑर्गनाईज्ड प्लानिंग, पावर ऑफ मास्टर माइंड हे मुद्दे थोडे समजायला किचकट आहेत (बरीच जण इथून पुढे पुस्तक वाचन थांबतात. पण आपली सहनशीलता एक लेवल वर करून हे वाचलत तर बरंच होईल.)

पुढे सेक्स सारख्या खोल विषयाला लेखक एक वेगळाच रंग देतो. तुमचा SEX ह्या विषयाकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलतो. (हा तर MUST READ धडा आहे. आणि मला लेखकाचा अभिमान वाटतो कि त्यांनी ह्या मुद्द्याचा बाऊ करून पुस्तकाच्या मार्केटिंगसाठी वापर केलेला नाही.)

Sub-conscious म्हणजेच अवचेतन मन, सिक्स्थ सेन्स आणि मेंदू ह्यांचा बेस्ट उपयोग करायला शिकवणारे धडे पुस्तकाचा शेवट अगदी तंतोतंत करतात.

पुस्तकातील माझे आवडते विचार:-

अयशस्वी लोकांमध्ये एक गोष्ट सामायिक असते. त्यांच्याकडे यशस्वी न होण्याची सर्व कारण असतात.

आणि

When we focus on what we know we need to do, we can more easily establish an action plan and forge ahead. We feel driven, alive, passionate. We have the energy to invest in ourselves and others. We have the energy to grow as a person. We learn what we need to know to be successful, not what others say we should know. We ignore the naysayers and objectors. We’re curious and engaged.

हे वाचल्यानंतर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचून पूर्ण कराल अशी अशा करतो.

पुस्तकाची मराठी आवृत्ती इंग्रजी आवृत्ती


 पुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त वाटलेलं असं हे BOOK STAND ज्याचा तुम्ही iPad , Mobile किंवा Kindle यातून वाचन करताना सुद्धा उपयोग करू शकता.

वाचकांच्या विनंतीवरून आम्ही पुस्तक वाचण्यासाठी आणि इतर लिखाण किंवा laptop सोयीस्कर रित्या वापरता यावा म्हणून जो टेबल गेली ४-५ वर्ष वापरत आलो आहोत त्याची लिंक येथे दिली आहे. Click Here.

For Other Products by the same brand Click here

वाचनाच्या आवडीला पूरक असं साहित्य आम्ही वेळो वेळी तुम्हाला सांगत राहू.


Yashwant didwagh

यशवंत दिडवाघ

पुस्तकांपासून लांब पळणारा मी, कधी पुस्तकांमध्ये रमायला लागलो कळलंच नाही. पण आत्ता… मी पुस्तकांच्या प्रेमात पडलोय. तुम्ही पण बघा एकदा पडून (अर्थात प्रेमात)!

Facebook Profile

Instagram Profile

ता.क.१.  तुमच्या आवडीची पुस्तकं व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही BOOK BAGS बनवल्या आहेत, त्या नक्की पहा.

ता.क.२ तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.

तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहतोय.

 


by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *