Is guitar a bad skill to have?

५ कारण – गिटार पासून लांब राहिलेलंच बर!!

प्लीज, गिटार शिकण्याचा प्रयत्न करू नका : खरंच हि एक खूप वाईट गोष्ट आहे.

ठीक आहे.. तुम्हाला मी हे पुराव्यानीशी सांगू शकतो.

१. एकदाका तुम्ही ह्या वाद्याच्या प्रेमात पडला कि त्याचा रियाज करण्यापासून तुम्हाला कोणी कोणीच अडवू शकत नाही. आणि तुमच्या बोटांची सालटी कधी निघाली हे तुम्हाला देखील कळणार नाही.

२. एकदा का तुम्ही ह्या प्रेमापोटी रात्री-दुपारी-संध्याकाळी मूड येईल तेव्हा वाजवायला लागलात आणि घरच्यांची निंद हराम केलीत तर शिव्या पडताना हि गिटार तुम्हाला वाचवायला येणार नाही ह्यांची नोंद असुद्या!

३. तुम्ही गिटार वाजवण्यात इतके हरवून जाता कि ‘वाया घालवायला’ किंवा ‘टी.व्ही. बघायला’ तुमच्याकडे वेळच उरत नाही. (मी तर टी.व्ही. रिमोट कसा काम करतं हे सुद्धा विसरलोय!)

४. एकदा का तुम्ही हिच्यात अडकलात तर मग बाह्यगोष्टींमधलं तुमचं सगळं लक्ष ह्या व्यसनातच गुरफटून राहील. आणि ह्या ‘क्षणभंगुर’ अशा जगातल्या ‘मायाजालात’ (असं तुमचं मत होईल) तुम्हाला मोहिनी घालणारी एकही गोष्ट उरणार नाही. थोडासा वेळ गिटार सोबत… मग बाकी सर्व प्रोब्लमना पूर्णविराम!

५. जेव्हा मला हे व्यसन लागलं तेव्हा मी बाकी इतर वाद्यांच्या नादाला सुद्धा लागलो. उदाहरणार्थ – युकुलेले, माउथ ऑर्गन, पेटी (लिस्ट तशी मोठीय) आणि शेवटी त्यांची खरेदी करण्यातच माझी सगळी सेविंग संपली.

Note – तुम्हाला हि वाद्य हवीत तर त्यावर क्लिक करून तुम्ही online खरेदी करू शकता!

पण बघा हा… मी अजून एकदा (शेवटची) चेतावनी देतोय. गिटार शिकण खूssssप रिस्की आहे!!

ह्या व्यसनाला पूरक अशी साधनं खालील प्रमाणे –

Guitar AmpGuitar CapoGuitar Stand

– 

 

Related Posts –

मी गिटार वाजवायला शिकू का?
गिटार शिकायला किती वेळ लागेल!
मी गिटार वाजवतो कारण…
माझी कला आणि मी – आनंदाच्या शोधात

Related Posts

Leave a Reply