मी गिटार वाजवायला शिकू का?

मी तर म्हणीन बिंदास शिका, पण त्या आधी मनाशी पक्का ठरवा कि तुम्ही नक्की गिटार का शिकताय.

कारण तुम्ही ज्या कारणासाठी गिटार शिकताय त्या कारणावर ठरेल कि तुम्ही किती खोलवर गिटार शिकू शकता. बघायला गेलं तर गिटार वाजवणं हे ३ ४ chords पुरतं मर्यादित असू शकतं, किंवा हा एक कधीच न संपणारा प्रवास असु शकतो.

तुम्ही ज्या कारणासाठी गिटार शिकायला घेतलीत ते साध्य झालं कि तुम्ही ह्यातल्या नवीन गोष्टी शिकण बंद करता आणि या कलेतून मिळालेल्या आउटपुट वर समाधानी राहता. कोणासाठी ते कारण समोरच्या व्यक्तीचं मन जिंकणं असेल, तर कोणासाठी प्रोफेशनली पैसे कमावण असेल.

हा.. पण जर का तुम्ही स्वतःला क्रिएटीवली एक्सप्रेस करण्यासाठी गिटार शिकताय तर त्याआधी थोडा अजून विचार करा. कारण हे करण तितकंसं सोप्प नाही. त्यासाठी खूप ‘Pro level’ गाठावी लागते (and I mean it!!).

आणि अजून एक स्वतःला विचारायचा प्रश्न म्हणजे स्वतःला क्रिएटीवली एक्सप्रेस करण्यासाठी तुम्ही गिटारच का निवडलीत? तुम्ही चित्रकला सुद्धा शिकू शकता, लिखाण सुद्धा करू शकता, किंवा कोणत तरी दुसरं वाद्य शिकू शकता, पण मग गिटारच का?

तुम्हाला डी-मोटीवेट करण्याचा माझा हेतू अज्जिबात नाही. पण ह्या सगळ्या प्रश्नांचा विचार केल्यानंतर तुम्ही एकदा का गिटार शिकायला हातात घेतलीत कि ती पूर्ण शिकाल तेव्हाच खाली ठेवाल. (आणि ती पूर्ण कधीच कोणाची शिकून होत नाही, म्हणजेच तुम्ही कधीच ह्या वाद्याला खाली ठेवणार नाही 🙂 .)

ऑके, आणि शेवटी इतका विचार करून पण तुम्ही कधी गिटारचा कंटाळा केलाच, तर हा लेख वाचताना तुम्ही तुमच्या मनाला दिलेली उत्तरं तुम्ही आठवाल. कारण माणूस दुसऱ्यांशी कितीही खोटं बोलला, तरी स्वतःला फसवण त्याला कधीच जमत नाही.

चला तर, आता तुम्ही फायनली गिटार शिकायला एलिजिबल झालात!!!

Facebook Comments

Related Posts

No Comments

Leave a Reply