शोध

परमात्मा हवा आहे,
अविनाशी ह्या आत्म्याच्या
शाश्वत सुखासाठी

सारथी हवा आहे,
कलयुगी ह्या अर्जुनाला
मार्ग क्रमणासाठी

जन्म नको अन मृत्यूही
सुटकारा हवा आहे
मोक्ष प्राप्तीसाठी

हवी आहे भगवद्गीता
विज्ञानाला कारण देऊन
समजवण्यासाठी

प्रयोग हवे अन निष्कर्षही
शास्त्रञांना वैदिक शस्त्रे
पटवण्यासाठी

शोधत आहेत ते शक्यता
महाभारत घडल्याची
श्रीकृष्ण असल्याची

शोधत आहे मी सत्यता
कृष्णार्जुनाच्या संवादाची
भगवंताच्या असण्याची

-यशवंत दिडवाघ.

.
.
.
ता. क. :- कवीच्या इतर कविता पुस्तक स्वरुपात वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Related Posts

Leave a Reply