ताज पलेस हॉटेल

‘मुंबई, एक माया नागरी आहे’. हे वाक्य आपण बऱ्याच जणांकडून ऐकतो. मी ते प्रत्यक्ष अनुभवलं आणि माझी वकिली सोडून पूर्णपणे लिखाणात घुसण्याचा निर्णय घेतला. हो, हीच आहे मुंबईची ‘माया’. हिला ‘मायावी मुंबई’ म्हणा किंवा ‘मायाळू मुंबई’, जो जसा बघेल त्याला ती तशी दिसेल. मुंबईसाठी स्पेशिअली लिहिलेल्या ह्या लेखांमध्ये मी तुम्हाला मुंबईच्या अशाच काही गिन्या-चुन्या जादुई वास्तूंबद्धल सांगणार आहे, ज्यांची जादू त्या वास्तूच्या डोळ्यात डोळे टाकून बघेल त्यालाच कळते. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने त्यांच्या मुंबई सफरी मधला थोडासा वेळ काढून इथे फिरकाव, हाच एक यामागचा उद्देश.

ताज हॉटेल

स्थापना – पहिली ओळख :

Palace म्हणजे राजवाडा, ह्या नावाला शोभेल असं हे ‘Taj Palace Hotel’. ह्या हॉटेलच्या निर्मात्यांनी राजेशाही थाटात काहीच कसर उरणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलीय. ह्या वास्तूच्या उभारणी संबंधीच्या बऱ्याच कथा तुम्हाला ऐकायला मिळतील, काही खऱ्या काही अफवा.

असं म्हंटल जातं कि एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी जमशेदजी टाटा यांना फक्त गोऱ्या लोकांसाठी असणाऱ्या एका हॉटेल मध्ये प्रवेश नाकारला गेला होता. या मागचं कारण हेच होतं कि ते युरोपियन नव्हते. आणि मग एक दिवस त्यांनी असं हॉटेल बांधायचं ठरवलं जे सगळ्यांचे डोळे दिपवून सोडेल. जिथे नुसते भारतीय, युरोपियनच नव्हे तर सर्व प्रकारचे, सर्व वर्णाचे लोक येतील. आजच्या तारखेला हे अगदी तसचं होतंय. इथे सर्वांना प्रवेश आहे (फक्त तिथे खायला पुरतील एवढे पैसे तुमच्याकडे हवेत :P)

कदाचित ती एक अफवा होती :

पण मला नाही वाटत कि हि इमारत जमशेदजी टाटा नामक हुशार माणसाने केवळ इगो हर्ट झाला म्हणून बांधली. आणि एवढा मोठं बिजनेसमन हे इतके पैसे त्यांना अनोळखी असलेल्या क्षेत्रात गुंतवणार नाहीच. मला तर वाटत ह्या हॉटेलची उभारणी त्यांच्या मनात असणाऱ्या मुंबई बद्धलच्या प्रेमामुळेच केली असणार. कारण तसं नसतं तर हे हॉटेल पहिल्या महायुद्धाच्या वेळी ६०० घायाळ लोकांसाठी खूलं ठेवलं गेलं नसतं.

बऱ्याच अशा पहिल्या गोष्टी :

ह्या शानदार हॉटेलच्या बांधणीत मनाला भुरळ घालण्याची ताकद आहेच, शिवाय इथे बऱ्याच अशा पहिल्या गोष्टी आणण्यात आल्या ज्या ह्या आधी कधी नव्हत्याच. उदाहरण द्यायचं झालं तर, विजेचा वापर करण्यात आलेली हि पहिली इमारत होती, मुंबई शहरातला पहिला लायसन्स असलेला बार आणि पंचतारांकित हॉटेल, भारतातला पहिला आंतरराष्ट्रीय डिस्को, देशातल पहिलं पूर्ण दिवस चालू असणारं रेस्टोरंट.. अरे देवा.. मला वाटतंय सगळ्या पहिल्या गोष्टी इथेच झाल्यायत 🙂 .

हे हॉटेल आजही लांबून येणाऱ्या जहाजांसाठी दिशादर्शकाच काम करत, ह्या हॉटेलचे गोल घुमट कितीही पाऊस असुदे किंवा रात्र असुदे, लांबून दिसतातच.

अजून एक अफवा आणि intresting गोष्ट :

असं म्हंटलं जातं कि ह्या हॉटेलची बांधणी चुकून उलटी करण्यात आली. म्हणजे आता जी बाजू समुद्राच्या बाजूला आहे ती आतमधल्या बाजूला होती आणि आतली बाजू बाहेर. हाह.. आणि बरीच लोकं तर असं पण म्हणतात कि architect रावसाहेब सीताराम खांडेराव वैद्य ह्यांनी सुट्टीवर असताना ह्या इमारतीचा प्लान अप्रूव केला. आणि म्हणून त्यांना हॉटेलच्या प्रवेश द्वाराची दिशा कळलीच नाही. आणि हि अफवा पसरवणाऱ्या लोकांच पुढे असं पण म्हणण आहे कि त्यांना त्यांनतर हि चूक कळाली आणि सुट्टी वरून परत आल्यावर ह्याच हॉटेलच्या पाचव्या माळ्यावरून उडी मारून त्यांनी जीव दिला.

हद्द असते यार अफवा पसरवायची पण!! पण काहीही बोला स्टोरी फार क्रियेटीव्ह आहे 😛 .

अफवे मागचं सत्य :

मला तर वाटत कि मुद्दाम ह्या हॉटेलची बांधणी अशी करण्यात आली असणार, जेणेकरून जास्तीत जास्त रूम्सच्या खिडक्या समुद्राकडे येतील. सिम्पल लॉजिक आहे यार! उगाचच तेव्हाच्या राजकन्या इथे सुट्टीत चिल मारायला येत होत्या काय! पूर्ण देशभरातल्या राजांचा फेवरेट पिकनिक स्पॉट होता हे हॉटेल.

आता सध्या तरी माझ्या खिशाला परवडेल अशी हि जागा नाही. पण मरण्याआधी एकदा तरी मी इथे नाईट स्टे साठी जाणार हे नक्की! मी पण राजपुत्रच आहे कि, आणि हि मायाळू मुंबई माझी आई!

पुढच्या अंकात आपण ह्याच्याच शेजारी असणाऱ्या ‘गेट वे ऑफ इंडिया’ बद्धल अशीच काही खुफिया माहिती घेऊन येऊ. So Stay Tuned!!

 

Related Posts

Leave a Reply