बिझी नात्याला पूर्णविराम नाही, थोडा आराम हवाय!

काय तुम्हाला कधी कधी असं वाटतं का कि तुमचा/तुमची पार्टनर तुम्हाला कमी वेळ देत आहेत किंवा जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा बऱ्याचदा ते अव्हेलेबल नसतात किंवा तुमचा इमोशनल बॉण्ड वीक होतोय.. म्हणजे इन शॉर्ट, तुम्हाला तुमचा पार्टनर खूप जास्त बिझी झालेला आहे असं वाटतंय.

वेल, प्रत्येक रिलेशनशिप मध्ये हा फेज कधी ना कधी येतो . पण प्रत्येकवेळी याचा अर्थ असा होत नाही कि तुमच्या पार्टनरचा तुमच्या मधला इंटरेस्ट कमी झालाय किंवा तुम्ही दूर जाताय .. नो .. बिलकुल नाही..

लग्नानंतर किंवा रिलेशन एका स्टेबल पॉईंट वर आल्यानंतर आपण नॅचरली आपलं करियर , जॉब लाईफ सेट करण्याकडे किंवा ड्रीम्स अचिव्ह करण्याकडे जास्त लक्ष देतो .. अशावेळी कोणी एकजण किंवा दोघेही जास्त बिझी होणं आणि त्यामुळे इश्युज होणं खूप नॉर्मल आहे. पण प्रॉब्लेम आहे तर सोल्युशन हि आहे ना yaar..

सो हि सिच्युएशन कशी हॅन्डल करायची याचं सिक्रेट पाहूया .

 *टाइम टु डेव्हलप युअर हॉबी* 

जर तुमचा आधीपासून एखादा छंद असेल तर तो जोपासा किंवा नवीन छंद ज्यात तुम्हाला आवड असेल अशा गोष्टी ट्राय करा. उगीच निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा स्वतःला आणि तुमच्या वेळेला प्रॉडक्टिव्ह बनवा. प्रत्येक दिवशी स्वतःच्या आवडीसाठी दिलेला असा थोडासा वेळ निगेटिव्हिटी दूर ठेवतो.

 *फ्रेंड्स सोबत टाइम स्पेंड करा* 

रिलेशनशिपच्या सुरुवातीला आपण फ्रेंड्स पासून थोडे दूर होतो. ते कदाचित आपल्याला समजून घेत असतील पण या फेज मध्ये त्यांना आपल्या लाईफ मध्ये पुन्हा इन्क्लुड करा.. फ्रेंड्स सोबत स्पेंड केलेला टाइम तुम्हाला कॉन्फिडन्स आणि एनर्जी देऊन रिचार्ज करेल.

 *गो फॉर वॉक* 

त्याच्या मीटिंग्ज मुळे किंवा तिच्या वर्क प्रेशर मुळे लास्ट मोमेंटला प्लॅन कॅन्सल होतोय तर इरिटेशन होणारच .. अशावेळी एक छोटासा वॉक घ्या . ‘एन्झाईटी अँड  डिप्रेशन असोसिएशन ऑफ अमेरिका’च्या मते दिवसाला 5 मिनिटांची फिझिकल ऍक्टिव्हिटी देखील तुम्हाला डिप्रेशन पासून दूर ठेवते आणि रिलॅक्स करते .

 *कनेक्टेड राहा* 

कधी कधी असं होऊ शकत कि तुमच्या लाईट शेड्युलमुळे तुमच्याकडे जास्त वेळ असेल पण तुमच्या पार्टनरच्या बिझी शेड्युलमुळे एकत्र टाइम स्पेंड करणं शक्य नसेल. तेव्हा अपसेट न होता पार्टनरच शेड्युल जाणुन घ्या आणि त्यांना जेव्हा वेळ असेल तेव्हा टाइम स्पेंड करण्याचे प्लॅन्स तुम्ही बनवू शकता. त्यांच शेड्युल डिस्टर्ब् न करता , एखादा मेसेज, कॉल किंवा भेटण्याचे प्लॅन्स ठरवून तुम्ही कनेक्टेड राहू शकता.

 *स्पष्ट संवाद* 

मला वाटत प्रत्येक रिलेशन मध्ये क्लियर कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं असतं. तुम्हाला वाटतंय तुमचा पार्टनर तुम्हाला पुरेसा वेळ देत नाहीये किंवा इमोशनली समजून घेत नाहीये तर तसं स्पष्टपणे त्यांना सांगा. ते स्वतःहून समजून घेतील याची वाट पाहू नका त्यात तुमच्या दोघांचाही लॉस आहे. शेवटी संवादानेच सोल्युशन मिळतात.

*विश्वास* 

आणि शेवटी सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकमेकांवर विश्वास ठेवा. उगीच एकमेकांवर ब्लेम करण्यापेक्षा आणि काल्पनिक गोष्टी तयार करण्याऐवजी, एकमेकांना समजून घ्या. मला माहितीये तुम्ही ऑलरेडी खूप समजूतदार आहात पण इथे अंडरस्टँडिंग लेव्हल वाढवण्याची गरज आहे, फ्रस्ट्रेशन लेव्हल नाही..

कधी कधी एखादी महत्वाची गोष्ट त्याच मोमेण्टला त्याच एनर्जी आणि फ्लो मध्ये शेयर करावी असं वाटतं पण समोरच्या व्यक्तीला वेळ नसेल तर त्यातली उत्सुकता कमी होते आणि मग कंटाळवाणे निगेटिव्ह विचार येतात . पण इट’स ओके .. यावर जास्त निगेटिव्ह विचार न करता स्वतःला आणि तुमच्या रिलेशनला अजुन जास्त मच्युअर्ड आणि हॅपनिंग बनवा. तेच तर सिक्रेट आहे हॅपी आणि हेल्दी नात्याचं.

आणि हो.. हे झाले तुमचे तुमच्या बाजूने केलेले प्रयत्न. पण तुम्ही ह्या गोष्टी रोजच्या रुटीन मध्ये आणून सुद्धा तुमच्या पार्टनरला तुमच्या प्रयत्नांचा अंदाजा येत नसेल तर आता वेळ आलीय आहे कि त्यांनी हे आर्टिकल पूर्ण वाचलंच पाहिजे!

Related Posts

Leave a Reply