रंग

चेहेऱ्यात अडकला जीव

येते की रे कीव

मला वेड्यांची,

झाले परि आंधळे

त्यांना जी न कळे

कला जगण्याची,

राहशील किती तू व्यस्त

करी उध्वस्त

जगणे स्वतःचे,

समज नाही बुद्धीची

अंती वृद्धीची

गणितं प्रगतीचे,

घालवी सर्व आयुष्य

समजुनी तुच्छ

जे दिसे काळे,

बगळा असो वा कावळा

दोन्ही आकाशी

उंच उडती रे,

दोन्हीची वेगळी भूक

वेगळी रीत

असे जगण्याची,

पंखात आहे खरी जान

त्यांची ती शान

पक्षी असण्याची,

जगण्याची खरी जी कला

जो नाही समजला

शिकूनिया घ्या रे,

दोन्हीची वेगळी चोच

पंख तर तेच

नीट बघ ना रे,

पाहिला धूर्त कावळा

शुभ्र तो बगळा

नभी उडताना,

पाहिले असे ही लोकं

जे करी नवस

‘गोरा असो तान्हा’

मी हसू माझे आवरले

ज्यांनी पाहिले

फक्त तव रंग उभयतांचे,

मी कसे रंग हे सांगू

कुणा दाखवू

ह्या कर्तृत्वांचे!

-यशवंत दिडवाघ

Related Posts

  • Reply Shekhar Gaikwad July 8, 2018 at 2:38 pm

    Simplyyy Superb

  • Reply Pravin Padwal July 8, 2018 at 2:39 pm

    Nice

  • Reply Aditya Desai July 8, 2018 at 2:40 pm

    Masta

  • Leave a Reply