राजा

तरुण रक्त ते उसळत होते

NLC ला येताना,

सगळे लेक्चर अटेंड केले,

कायदा तसा होता ना!

 

पाया पडून म्हंटलो होतो

‘सर नुसतं लढ म्हणा’

अजून आठवे तोच दिवस हा

मी लॉयर होताना..

 

अपशब्द ते मधाळ होते

त्या खुर्चीतून येताना,

शिवी बघितली आम्ही त्यांची

कानात साखर होताना..

 

न फिटणारे कर्ज उचलले,

नाही दिली गुरू दक्षिणा,

अनुभव भारी गुरुमंत्र ते,

मनामध्ये घर होताना..

 

शत जन्मीचे ऋणी झालो,

शिक्षण आणि संस्काराचे,

आठवती ते धडे रोजचे

आकाशी ह्या उडताना..

 

कधी मुलायम कधी सक्तशा,

आदेशामध्ये आपुलकी ही,

पाहिलीत का कधी तुम्ही

धरा ही अंबर होताना..

 

कार्यकाल तो संपत गेला

दिवस गेले क्षणासारखे,

उभी प्रजा निशब्द बघतसे,

राजा रिटायर होताना..

-यशवंत दिडवाघ (३१-०५-२०१९)

 

.
.
.
ता. क. :- कवीच्या इतर कविता पुस्तक स्वरुपात वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Related Posts

Leave a Reply