prashna hich uttar ahet marathi book review

प्रश्न हीच उत्तरे आहेत

हे पुस्तक वाचकाला ‘नेटवर्क मार्केटिंग’ मध्ये यशस्वी होण्याचं तंत्र उलघडून देतं. लेखक Allan Pease यांनी मानवी स्वभावातले बरेच बारकावे ह्यात मांडले आहेत, ज्याचा उपयोग करून सेमिनार, प्रेझेंटेशन अशा कामात तुम्ही यशस्वी होऊ शकाल.

लेखकाच्या मते, चांगले नेटवर्कर जन्माला येत नाहीत, ते घडवले जातात. नेट्वर्किंग हे एक ‘विज्ञान’ आहे; त्याला एका विशिष्ट साच्यातून शिकता येऊ शकतं. नेट्वर्किंगच्या खेळात सर्वात वरती राहण्यासाठी काय केलं पाहिजे ह्याचे डावपेच ह्यात तुम्हाला समजतील. ज्यांचा आजवर हज्जारो लोक्कानी यशस्वीरित्या उपयोग केला आहे.

पुस्तकाबद्धल मला आवडलेल्या गोष्टी:

  • अनुक्रमणिका वाचूनच लक्षात येतं कि तुम्हाला हे पुस्तक पचवता येईल.
  • अवघ्या १०० पानांमध्ये सगळे मुद्दे अगदी मोजक्या शब्दात टिपले आहेत. मग मोठ्ठी जाड-जुड पुस्तकं वाचताना करावी लागणारी मनाची तयारी ह्या पुस्तकासाठी करावी लागत नाही.२-३ बैठकीत पूर्ण पुस्तक वाचून होतं.
  • एकदम गूढ किंवा हाय-फाय रॉकेट सायन्स नाहीय. जे काही आहे ते अगदी सरळ आणि सोप्प. दैनंदिन वापरात आणता येईल असं.
  • देहभाषा आणि मानसशात्राचा बेसिक लेवलचा अभ्यास होतो.

लेखक Allan Pease बद्धल-

ऑस्ट्रेलियामधले प्रसिद्ध देहभाषा तज्ञ. ह्यांनी इतर बरीच पुस्तकं लिहिली आहेत. ज्यात पुढील बेस्ट सेलर पुस्तकांचा समावेश होतो.

Why Men Don’t Listen And Women Can’t Read Maps (मराठी आवृत्ती)

Body Language: How To Read Others

Why Men Want Sex And Women Need Love (मराठी आवृत्ती)

Body Language In The Workplace (मराठी आवृत्ती) 

The Definitive Book Of Body Language

त्यांचं बरचसं लिखाण देहभाषा, संवाद कौशल्य आणि स्त्री-पुरुष ह्याच्यातल्या फरकांबद्धल आहे.

ऑस्ट्रेलियात लहानपणापासूनच (वय वर्ष १० असतानाच) त्यांनी सेल्समनचं काम केलं. एकविशीत पदार्पण होईपर्यंत त्यांनी दहा लाखाहून जास्त डॉलरचा जीवन बिमा विकला होता. असं करणारा ऑष्ट्रेलियातला हा पहिला तरुण आहे. जगभरात सेमिनार कसे करावेत यावर संशोधन सुद्धा ह्यांनी केलं आहे. त्यांनी बऱ्याच रेडियो आणि टेलिव्हिजन वाहिन्यांवर मुलाखती सुद्धा दिल्या आहेत.

तुम्ही स्वतः किंवा तुमच्या मित्रांमध्ये कोणी नेटवर्क मार्केटिंगमध्ये पैसे कमवण्यासाठी इच्छुक असेल तर त्यांच्यासाठी हे ‘MUST READ’ पुस्तक आहे. ‘प्रश्न हीच उत्तरे आहेत’ ह्या पुस्तकाची वेगवेगळ्या भाषेत भाषांतर सुद्धा झाली आहेत. मराठी आवृत्ती. इंग्रजी आवृत्ती.


 पुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त वाटलेलं असं हे BOOK STAND ज्याचा तुम्ही iPad , Mobile किंवा Kindle यातून वाचन करताना सुद्धा उपयोग करू शकता.

वाचकांच्या विनंतीवरून आम्ही पुस्तक वाचण्यासाठी आणि इतर लिखाण किंवा laptop सोयीस्कर रित्या वापरता यावा म्हणून जो टेबल गेली ४-५ वर्ष वापरत आलो आहोत त्याची लिंक येथे दिली आहे. Click Here.

For Other Products by the same brand Click here

वाचनाच्या आवडीला पूरक असं साहित्य आम्ही वेळो वेळी तुम्हाला सांगत राहू.


Yashwant didwagh

यशवंत दिडवाघ

पुस्तकांपासून लांब पळणारा मी, कधी पुस्तकांमध्ये रमायला लागलो कळलंच नाही. पण आत्ता… मी पुस्तकांच्या प्रेमात पडलोय. तुम्ही पण बघा एकदा पडून (अर्थात प्रेमात)!

Facebook Profile

Instagram Profile

ता.क.१.  तुमच्या आवडीची पुस्तकं व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही BOOK BAGS बनवल्या आहेत, त्या नक्की पहा.

ता.क.२ तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.

तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहतोय.

 

Comments

One response to “प्रश्न हीच उत्तरे आहेत”

  1. राहुल पोवार Avatar
    राहुल पोवार

    माझ्या 3-4 मित्रांना मी लिंक फॉरवर्ड केलीय, आशा आहे की ते ह्या बुक चा चांगला उपयोग करून घेतली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *