प्रेम

अभंगासारखं

पूर्णत्व असणार,

जगण्याला अर्थ देणार..

तडजोडीच्या जोडीशिवाय

कोणताही बांध न फोडता

मनं सांधणार..

बोटभर ओळीत लिहून

सांगता आलं नाही तरी,

न बोलता व्यक्त होणार..

संवेदनक्षम मनांमधल्या

निरागस भावना,

अलवार जपणार..

बेफाम इच्छांसोबत

वेळीस त्यांवर

लगाम लावणार..

दुभंगलं तरी

एकसंध असणार,

आभाळासारखं शुभ्र प्रेम.. 🙂

-यशवंत दिडवाघ

.
.
.
ता. क. :- कवीच्या इतर कविता पुस्तक स्वरुपात वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Related Posts

Leave a Reply