न्यू लॉ कॉलेज मधली – ‘गुलाबी आंखे’

माझ्या आयुष्यातला सगळ्यात पहिला गिटार performance केला तो आमच्या ‘न्यू लॉ कॉलेज’ च्या Annual Day ला. ‘गुलाबी आंखे’.. हो हेच ते गाण. माझ्या गळ्याला आणि हाताला झेपणार तेवढच काय ते एक गाण मी आतापर्यंत शिकलेलो. (सदानकदा मी तेच ते गाण वाजवायचो, काय करणार दुसरं कोणतं गाण येतही नव्हत ना!).

न्यू लॉ कॉलेजचं आणि आमच्या प्रिन्सिपल राज्याध्यक्ष सरांचं मला हेच एक कौतुक वाटतं, इथे सगळ्यांना चान्स मिळतो, सुधारण्याचा , perform करण्याचा, (आणि काही चुकलं नसेल तरी हक्काने सरांच्या शिव्या खाण्याचा :p ). माझी पण खऱ्या अर्थाने सुरुवात इथूनच झाली. आज जी काही स्वप्न मी एक कलाकार आणि लेखक म्हणून पाहिली किंवा पूर्ण केली ती आमच्या ‘न्यू लॉ कॉलेज’ मध्ये मिळालेल्या वातावरणामुळेच.

फार हसू येतं, आता मागे वळून ते दिवस आठवले कि, स्वतःवरच. त्या दिवशी इतकी काही उत्कृष्ट दर्जाची वैगरे गिटार वाजवली नव्हती, आज जितकी येते त्याच्या १०% सुद्धा मला माहित नव्हतं तेव्हा. पण स्टेजवर कुणीतरी गिटार घेऊन मुलगा बसला आहे, हे बघूनच पब्लिक टाळ्या वाजवायला लागली, शिट्या मारायला लागली. आणि performance कसाही होऊदे त्याला once more म्हणणारी मित्रमंडळी सुद्धा तयारीतच होती मागच्या रांगेत.

स्टेजवर बसून गिटार वाजवणं म्हणजे काय ते पहिल्यांदाच कळत होतं. तिथे डोळ्यात इतकी लाईट जाते कि श्रोत्यांमधलं कोण कुठे बसलंय हे काही एक कळत नाही. गर्मीमुळे बोटांना घाम येतो आणि गिटार वाजवता वाजवता बोटं गिटारच्या फ्रेटबोर्ड वरून घसरूही शकतात. न्यू लॉ कॉलेजने दिलेला तो पहिला चान्स मला खूप काही शिकवून गेला. त्या दिवशी स्टेजवरून गुलाबी आंखे तर मला कुठे दिसली नाहीत पण भविष्यात मला नक्की काय काय सुधारणा करायच्या आहेत हे अगदी ‘क्लियरकट’ दिसलं.

कुठल्याही मोठ्या कामात कौतुकाची कमतरता असेल तर ते तितकसं मोठं होत नाही हे खरंय बाकी! वेळीस मिळालेल्या कौतुकामुळेच मी आज जे काही करतोय ते करू शकलो. यात आमचे प्रिन्सिपल राज्याध्यक्ष आणि कॉलेज यांचा खरंच खूप महत्वाचा वाटा आहे.

हळू हळू ‘स्टेज फियर’ निघून जात होतं. आता मी एक बिनधास्त performer बनलो होतो. यतीन आणि प्रवीण सोबत पुढल्या Annual Days ना १० ते २० मिनिटांचे स्लॉट अगदी हक्काने मिळू लागले. या प्रवासात यतीनने मला खूप गोष्टी शिकवल्या. वयाने लहान असला तरी बऱ्याचदा तो अगदी मोठ्या भावासारखा हक्काने ओरडायचा, शिकवायचा. आणि अर्थातच त्याचा फायदा देखील झाला.

‘न्यू लॉ कॉलेज’ माझ्या आयुष्यातली दुसरी शाळा आहे, जिथे अजूनही मी जगण्याचे धडे शिकतो. (आणि कायद्याचे धडे शिकवतो.) शिकण्याची आणि शिकवण्याची हि अशीच अखंड प्रोसेस चालू राहिली तर अजून काही नको आयुष्यात!

Related Posts