तुमच्या पार्टनरने सिगारेट का सोडू नये याची ७ कारण

१. हे खूप स्वस्त व्यसन आहे.

२. दातांना मस्त रंग येतो. नखांना नेलपेंट असते तशी तुमच्या पार्टनरची सिगारेट ‘टूथपेंट’ म्हणून काम करू शकते.

३. जास्त सिगारेट प्यायल्याने नपुंसकत्व येतं. याने तुमचा ‘सेक्स-लाईफ’मध्ये गर्भनिरोध वापरून होणार खर्च आणि टेन्शन दोन्ही कमी होतं.

४. सिगारेट सोडल्यावर आपल्या जिभेची पदार्थाची चव ओळखण्याची क्षमता वाढते. तुम्ही जेवण बनवताना कुठे चुकला असाल तर ते तुमच्या पार्टनरला यामुळे पटकन समजेल.

५. सिगारेट सोडल्यावर ३ आठवड्यात शरिराला मजबुती येते, तुमचा पार्टनर तुमच्या सोबत भांडला तर त्यात तुम्हाला मारझोड होण्याचे चान्सेस वाढतात.

६. सिगारेटमुळे भूक कमी लागते. मग तुमचा पार्टनर जास्त खाऊन जाडा होईल ह्याचं टेन्शन तुम्ही कधीच घेऊ नका.

७. सतत सिगरेटचाच वास येत असल्यामुळे ह्या लोकांचा परफ्यूम वरचा खर्च सुद्धा कमी होतो.

 

ह्यातून नक्की काय बोध घ्यावा हे तुम्हाला कळलं असेल तर चला पटापट तुमच्या ‘फुक्या’ पार्टनरला tag करा. तुमचं आणि त्यांचं ‘नातं यशवंत’ ठेवायचं असेल तर आधी आपला माणूस तेवढा जगाला तरी पाहिजे ना!! 😉

Related Posts

 • Reply Yogesh pawar March 13, 2018 at 4:01 pm

  Khupach Chaan 🙂

  • Reply admin April 2, 2018 at 7:03 pm

   haha thank you Yogesh

 • Reply Suresh Didwagh July 8, 2018 at 2:53 pm

  Hahahah…

 • Leave a Reply