नमस्कार

खोडाला खोडाला खोडाच्या बुडाला
तूच की रे वेड्या तो घाव केला,
खोडास तोडून विचार केला
नमस्कार माझा तया मानवाला..
.
.
खोड मोडायची, खोड मोडायची की
जहाजातून दुनिया हिंडायची,
होईल उद्धार, जर विचार केला
नमस्कार माझा तया मानवाला..
.
.
तूला नाही कळली चिपकोची भाषा
शेतात अजूनी वरुणाची आशा,
वरुणाच्या ऋणाचा धिक्कार केला
नमस्कार माझा तया मानवाला..
.
.
झाडेच लावा नी झाडेच जगवा
कसला तो हिरवा नी कसला तो भगवा,
जगाच्या उद्धार काढा हा फतवा
नाही तर आहेच
‘शेवटचा’ नमस्कार माझा तया मानवाला..
.
.
–यशवंत दिडवाघ

जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा

 

.
.
.
ता. क. :- कवीच्या इतर कविता पुस्तक स्वरुपात वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Related Posts

Leave a Reply