Happy World Music Day

लोकं १४ फेब्रुवारीला ‘वेलेंटाईन डे’ करतात. आणि मी तो करतो २१ जूनला, म्हणजेच ‘वर्ल्ड म्युझिक डे’ दिवशी. आणि माझी वेलेंटाईन असते माझी लाडकी गिटार. मी तिला माझ्या गर्लफ्रेंड सारखच treat करतो. पण या आधी कहाणी मध्ये थोडा ट्वीस्ट असा होता कि माझी आणि माझ्या गिटारची लवस्टोरी घरच्यांना आवडत नव्हती, त्यामुळे मला जरा लपून लपून practice करावी लागत होती. प्रियकर-प्रेयसी जसे लपून-छपून भेटतात तसच काहीसं होतं ते. अगदी गेल्या वर्षी पर्यंत माझी गिटार माझ्या मित्राच्या घरीच असायची. त्यांना वाटायचं मी तिच्या नादाला लागून वाया जाईन कि काय.

म्युजिक हि एक अशी अप्रतिम गोष्ट आहे जी तुम्ही न शिवता फील करू शकता, डोळे बंद असले तरी बघू शकता, कितीही कडक उन असलं तरी त्याला विसरू शकता. आणि अशी म्युजिक तुम्ही स्वतः तुमच्या हातून तयार केली असेल तर मग तश्या आनंदाला शब्दात सांगण खरच अवघड आहे!

६ वर्ष आधी गिटार नक्की असते तरी कशी हे सुद्धा माहित नव्हत. पण एकदा एका फिजिक्स प्रोजेक्टमध्ये मित्रांनी गिटारची थेअरी सागितलेली, तेव्हा पहिल्यांदा गिटार हातात घेतली. त्यातून निघणारा आवाज मनातून थंड हवेची झुळूक नेणारा होता. तेव्हा सुरांमधली एवढी माहिती नव्हती. मग गिटार कशी हि वाजली तरी एकदम ‘गार्डन गार्डन’ वाटायचं. ‘LOVE at First Sight’ काय ते म्हणतात ना, तसं झालेलं मला तेव्हा. मग उन्हाळ्याच्या सुट्टीत गिटार शिकायची असा निश्चय केला. त्यासाठी लागणारी ८०० रुपये महिना फी मी कशी गोळा केली ते माझ मलाच माहितीय. तेव्हा वाटलेलं, आता तर कॉलेज संपलं, आता फार उशीर झाला, आता शिकून काय करू. पण त्या विचारांना मी जास्त वेळ माझ्या डोक्यात राहू दिल नाही.

म्युजिक आवडण आणि म्युजिकच वेड असण ह्या दोन वेग वेगळ्या गोष्टी आहेत. लहानपणी मला म्युजिक आवडायचं, आत्ता ते एक ‘वेड’ झालंय. तुम्हाला एखाद्या गोष्टीचं खरच वेड असेल ना तर आपोआप तुम्हाला तिच्यापर्यंत पोहचायचे रस्ते मिळत जातात. माझ पण काहीस असच झालं.

 

नवीन उपक्रम

जून महिन्यात मी नेहमीच म्युजिकशी रिलेटेड काही तरी नवीन उपक्रम करत असतो. यंदा एक कल्पना डोक्यात आलीय. मी गिटार पहिल्यांदा शिकायला घेतली तेव्हा माझ्याकडे अज्जिबात पैसे नव्हते. स्वतःची गिटार नव्हती. अजूनही अशी बरीच म्युजिक वेडी तरुण मंडळी आहेत ज्यांना हा छंद थोडा महाग असल्यामुळे परवडत नाही. आपण त्यांच्यासाठी एक काम करू, आपल्या ओळखी मध्ये ज्या कोणाकडे गिटार आहे, जी वर्षानू वर्षे कुठे तरी कोपऱ्यात धूळ खात बसलीय, किंवा जराशी तुटली म्हणून कचऱ्यात जमा झालीय, ती अशा गरजू तरुणांपर्यंत पोहचवू. चला, आपली जुनी गिटार तशीच भंगारात जमा करण्यापेक्षा कोणाला तरी डोनेट करूयात.

आमच्या घरच्यांचा माझ्या गिटारसोबत असणाऱ्या नात्याबद्धलचा विरोध मावळला आणि मी माझी स्वतःची म्युजिक अकादमी उघडली. थोडे दिवस गिटारसोबत ‘लिव-इन-रिलेशनशिप’ मध्ये राहिलो आणि मगच हा नवीन म्युजिक अकादमीच्या संसाराचा निर्णय घेतला. तुम्ही मला तुमच्या किंवा तुमच्या मित्रांच्या गिटार डोनेट केलीत तर माझ्यासारख्या बऱ्याच तरुणांच्या सांगीतिक संसाराला हात भार लागेल. बाकी तुमची गिटार योग्य माणसापर्यंत पोहचवायची जबाबदारी माझी. संपर्क साधण्यासाठी माझ्या वेबसाईटवर जा www.yashwantHo.com .

गिटार येत नाही म्हणून आज तुम्ही तुमच्या उदास मैत्रिणीला ‘कभी कभी अदिती’ गाण गाऊन खुश करू शकला नसला तरी तुम्ही ज्याला तुमची गिटार डोनेट केलीय त्याच्याकडून नक्कीच ते करवून घेऊ शकता! कोणी स्पेशिअल समवन असेल, तर त्याला एखाद romantic गाण ऐकवू शकता. इनशोर्ट, म्युजिक आय्युश्यात असे पर्यंत तुम्ही काहीही करू शकता. सदैव खुश राहू शकता. तुमच्या भावना शब्दा आभावी गुदमरून जात असतील तर त्या गाण्यातून किंवा एखाद्या छोट्याश्या म्युजिक पीस मधून एक्स्प्रेस करू शकता. आणि बघा सगळ कसं व्यवस्थित सेट होतंय ते.

माझ्यासाठी तरी म्युजिक एक अशी magic आहे जी नसेल तर सगळी जिंदगी tragic आहे. तुम्ही म्युजिक वर प्रेम करा, इन रिटर्न ते तुम्हाला प्रेम करायला शिकवेल. Wish you a Very Happy World Music Day.

Related Posts

Leave a Reply