मुंबई युनिवर्सिटी

‘मुंबई, एक माया नागरी आहे’. हे वाक्य आपण बऱ्याच जणांकडून ऐकतो. मी ते प्रत्यक्ष अनुभवलं आणि माझी वकिली सोडून पूर्णपणे लिखाणात घुसण्याचा निर्णय घेतला. हो, हीच आहे मुंबईची ‘माया’. हिला ‘मायावी मुंबई’ म्हणा किंवा ‘मायाळू मुंबई’, जो जसा बघेल त्याला ती तशी दिसेल. मुंबईसाठी स्पेशिअली लिहिलेल्या ह्या लेखांमध्ये मी तुम्हाला मुंबईच्या अशाच काही गिन्या-चुन्या जादुई वास्तूंबद्धल सांगणार आहे, ज्यांची जादू त्या वास्तूच्या डोळ्यात डोळे टाकून बघेल त्यालाच कळते. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने त्यांच्या मुंबई सफरी मधला थोडासा वेळ काढून इथे फिरकाव, हाच एक यामागचा उद्देश.

 

स्थापना:

या इमारतीची बांधणी १८५७ ची आहे. तेव्हापासून आतापर्यंत भारतातल्या top युनिवर्सिटीस् मधली हि एक. ह्या इमारतीच्या कॅम्पसमध्ये तुम्हाला एक मोठ्ठा घड्याळ असलेला Tower दिसेल. तेव्हाच्या काळातल्या एका प्रसिद्ध बिजनेसमनने ह्या इमारतीच्या बांधकामासाठी २ लाख रुपये देणगी देऊ केली. प्रेमचंद रॉयचंद हे त्यांचं नाव. २ लाख म्हणजे आजच्या घडीलाच खूप मोठी रक्कम आहे. मग तेव्हा इतकी देणगी देणारा कोण तरी दिलदारच माणूस म्हणायचं. या घड्याळच्या इमारतीला म्हणतात ‘राजाबाई टोवर’. आता याचं नावं असं का ह्याची पण एक स्टोरी आहे. एक नाही अशा अजून २-३ स्टोरीज आहेत, बट सध्या एकच सांगतो.

 

राजाबाई टोवर:

एव्हाना हायकोर्टला फेरी मारेपर्यंत ह्या घड्यालातून येणारे टोल तुम्ही ऐकले सुद्धा असतील. ह्या उंच टोवरच्या नावामागे आणि ह्या एकसारख्या १५ मिनिटांनंतर येणाऱ्या घंटानादाच्या मागे सेम स्टोरी आहे.

जेव्हा प्रेमचंद यांनी ह्या वास्तूच्या बांधणीसाठी देणगी दिली तेव्हा त्यामागे एक अट ठेवली. ती म्हणजे ह्या इमारतीला त्यांच्या आईचं नाव देण्यात यावं अशी. मग आता तुम्ही म्हणाल मग तो सतत येणारा घंटेचा नाद कशासाठी. तर त्याचं झालं असं, प्रेमचंदांची आई जैन धर्माची कट्टर उपासक होती. तिच्या जेवणाच्या आणि बाकीच्या पथ्य पाळण्याच्या वेळा ठरलेल्या होत्या. आणि असं म्हणतात कि त्यांच्या आईला वृधापकाळामुळे दिसायचं थोडं कमी आलं होतं. १५ मिनिटाच्या वेळेनंतर वाजणारे घंटेचे टोल त्यांना वेळ समजण्यासाठी उपयोगी पडायचे.

 

खुफिया माहिती:

हि घड्याळाची इमारत १८६९ मध्ये बांधायला सुरुवात केली गेली, आणि नोव्हेंबर १८७८ ला पूर्ण झाली. त्या काळातली मानवी प्रयत्नांनी तयार केलेली हि सर्वात उंच इमारत होती. तिथेच जवळपास आढळणाऱ्या बफरंगाच्या कुर्ला खडकाने ह्याची बांधणी केली गेली. तेव्हा समुद्रकिनारा अगदी ह्या कॅम्पसच्या अंगणाला शिवेल असा होता.

ह्या इमारतीत वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पण याआधी झालेल्या आत्महत्येच्या प्रकरणांमुळे इथे कोणालाच प्रवेश दिला जात नाही. आजच्या तारखेला तिथे मुंबई विद्यापीठाची लायब्ररी सेटअप करण्यात आली आहे.

 

जवळ अजून काय आहे?

इथून जवळपास बऱ्याच ऐतिहासिक जागा आहेत. सत्र न्यायालय, कालाघोडा, डेविड ससून वाचनालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, आणि अजून बरच काय काय. इथे जवळ जवळ सगळ्याच इमारती गॉथिक किंवा निओ-गॉथिक स्टाईल च्या बनवण्यात आल्या आहेत.

आता पुरतं इतकंच, अजून नवीन नवीन ऐतिहासिक जागांची माहिती आपण पुढल्या भागात घेऊ.

Related Posts

Leave a Reply