एशियाटिक लायब्ररी (Asiatic Library)

एशियाटिक लायब्ररीच्या स्थापने आधी मुंबई एक intellectual  वाळवंट होती, जिथे अभ्यास, रिसर्च अशा गोष्टींना कुणी कधी महत्वच दिलं नव्हतं. ‘एशियाटिक लायब्ररी’ म्हणजे मुंबईतली ज्ञानाची तहान भागवणारी पाणपोईच म्हणा हवं तर. Again, माझ्या असं लक्षात आलं कि इथे जन्मलेल्या वाढलेल्या बऱ्याच मुंबईकरांना ह्या पाणपोईचा विसर पडला आहे, काहींना तर हि इमारत कसली आहे हे देखील माहित नाही.

‘अरे हा… हि बिल्डींग कुठे तरी बघितलीय’, जरा डोक्यावर जोर टाकून, ‘अरे, यशवंता हि तर बेंजो मूवी मध्ये आहे ना’, मग अजून दुसऱ्या एका टाळक्यात ट्यूब पेटते, ‘अरे हा, रेहेना है तेरे दिल ने मध्ये पण इथली शूटिंग आहे का रे!’.. हाहा.. माझ्या मित्रांना तर इतकंच माहित होतं. आज मी ह्या इमारतीत कोणता कोणता खजाना आहे ते सांगतो. In fact, बऱ्याचदा, मी माझ्या ‘भटकंती’ ची Exact माहिती इथूनच मिळवतो 😀 .

हि अनोखी ज्ञानाची तहान भागवणारी पाणपोई : कशी चालू झाली –

ह्या इमारतीचं बांधकाम ग्रीक आणि रोमन स्टाईलने करण्यात आलं आहे. जसा प्रत्येक देशाचा अमुक अमुक शास्त्र साठा असतो, धान्याचा साठा असतो, तसाच पुस्तकांचा हि असावा, आणि ती कमी ह्या वाचनालयाने भरून काढली.

ह्या वाचनालायची गरज भासली ती तत्कालीन उच्च न्यायालयीन चीफ जस्टीस जेम्स मशीन्तोष ह्यांना. ज्ञानाच्या पडलेल्या दुष्काळामुळे इथल्या नागरिकांमध्ये निर्माण निर्माण झालेल्या बौद्धिक घसरणीला एक समतोल पातळीवर आणण्याचा हा प्रयत्न होता. यातूनच १८०४ ला ‘बॉम्बे लिटररी सोसायटी’ची स्थापना करण्यात आली. जिला आता २००२ नंतर ‘एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ असे ओळखले जाऊ लागले.

आत पाहण्यासारखं काय आहे?

मी तर म्हणीन नुसत पाहायला जाण्यापेक्षा वाचायलाच जा तुम्ही एकदा!. आई शप्पथ असली भारी जागा कुठेच नाही!

‘इथे १ लाखाहून जास्त पुस्तकं आहेत, ज्यातली १५ हजार दुर्मिळ आणि मौल्यवान म्हणून घोषित झाली आहेत,’

ह्यापैकी बरीचशी पुस्तकं प्राचीन आणि आधुनिक भारतीय आणि युरोपियन भाषांमधली आहेत. Palm Leaf वर लिहिलेल्या ३ हजाराहून अधिक Manuscripts तुम्हाला इथे वाचायला मिळतील.

‘Just Imagine, तुम्ही एक वर्तमान पत्र वाचताय जे १६ ऑगस्ट १९४७ ला अमेरिकेच्या कोणत्यातरी एका कोपऱ्यात प्रसिद्ध झालं होतं. आणि अर्थातच, बातमी आहे, भारत स्वतंत्र झाल्याची!’

इथे बरेच असे ऐतिहासिक दस्तऐवज आहेत दुसऱ्या शतकात लिहिले गेले होते. थोडक्यात सांगायचं तर हि अशी लायब्ररी आहे, जी अज्जिबात बोरिंग नाही!

गुगल Vs एशियाटिक लायब्ररी –

तुम्हाला कदाचित हि अतिशयोक्ती वाटेल पण इथे बरीचशी माहिती अशी आहे जी तुम्हाला गुगलवर सुद्धा मिळणार नाही. (मी माझा कॉनटेंट तिथूनच घेतो बऱ्याचदा 😉 ). वेगवेगळ्या भाषांमध्ये संशोधन करणारे मोठे मोठे संशोधक इथे रिसर्चसाठी येतात. हो, इथे जगाच्या कोपऱ्यातून सुद्धा लोकं येतात, सगळेच फिरंगी मुंबईत मजा करायला येतात असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे.

पुस्तकांची देखभाल –

इतका मौल्यवान पुस्तकी खजिना सगळ्यांच्या हातात दिला तर तो लवकरच लोप पावेल, पुस्तकं खराब होतील. याला पर्याय म्हणून त्यावर छानशी योजना इथे राबविली जाते. त्या योजने अंतर्गत आपण इथलं कुठलंही एक पुस्तक ५००० रुपये देऊन दत्तक घेऊ शकतो. मग आपल्या दिलेल्या पैशाचा उपयोग करून त्या पुस्तकाला तंत्रज्ञांच्या मदतीने मिक्रोफिल्म स्वरुपात उपलब्ध करून दिले जाते.

मग इतकी पुस्तकं आली कुठून ह्या वाळवंटात! –

हि मौल्यवान पुस्तकं त्या काळात इथल्या संचालकांना दान दिली. घरी असलेली जुनी, महत्वाची पुस्तकं रद्दीच्या गाठ्यात हरवून जाण्याआधीच तत्कालीन माध्यमांकडून पुस्तक दान करण्याच्या मोहिमेचा प्रसार झाला. त्यातून हा अमूल्य ठेवा आपल्या पदरी पडला. संस्थानाचा पुढाकार आणि त्याला इतिहास प्रेमींनी दिलेली साथ आज ह्या खजिन्याची खरी भागीदार आहेत.

‘तुम्ही एकदा हि पुस्तकं वाचायला घ्या, बघा इतिहास सुद्धा जीवंत होतो कि नाही ते!’

मला पण वाचायची आहेत हि पुस्तकं –

मग, वाट कसली बघता, जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० च्या सुमारास नक्की भेट द्या. तिथे पोहचून एक-दोन काढून झाले कि घरी निघून यायचं, असं करायचं नाही. लागलीच पुस्तकांची माहिती सुद्धा काढून घ्यायची आणि अजून असे मस्त मस्त लेख लिहायचे.

निघता निघता –

तिथून निघता निघता पायऱ्या उतरत असाल तेव्हा जरा २ मिनिट तिथेच थांबा आणि एक गंमत सांगतो तेवढी लक्षपूर्वक बघा. पायऱ्यांवर लायब्ररीकडे पाठमोरे उभे असाल तेव्हा पुढे तुम्हाला जे सर्कल दिसेल त्याचं नाव आहे ‘हॉर्नीमन सर्कल’. तिथून जरा त्याच्या भोवताली असलेल्या इमारतींवर एक नजर टाका. तुम्हाला जाणवेल कि त्या इमारतींच्या बाहेरच्या भिंती एकसाथ जोडल्या तर एक अखंड वर्तुळ तयार होते. आहे कि नाही कमाल. अशी unique कमाल आपल्या मुंबईत इंग्रजांनी खूप जागी करून ठेवलीय. एक एक करून सगळ्या असाधारण गोष्टी तुम्हाला मी सांगिनच.. तर मग stay tuned!!

Related Posts