८ टिप्स- ज्या तुम्हा दोघांचा पैसा सत्कारणी लावतील

रिलेशनशिपमध्ये एकमेकांची मनं जपणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच ‘मनी’ म्हणजे पैसा जपणं देखील आहे. ‘प्रेम आणि लवीडवी संवाद’ हे तर गरजेचे आहेतच, पण सोबत स्वकमाईची योग्यजागी कशी गुंतवणूक करायची हे सुद्धा तुम्हा दोघांचं नेक्स्ट प्रायोरीटीचं काम आहे! हा लेख खास तुमच्या दोघांच्या कमाईला दिशा देण्यासाठी –

१. कर्ज फेडण्याचा पक्का प्लान नसेल तर कर्ज काढून प्रॉपर्टी विकत घेणं प्लीज प्लीज टाळाच. कारण पैशाची आवक-जावक नियंत्रित असेल तर संसारात सुद्धा लक्ष लागतं. बऱ्याचदा मिया-बीबीच्या भांडणाचं मूळ कारण अपुरा पडणारा पैसाच असतं. तुमच्याकडे स्वतःच घर असल्याचं समाधान असलं तरी ते घर मालकी हक्काचं आहे म्हणून आपोआप शांत झोप लागत नाही, त्यासाठी बँकेत पुरेसा पैसा सुद्धा असावा लागतो, नाही तर भाड्याच्या घरात सुद्धा झोप लागतेच कि! अंथरून पाहून पाय पसरणं म्हणजे काय ते हेच.

२. दुचाकी किंवा चार चाकी, रोज वापरणार असाल तरच घ्या.

३. साध्या-सोप्या पद्धतीने लग्न करा.

४. तुमची २०% मालमत्ता ‘लिक्विड’ स्वरूपात असावी म्हणजे तुम्हाला ती अडीनडीच्या वेळी वापरता येते. आणि महागयीचा चढता ग्राफ लक्षात घेता, जर का तुम्ही सगळीच मालमत्ता सेविंग अकाऊंट मध्ये ठेवलीय तर ऑलरेडी तुम्ही तुमचा पैसा गमावताय! अशा खात्यांमध्ये जास्त मोठी रक्कम ठेवू नका.

५. घर, गाडी माणसाला श्रीमंत बनवत नाहीत. तुम्ही किती बचत करता आणि ती सेविंग कुठे गुंतवता हे महत्वाच आहे.

६. आवाक्या बाहेरील गोष्टी विकत घेण्यासाठी क्रेडीट कार्ड वापरणं टाळा. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले ह्यांच्या संसाराचं गणित हे असंच होतं. त्या काळात क्रेडीट कार्ड्स नव्हते म्हणा, पण पैसे उसने घेणं आणि क्रेडीट कार्ड वापरणं सारखंच कि. फुले दाम्पत्य नक्की कसा संसार करायचे ते सगळं इथे सांगणं तसं शक्य नाही, पण मतितार्थ हा कि, क्रेडीट कार्ड वापरलं तर गरजेच्या वस्तूंसाठी वापरावं, चैनीसाठी नाही. (मग नवीन नेकलेस नाही घेतला म्हणून बायकोने २ दिवस अबोला धरला तरी चालेल. मी तर म्हणीन नेकलेस ऐवजी तिला २००-४०० रुपयाचं महात्मा ज्योतिबा फुले किंवा सावित्रीबाईंचा एखादं पुस्तक आणून द्या. लिंक पण इथेच दिलीय. घ्या मागवा.)

७. सुख वस्तूंमध्ये शोधण्यापेक्षा नात्यांमध्ये शोधा. पैसा गुंतवायचा असेलच तर आधी तो तुमच्या नात्यावर मग इतर गोष्टींमध्ये.

८. उत्तम आरोग्य हाच खरा दागिना. ह्याचा आणि पैशाचा काही संबंध नसला तरी एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेणं म्हणजेच भविष्यात आजारी पडून डॉक्टरला जाणारे पैसे वाचवण. एकत्र जॉगिंगला जा, एकत्र योगा क्लास जॉईन करा, थोडा रोमेंटिक पण वाटेल आणि उत्तम आरोग्य सुद्धा. सोबत नियमित हेल्थ चेकअप ठेवलात तर अजूनच मस्त.

बस.. नुसतं प्रेम करून नाही चालत ना.. दिल के साथ दिमाग पण वापरायचय. but always पहिली प्रायोरीटी ‘दिल‘ मग ‘दिमाग’.. आता तुमचं नातं यशवंत झालंच म्हणून समजा.

Related Posts

Leave a Reply