माझी कला आणि मी – आनंदाच्या शोधात

कलेची जोपासना करताना ‘समाधानी’ असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला ऐकणारे श्रोते तेव्हाच तुमच्या कलेचा आस्वाद घेऊ शकतात जेव्हा तुम्ही स्वतः तुमच्या कला निर्मितीच्या प्रक्रियेला एन्जॉय करता. एक म्युजीशियन म्हणून मला माझ्या ऑडीयंसला खूष करायचं असेल तर सर्वात आधी मी खूष असण गरजेचं आहे.

तुम्ही एखादी कला त्याचा देखावा करण्यासाठी शिकत आहात तर त्या कलेला तुम्ही किती पूर्णत्वाने आपलंस करू शकता या बद्धल मला जरा डाउट आहे. ‘गिटार शिकण्यामागच कारण काय?’, हा प्रश्न मी माझ्याकडे गिटार शिकायला आलेल्यांना कधी न कधी विचारतोच. कारण त्यांच्या उत्तरावर त्यांचं कलेसोबतचं भविष्यातलं नातं किती टिकेल हे मला समजतं. बरीच जण ह्याचं अगदी आयडियल उत्तर देतात सुद्धा (खोटं खोटं), पण ‘Action Speaks Louder Than Words’ ह्या लॉजिकने खरा कलेचा भक्त शब्दांशिवाय देखील ओळखता येतो.

थोडक्यात ‘तुम्हाला एखादी गोष्ट आवडते’ कि ‘समाजाला (तुमच्या मित्रांना) तुम्ही ती केलीत तर आवडेल’ म्हणून ती गोष्ट करण, ह्यात खूप फरक आहे.

ह्या दोघातला फरक समजन फार अवघड आहे तसं. कारण, त्यासाठी तुम्हाला स्वतःशी बोलता आलं पाहिजे. ते करत असताना स्वतःला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कोणत्या गोष्टी कंसीडर करून देता. मग ती उत्तरं तुमच्या सोबत असलेल्यांना किती पटतात; बर ती त्यांना पटो वा ना पटो, तुम्ही तुमच्या विचारांशी किती बांधील राहता यावर अवलंबून आहे.

तुमची आवड समाजाला पटो वा ना पटो, तुम्हाला ती खूप म्हणजे खूप-खूप आवडत असेल तर तुम्ही कोणाचाच विचार करत नाही. दारूचं व्यसन लागलेली व्यक्ती आणि कलेची आसक्ती लागलेली व्यक्ती, ह्या दोन्ही व्यक्ती माझ्यासाठी सारख्याच, कारण ह्या दोघांना पण त्यांची प्रिय गोष्ट काय हे कळलेलं असतं. पण जर का दारुडा बेझीजक दारू पिऊन त्याची आवड पूर्ण करतोय तर आपल्याला आपली कला जोपासन चुकीचं वाटनं चुकीचं आहे, नाही का?

म्हणून म्हणतो आपली आवड ओळखा आणि ती जोपासा, कारण जसं एक म्युजीशियन (किंवा कलाकार) म्हणून मला माझ्या ऑडीयंसला खूष करायचं असेल तर सर्वात आधी मी खूष असण गरजेचं आहे. तसंच एक व्यक्ती म्हणून तुम्हाला तुमच्या सोबतच्या माणसांना खूष ठेवायचं असेल तर त्यासाठी ‘तुम्ही’ खूष असणं गरजेचं आहे!

Facebook Comments

Related Posts

Leave a Reply