मौनाची भाषांतरे

कवी: संदीप खरे

कॉन्टिनेन्टल  प्रकाशन

संदीप खरेंचा पहिला काव्यसंग्रह…यातल्या 10-12 कविता आपण गाणी म्हणून ओळखतो ‘आयुष्यावर बोलू काही’ मुळे आणि अर्थातच ती गाणी कविता म्हणून उत्कृष्ट आहेतच…चंद्र, चांदणे तर आहेतच पण याव्यतिरिक्त विविध आणि unique विषय जसे की, मांजर, मर्सिडीज, मेंदू, अवयव, डहाळी, कंटाळा, झोप, बॉस, शिवण…यावरही कविता होऊ शकते हे कळले…त्यांची कविमनाची संवेदनशीलता प्रत्येक काव्यातून झळकते आणि थेट मनाला भिडते…मध्ये मध्ये पेरलेल्या चारोळ्या तर सर्वोत्कृष्टच आहेत…”मौन” असताना त्या त्या क्षणाशी प्रामाणिक राहून तेव्हा आलेले अनुभव, विचार यांचे कवितारुपी  “भाषांतर” अप्रतिमच झाले आहे…मुक्तछंदातल्या काही लांबलेल्या कविता मला फारश्या नाही आवडल्यात पण वृत्तछंदात जे आहे ते best आहे…

शिर्षक समर्पक वाटलं आणि “मौनाची भाषांतरे” हा शब्द, concept इतका आवडला की मलाही काही ओळी सुचल्यात:-

निःशब्द भेट ती घडली, नजरेत नजर गुंफियली

“मौनाचे भाषांतर” झाले, प्रीत डोळ्यांमधून झरली..।

ओठांवर जरी अबोली, हृदयी मन प्रीत उमलली

आतुर ऐकण्या तुजला, पळ घटका पण ही सरली…।

सलगी नजरेतून वदली, मौनाची कविता झाली

श्वासातून अनुरागाची, ती धून सुखावून गेली….

—–समृद्धी

 

पुस्तक online विकत घेण्यासाठी इथे click करा

 

 


डॉ समृद्धी रायबागकर, अमरावती

मी १३ वर्षापासून अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहे. गायन, लेखन, वक्तृत्व, वादन आणि वाचन ह्या सगळ्याची मला खूप आवड आहे.

Related Posts

Leave a Reply