माणसं हाताळण्याची कला – शिकायचीय का?

प्रश्न: असा कोणता गुण यशस्वी माणसामध्ये असतो ज्यामुळे ते मोठे होतात?

उत्तर: त्यांना माणसं हाताळण्याची कला अवगत असते.

आणि जर मी तुम्हाला सांगितलं कि हि कला एका दिवसात तुम्हाला शिकता येईल तर? खूष झालात ना 🙂 . कला लोकांशी व्यवहार करण्याची : “The Art of Dealing With People” हे पुस्तक जेव्हा मी वाचलं आणि समजून घेतलं तेव्हा मी देखील खूष झालो, म्हंटल सर्वात आधी ह्या बद्धल माझ्या वाचकांना सांगितलं पाहिजे.

ह्या पुस्तकाचे काही प्लस पॉईंट आहेत ते खालील प्रमाणे :-

१. तुम्हाला मोठी-मोठी पुस्तकं वाचायची सवय नसली तरी हरकत नाही. हे खूप छोटं पुस्तक आहे (म्हणून स्वस्त देखील आहे). एका बैठकीत आरामात वाचून होईल एवढं छोटं आहे ते.

२. आपली ध्येय साध्य करण, समोरच्या माणसाचा इगो(स्व) हाताळण, संभाषण करण्यात पारंगत होण, कशा वागण्याने दुसऱ्यांना चांगलं वाटतं आणि अशा भरपूर टिप्स तुम्हाला ह्या पुस्तकात मिळतील.

३. हि कला समजून घेतल्यावर व्यवसायातच नाही तर कौटुंबिक संबंधांमध्ये सुद्धा सुधारणा होतील.

४. काय करावं हे माहित असण जेवढ महत्वाच आहे तितकंच ते का करावं हे देखील माहित असायला हवं. संक्षिप्त स्वरुपात लेखकाने ह्यात अगदी मुद्देसूद ह्यावर भाष्य केला आहे.

५. लेखक याला ‘कला’ असं संबोधतो ‘तंत्र’ म्हणून नाही. ह्या गोष्टी तांत्रिक पद्धतीने न वापरता एखाद्या कलेप्रमाणे मनापासून कशा वापराव्या यावर भर दिला गेला आहे, म्हणून लक्षात ठेवायला सोप्प जातं.

६. मानवी स्वभावाला लक्षात घेऊन ह्या टिप्स लिहिल्या गेल्या आहेत, आणि हज्जारो लोकांवर त्या यशस्वीरीत्या वापरल्या गेल्या आहेत.

ह्या पुस्तकाने मला स्वतःला खूप फायदा झाला आहे, तो तुम्हाला सुद्धा हवावा म्हणून हा ब्लॉग लिहिण्याचा खटाटोप. पुस्तक आवडला तर नक्की शेयर करा. पुस्तक विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा. मराठी आवृत्ती. इंग्लिश आवृत्ती.

ता.क. – तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.

Related Posts

  • Reply राहुल पोवार September 12, 2018 at 6:01 pm

    अगदी परफेक्ट बोललात.. खूप खूप धन्यवाद.. मी अजून पुढल्या बुक्स बद्धलच्या रिव्ह्यू ची वाट बघतोय.

  • Leave a Reply