माझं चीज कोणी हलवलं?

Who Moved My Cheese? हे असं वेगळंच नाव वाचून ह्या पुस्तकात नक्की काय असेल ह्यांची उत्सुकता मनात निर्माण झाली. हातात घेतल्यापासून अवघ्या २ तासात पुस्तक वाचून झालं आणि एक वेगळच मानसिक समाधान मिळालं.

आपल्या रोजच्या कामात, व्यवहारात किंवा नातेसंबंधांत होणाऱ्या सततच्या बदलांना कसं समोर जावं ह्यांची ट्रेनिंग (गोष्ट वाचता वाचता) झाली. स्वतःला मदत करायला शिकवणारं आणि प्रोत्स्ताहन देणार हे पुस्तक.

काहींची मतं अशी पण आहेत कि, ‘ह्या पुस्तकात एक साधी सिम्पल गोष्ट तर आहे, त्यात काय एवढ!’

“हो, हि गोष्ट साधी आहे. त्यात काहीच वाद नाही. हवा सगळीकडे आहे, पण त्या हवेचा गारवा अनुभवण्यासाठी पंख्याची गरज लागते ना, तसं आहे ह्या पुस्तकाच. ह्यात सांगितलेल्या जवळ-जवळ सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असतील, पण त्याची जाणीव करून द्यायला हा पुस्तक रुपी पंखा तुम्हाला मदत करेल.”

पुस्तकाबद्धल थोडक्यात पुढील प्रमाणे:-

आयुष्यात होणाऱ्या बदलांना आपलंस करण थोडं अवघड असत. माझं चीज कोणी हलवलं? मध्ये लेखक स्पेन्सर जॉन्सन यांनी ह्या बदलांना सकारात्मक रित्या कसं बघता येईल हे सांगितलंय.

४ पात्रांची हि कथा, २ छोटे उंदीर आणि २ बुटकी माणसं, जे त्यांचं ‘चीज’ शोधतायत. आपलं चीज जेव्हा हलवलं जातं, संपत किंवा गायब होतं तेव्हा आपण वेगवेगळ्या ४ दृष्टीकोनातून कसे वागतो; ते ह्या ४ पात्रांच्या सहाय्याने सांगितलं गेलं आहे.

चारही पात्रे सुरुवातीला ‘चीज स्टेशन-सी’ वरून मिळणाऱ्या चीजच्या न-संपणाऱ्या पुरवठ्यामुळे खूष असतात. पण खरी गोष्ट सुरु होते ती जेव्हा पुरवठा कमी पडायला लागतो तेव्हा. ‘माझं चीज कोणी हलवलं?’ मध्ये ह्या अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात बेस्ट कसं वागता येईल हे सांगितलं गेलंय. बदलाला नाकारण्यापेक्षा किंवा दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आपण कशा प्रकारे आपल्या ‘चीज’ मध्ये होणारे बदल ते होण्याआधीच ओळखावे ह्यांची सल्ला मसलत लेखक ह्यात करतो. शेवटी वाचकांना समजेल कि बदलाचा परिणाम आपल्या प्रगतीवर होऊ नये यासाठी नक्की काय करावे.

हि गोष्ट त्या सर्वांसाठी आहे जे चांगली नोकरी, पैसा किंवा नातेसंबंधांमध्ये स्थर्य शोधत आहेत. आपण अशा परिस्थितींमध्ये अजिंक्य कसे राहावे हे या गोष्टीतून समजतं. १९९८ मध्ये प्रकाशित झालेलं हे पुस्तक सर्व वयोगटातल्या लोकांमध्ये फेमस झालं. ‘न्यू यॉर्क टाईम्स बिजिनेस बेस्टसेलर’ लिस्ट मध्ये ५ वर्ष राहील. आतापर्यंत २६० लाख प्रती विकल्या गेल्या आहेत. म्हणून तर यशवंत हो बुक लिस्ट मध्ये ह्याला ठेवलंय. मराठी आवृत्ती. इंग्लिश आवृत्ती.

ता.क. – तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.

 

 

Related Posts

 • Reply shweta September 11, 2018 at 8:47 pm

  The alchemist

  • Reply admin September 12, 2018 at 12:12 am

   तुला ह्यावर ब्लॉग लिहायचाय की? आम्ही लिहू असं म्हणायचंय श्वेता

 • Reply राहुल पोवार September 12, 2018 at 6:04 pm

  या आधीची दोन्ही पुस्तकं वाचली, (असे लेख लिहीत राह, अगदी आठवड्याला एक पुस्तक बोललात तरी वाचू) आता साध्य हे दिलेल्या लिंक वरून मागावलंय , लास्ट टाईम सारखं येईल 2 दिवसात.

 • Reply राहुल पोवार September 12, 2018 at 6:06 pm

  लहानपणी ७-८ वर्ष आधी वाचलेलं हे.. बट संग्रही असलेल काय वाईट आहे. थोडे फार विसरलेले मुद्दे रिवाईज होतील 🙂

 • Reply सबबी ज्या तुम्ही पुस्तक न वाचण्यासाठी देता - Yashwantho October 3, 2018 at 12:29 am

  […] मी बातम्या किंवा फुकटात आलेले Whatsapp मेसेजेस बद्धल बोलत नाहीय. तुम्ही किती वेळा तुम्हाला स्वतःला एखादी सुंदर कादंबरी वाचून किंवा आत्मचरित्र वाचून त्या शांत सुखाचा अनुभव घेऊ देता. डोक्याला थोडंस पेलवायला जड जाणाऱ्या सेल्फ-हेल्प बुक्सकडे आपण नंतर येउच, पण ज्यांना मुळात वाचनाचीच आवड नाही त्यांनी एखादी छानशी कादंबरी किंवा शोर्ट-स्टोरीजच पुस्तक वाचायला घेण्यात काय हरकत आहे? किंवा मग सुरुवात एखाद्या छोट्या पुस्तकाने करावी. उदाहरणार्थ – माझं चीज कोणी हलवलं? […]

 • Leave a Reply