माती

माझी ‘माती’ सुद्धा ह्यांनी रविवार बघून घेतली,

रडण्याच्या नावाखाली मित्रमंडळी भेटली,

 

जाऊ विचार केला होता रानी-वनी सन्यासाला,

सारी प्रपंचाची मेंढरं मला तिथंच भेटली,

 

होता दिवा उशाखाली म्हणून निश्चिन्त राहिलो,

माझी अंधारी झोपडी काल त्यानेच पेटली,

 

दिली जमिन मी सारी दान-धर्माच्या वाट्याला,

माझ्या पोरांनी ती पुन्हा त्यांना मारून घेतली,

 

केल्या अगणित फेऱ्या त्या न्याय मंदिराच्या,

माझं कुणीच ऐकेना, त्यांची खोटी ही रेटली,

 

आज रविवार आहे मी मेल्याच्या मातीचा,

मिसळलो मातीत जी कधी विकत घेतली!

 

-यशवंत (१०-०६-२०१८)

Related Posts

 • Reply Santosh pingale June 10, 2018 at 10:39 pm

  Apratim , pratyek shabd bolto

  • Reply admin June 23, 2018 at 7:21 pm

   abhari aahe Pingle dada 🙂

 • Reply TrenaJuicy June 26, 2018 at 1:27 am

  I often visit your page and have noticed that you don’t update it often. More frequent updates will give your blog higher rank & authority in google.

  I know that writing posts takes a lot of time, but you can always help yourself with miftolo’s tools which will shorten the time of creating an article to a
  few seconds.

 • Leave a Reply