प्रेम vs लग्न ‘इन रियालिटी’ unsuccessful love

प्रेम करण vs लग्न करण ‘इन रियालिटी’

‘लग्न करण्याआधी माझं त्या व्यक्तीवर आणि त्याचं/तिचं माझ्यावर प्रेम असायला हव!’ असं आपण बऱ्याच जणांकडून ऐकतो. तर मग आता ‘प्रेम असायला हवं’ हि कंडीशन लग्न करण्यासाठी महत्वाची आहे; हे आजकाल आपण सर्रास ऐकतो.

पण ‘प्रेम करण’ आणि ‘ लग्न करण’ ह्यांचा eligibility crieteria सारखा आहे का? I Mean to say ‘प्रेम करण’ आणि ‘लग्न करण’ ह्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी सारख्या आहेत का?

आणि जर का त्या सारख्या आहेत तर मग का लोकं प्रेमात पडतात पण लग्न करू शकत नाहीत..?
का असं होतं कि आज एकमेक्कांना ‘I Love You’, ‘मी तुझ्या शिवाय जगू शकत नाही’ असे वादे करणारे प्रेमवीर व्यावहारिक जीवन आणि त्यात होणारे खर्च लक्षात आले कि कोणतरी अजून चांगला जोडीदार निवडून भलत्या दुसऱ्यासोबतच लग्न करतात.?
कित्तेक दशकं उलटली तरी अजूनही ‘पैसे कमी आहेत’ ह्या कारणावरून जोडप्यांमध्ये ब्रेकप्स होतात का?
तुमच्या उत्तरात मुलीची किंवा मुलाची बाजू मांडा. Tell me ‘being a Guy’ or ‘being a Girl’ तुमचं ह्यावर काय मत आहे. पर्सनल किस्से किंवा अनुभव असतील तर आणखीन उत्तम.

Related Posts

 • Reply Nikhil Patel July 8, 2018 at 3:48 pm

  वास्तविक “प्रेम” हा वरवर सोप वाटणारा जगातील फार अवघड विषय आहे. ह्याला मुख्य कारण म्हणजे प्रेमाची एक अशी व्याख्या नाहीये, प्रत्येकाची प्रेमाची समज आणि उमज वेगळी असते. आता राहता प्रश्न राहिला प्रेम करणं आणि लग्न करणं, तर ह्या दोन्ही अगदी भिन्न गोष्टी आहेत असं माझं पक्कं मत आहे. ह्याचं कारणं म्हणजे “प्रेम” हे दोन व्यक्तींमध्ये असतं मात्र लग्न हि भारतात तरी दोन कुटुंबाना जोडणारी एक नाळ आहे आणि त्यामुळेच त्यातले खड्डे खळगे हे प्रेमाच्या गोंडस नात्यातून फार वेगळे आहेत. लग्न हि दोन व्यक्तींमध्ये होत असलं तरीही त्याची एकंदर सामाजिक आणि आर्थिक व्याप्ती पाहता उभयतांमध्ये कितीही प्रेम असलं तरी लग्नामध्ये…See More

 • Reply Mayuresh Palyekar July 8, 2018 at 3:49 pm

  Prem ani lagna hya don swatantra goshti ahet. Premat padna hi ek swabhawik ani swayambhu process ahe ji tharavun, samjun-umjun nahi karta yet. On the other hand, lagna ha ek tharaun, purna vichara-anti ghetlela decision asto… Premat materialistic goshti aad yet nahit… Lagnat matra don mansani materialistically ekmekanna compatible asna garjecha asta…

  Ani rahila prashna eligibility criteriacha.., tar ha criteria fakta lagnasathich asto.. Premala absolutely kuthlach criteria asat nahi.. Apan konachya premat padava, kinva konachya padu naye…, kadhi padava… Kadhi padu naye, kina premat padnyasathi kiti diwas thambava..aslya goshti apalyala nahi tharavta yet…

 • Reply Yogesh Vedak July 8, 2018 at 3:49 pm

  My life,my happiness,my rule,my space इतकंच जर समजत उमजत असेल तर कठीण जातं. मग कोणतंही नातं असो . ‘मी ..माझे’ यातला समतोल राखून सोबत ‘आपण ..आपले’ असा विचार करण्याची तयारी असेल तर गोष्टी तेवढ्या कठीण नाही होऊन बसणार . मग हे नव्यानेच लग्नं झालेल्या जोडप्याबाबतीत असो किंवा त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने जोडल्या गेलेल्या दोन कुटुंबाचे एकमेकांबाबत असो.
  नाहीतर
  “मी आणि माझा नारा (नवरा) ..बाकी नको कोणाचा वारा” अशी संकुचित विचारसरणी असेल तर खटके उडणारंच .
  आणि सरतेशेवटी फक्त पती पत्नी नात्याबद्दल च सांगायचं झालं तर , परिस्थिती कोणतीही असो(म्हणजे व्यवहारिक/सांपत्तिक/कौटुंबीक वगैरे परिस्थिती) किंवा भविष्यात येवो त्या सर्वा आधी “मुख्य” म्हणजे खरं प्रेम हे हवंच एकमेकांबद्दल. तेच निभावून नेतं . स्वभावात गुण , दोष , तफावत असायचीच आणि त्यातून भले रोज भांडत असले तरी चालून जाईल पण खरं प्रेम असेल तर “तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना” प्रमाणे नातं नक्कीच तुटणार नाही .

  आता प्रेम तिच्या सोंदर्यावर नाहीतर त्याच्या रॉयल एनफिल्ड वर भाळून होत असेल तर ते पुढे फसायचंच . 🙂 🙂

 • Reply Martin Sablero July 8, 2018 at 3:50 pm

  te kay aahe ‘I Love you’ bolnya evdhi maazi love story kadhi pudhe gelich nahi. ‘Tuzyat jiv rangla’ madhala Ranaa Da same mazya sarkhach aahe bagha. Tyamule mazi lovestory kadhi banalich nahi aani mag tila yashshviritya lagnat convert kartana kay adchni yetat te pan kalal nahi. Prashn changla vatla mhnun comment keli. Baki kahi vishesh nahi bagha.
  Ani bakichyancha Prem n karta lagn jari zaal, tari lagn zalelya bayko var prem karna tumhala jamala pahije kinva te karan bhag asat asa mhntla tari chalel. Sukhi aayushyachi pahili step aahe ti. Baki mi tari sadhya bramhacharich rahin mhantoy

 • Reply Adi July 14, 2018 at 12:58 pm

  प्रेम करणे ही एक निरागस गोष्ट आहे जी आपोआप होते.लग्न ही गोष्ट ठराऊन केली जाते आणि जेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट ठरऊन करता तेव्हा तुम्ही स्वतःला अनुकूल गोष्टी किती आहे याचा विचार नक्की करतात , म्हणूनच प्रेम कारण आणि लग्न कारणं याचा eligibility criteria सारखा नाही मग ते लव्ह marriage असो किंवा arranged. लग्न करण्याचा criteria प्रचंड मोठ्ठा आहे
  म्हणूनच आजकालची प्रॅक्टिकल पिढी आर्थिक दृष्ट्या अनुकूल असलेल्या व्यक्तीवर सोयीस्कर रित्या प्रेम करतात.
  नशीबवान असतात अशी लोक जी शून्यात असताना प्रेम करतात आणि आयुष्यभर टिकवतात.😇

 • Leave a Reply