लोकांचा कवी – लोकांपुढे

पाहिजे त्याला हवीतशी कविता करून देतो म्हणून मला DNA वृत्तपत्रानेने त्यांच्या एका लेखात ‘लोकांचा कवी’ असं संबोधलं होतं. त्यांनतर मी बऱ्याच ‘poetry meets’ मध्ये जाऊन माझ्या कविता सादर केल्या. तिथूनच मला ‘radio city 91.1’ सारख्या top class रेडियो वाहिनीने २ वेळा त्यांचा कार्यक्रम host करण्यासाठी बोलावलं. त्यांच्यासाठी महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम करण्याचं भाग्य मला लाभलं. यानिम्मिताने ‘मायबोली मराठीची’ थोडी तरी सेवा करता आली याचं समाधान मिळालं.

       नेहमीच यशस्वी पुरुषामागे एक स्त्री नसते बर का..!

planet-radioमला हि संधी ‘अनिश व्यवहारे’ मुळे मिळाली. ठाण्यातला एक साधा, पण असामन्य माणूस (त्याच्या बद्धल detail मध्ये पुन्हा कधी तरी सांगीन.) पुढे त्याने मला मे महिन्यात दिल्लीच्या एका कविसंमेलनात सुद्धा नेलं. तिथे उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्चिम सगळीकडून लोकं आली होती. ‘A Night of Thousand Poems’  मध्ये वेगवेगळ्या भाषांच्या हजार कवितांमध्ये मराठी कविता वाचणारा मी एकटाच होतो. Thank God लोकांना त्या समजल्या 😛 आणि बऱ्याच कवितांना त्यांनी टाळ्या वाजवून मजा आल्याची पोच पावती सुद्धा दिली 🙂 .

कधी ‘Poetry Tuesday Special Poet’ म्हणून तर कधी RJ मित्रांना स्क्रिप्ट लिहून देताना माझ्यातला कवी सतत active राहिला आणि यापुढेही राहील. हा लोकांचा कवी लोकांसाठीच लिहित राहील 🙂 . काही लिहून हवं असेल तर नक्की कळवा.

Related Posts