Live gig @ Aamby Valley

गेल्या काही महिन्यात बऱ्याच जागी परफोर्म केलं पण हा अनुभव ‘worth writing’ वाटला म्हणून लिहितोय.

‘Live gig’ म्हणजे ‘लाइव्ह शो’ करण्यात एक वेगळीच मजा असते, कारण त्यात बऱ्याच गोष्टी on the spot ठरतात. पण मागच्या रविवारी ‘Aamby Valley’ मध्ये केलेला शो भलताच वेगळा होता. तो पूर्ण कार्यक्रमच on the spot ठरला होता. आदल्या संध्याकाळी मला कॉल आला कि उद्या पुण्याला निघायचंय, निघण्याआधी सकाळी थोडा वेळ rehearsal होणार आहे… बस्स… माझ्या सोबत कोण असणार? त्यांच्यासोबत कोणती गाणी वाजवायची आहेत? हे काहीच माहित नव्हतं. ( मोठे मोठे कलाकार असेच कार्यक्रम करतात ऐकलेल 😛 )

सकाळी मिळालेली २०-३० गाण्यांची लिस्ट घेऊन आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो. तिथे (Aamby Valley मध्ये) बरेच असे अनुभव आले कि जे याआधी आयुष्यात कधीच अनुभवले नव्हते, for example :- Mercedes सारख्या top class गाडीतून आम्ही ‘Aamby Valley’ मध्ये पाहिजे तिथे फिरत होतो आणि हद्द म्हणजे आम्ही उतरण्याआधी ड्रायवर आमच्यासाठी पटकन उतरून दरवाजा उघडत होता. श्रीमंतीची दुसरी बाजू दाखवणारा पुढचा अनुभव म्हणेज तिथे पावभाजी २०० रुपयाला होती, ज्यासोबत मिळालेले पाव एखाद्या नवीन जन्माला आलेल्या बाळाच्या गालाएवढे नरम होते, पण त्या पावामधला मन उदास करणारा मुद्दा म्हणजे ते पाव आकाराला सुद्धा नवीन बाळाच्या गालाएवढेच लहान होते 😀 , घंटा पोट भरणार आहे त्याने माझं! हे असले चोचले करत बसलं तर स्वतःच पोट भरायला स्वतःचीच किडनी विकावी लागेल, असा विचार माझ्या मनात येऊन गेला. भलताच अनुभव नंबर ३ – संध्याकाळी २ Sandwich आणि ४ चहा मागवणार होतो, ज्याचं बिल ३,२५० रुपये (फक्त) इतका झालं, (म्हणून आम्ही ते मागवलच नाही.. साहजिक आहे यार).

बाकी, शो एक नंबर झाला. तामिर आमचा lead singer आणि सुकृत कहन वाजवणार होता. (‘कहन’ म्हणजे काय हा कोणाला पडलेला गहन प्रश्न असेल त्यांच्यासाठी सांगतो, ‘कहन’ हे ताल वाद्य आहे. जे ड्रम्स किंवा तबल्याच्या जागी वापरता येतं.) आम्ही BOLLYWOOD songs वाजवणार होतो तर त्या सोबतीला गिटार म्हणजे एक परफेक्ट कॉम्बिनेशन होतं.

खाकरा-ठेपला खाणारी सगळी गुज्जू मंडळी प्रेक्षक म्हणून लाभलेली, ज्यांना आम्ही अगदी पहिल्या गाण्यापासून शेवटच्या गाण्यापर्यंत नाचवत ठेवलं. थोडा वेळ तर मला समजतच नव्हतं नक्की कोण कोणासाठी परफोर्म करतंय. ‘हम्मा हम्मा’ पासून ते शोले च्या ‘मेहबूबा ओ मेहबूबा’ पर्यंत आणि आतिफच्या ‘पेहेली नजरमे’ पासून ‘पापा केहेते है’ पर्यंत सगळे मन मोकळ करून नाचले. कार्यक्रमानंतर रात्री घरी यायला थोडा उशीर झाला पण त्याचा hangover सोमवार पर्यंत राहिला.

Dated:- 27th March, 2017

Facebook Comments

Related Posts

 • Reply Prachi Mandlekar March 30, 2017 at 6:35 pm

  To good yaar yash sakal midea chya Yin chya eka event la tujya kavita tar mi nakki aaikalelya aahe but tuja ha pava cha kissa eka bala chya roopat sanghan khup gamtishir hot……….. तुजी बातच निराळी मित्रा,

  यशवंत हो 🙌

  • Reply Yashwant Didwagh March 30, 2017 at 6:44 pm

   Thank you so much Prachi 🙂

  Leave a Reply