लाडकी!

माझ्या ह्या शरिरावरी

जाहले अन्याय कीती,

आहे सर्व माहिती

तरी सांगण्याची रे भीती..

कोणी होता वडील कोणी

त्या समान वाटणारा,

अंग निर्बल खेचणारी

नावे ही सांगू किती,

कोणी भाऊ कोणी मित्र

भावनेशी खेळणारे,

मुलगी असणे पाप आहे

कलयुगी याची प्रचीती,

नाती ती सांगू किती मी

ज्यांनी मजला टाकले,

लाज माझी झाकणारे

कुणीही नाही सोबती,

फाटले ते दैव माझे

रक्त जेव्हा सांडले,

लग्न होण्या आधी माझी

नासली ग ही मती

खेळ आहे ज्यात माझे

खेळणे रे जाहले,

तेच होते खेळणारे

ज्यांची मी रे लाडकी!

-यशवंत दिडवाघ

फोटो क्रेडिट्स – मंदार आसबे

Related Posts

  • Reply Kabir Kore July 8, 2018 at 2:41 pm

    Nice

  • Leave a Reply