कुशल मंगल… being सिंगल

१. मनाला वाट्टेल तेव्हा आणि पाहिजे तसं भटकता येतं

तुम्हाला काय वाटतं.. तुमचा romantic पार्टनर तुम्ही उद्या सकाळी उठून अचानक भटकायला निघायचा प्लान केला तर काय reaction देईल?! अच्छा बरं.. आणि त्यांना न विचारताच गेलात तर .. तर जितका वेळ फिरण्यात गेला तितकाच त्यांना मनवन्यात जाईल.

सिंगल लोकं कुठेही कधीही फिरू शकतात. तुम्ही भटके आहात तर सिंगल राहण तुमच्यासाठी वरदानच आहे कि!


२. मन खोलून फ्लर्ट करा!

तुम्ही आता हे सत्य मान्य केलंच पाहिजे : तुम्ही सिंगल असो किंवा नसो, प्रत्येकाला फ्लर्ट करायला आवडतंच. हि flirting भोळ्या मनाने सुद्धा केली जाऊ शकते. पण शेवटी ‘पाप ते पाप’ त्याची शिक्षा तुमचा पार्टनर कधी तरी देणारच. कोणी सांगितलीय एवढी झंजट करायला. रहा सिंगल आणि करा फ्लर्ट बिन्दास्त.

३. टाईम वाचतो कि रे खूप सारा!

हा आता ‘गुल्लू गुल्लू प्रेमाच्या गप्पा’ मारायला सगळ्यांनाच आवडेल. पण तुम्ही कधी विचार केलाय हे करता करता आपल्या तरुण productive वयातला कित्ती महत्वाचा वेळ ‘अक्षरशः’ वाया जातो? आणि बऱ्याचदा तर ह्या गप्पा नंतर इतक्या सक्तीच्या होतात कि ‘यापेक्षा सक्त कारावास बरा’ असा विचार मनात येऊन जातो.

तुम्ही असा पार्टनर जरूर शोधू शकता जो असे फालतू चाळे करून टाईम पास करत नाही. पण मजेची गोष्ट म्हणजे अशी माणस कमिटेड कधी होतंच नाहीत. ह्या बॉलीवूडने प्रेम करण म्हणजे काय याची व्याख्याच बदलून टाकलीय. जाऊ द्या त्यापेक्षा सिंगल राहणंच बर.

४. करियर बनवायची डेड लाईन नाही + रात्री शांत झोप.

आपल्याला अमुक अमुक वयात लग्न करायचंच आहे. आणि मग घर.. मग मुलं, आणि मग..  हि लिस्ट नेवर ending आहे.! कोणी सांगितलंय कोणा तरी दुसऱ्याला सिक्युर लाईफ देण्यासाठी कुठलाही जॉब नुसत्या लठ्ठ पगारासाठी करायला? त्यापेक्षा आवडत्या क्षेत्रात पाहिजे तसं स्वतःच्या हिम्मतीला जमेल तशी प्रगती करायची. दिवस भर आवडतं काम केलेलं असतं कि मग रात्री शांत झोप पण लागते, त्यासाठी वेगळं काही करावं लागत सुद्धा नाही.


५. तुमची आवड जोपासता येते.

आवडती व्यक्ती असण्यापेक्षा आवडती सवय असण कधीही चांगलंच. कोणीतरी म्हंटलंय तुमची आवड ज्या गोष्टीवर अवलंबून आहे ती गोष्ट दुसऱ्या कशावर अवलंबून नसावी. तशाने तुमचा आनंद तुमच्या हातात राहत नाही. तुम्ही सिंगल आहात तर मग चला तुमच्या आवडी पूर्ण करायला घ्या, हाच मस्त चान्स आहे बाबा!


६. मित्रांसोबत जास्त वेळ.

भले भले लोक ‘प्यार आणि फ्रेन्डशिप’ मध्ये काय निवडतात हे तर जग जाहीर आहे. कारण मैत्रीत ‘बंधनं’ नसतात आणि प्रेमात ‘भांडण’ असतात, असं पण कोणी तरी थोर व्यक्ती म्हणून गेलाय. तुम्ही सिंगल आहात तर मित्रांना खूप वेळ देऊ शकता, आणि मैत्रीत असलेलं स्वातंत्र्य अनुभवू शकता.


७. खराब निवड करून बुचकळ्यात पडण्यापेक्षा सिंगल राहिलेलं बरं.

आजकाल जवळ जवळ ५० टक्के लग्न फेल होतात, ती कदाचित ह्याच घाई मुळे. लोक्कांना जास्त वेळ सिंगल राहायची लाज वाटते किंवा स्वतः सिंगल असल्याचा मनात कुठे तरी कमीपणा वाटतो. करून टाकतात मग घाईघाईत जमवा जमव आणि मग नंतर लागतात कोर्टाच्या पायऱ्या चढायला! त्यापेक्षा सिंगल रहा चिल्ल करा! खूप दुनिया बघायचीय अजून!

Facebook Comments

Related Posts

No Comments

Leave a Reply