कलयुग

.
लाकडाची कुऱ्हाड झाली, लाकूड लाकूड तोडू लागली,
लोखंडाला फितूर होऊन भावंडांना मारू लागली,
.
रीत जगाची फसवी कळले, रक्त रक्तास पिऊ लागले,
जनावरांना कोण घाबरे? माणसे स्वतःस भिऊ लागली..
.
पाऊस वारा आता न रमवी, चिंता असते ढगफुटीची,
जमीन सोडा! आभाळाला, ही माणसे विकू लागली..
.
वणवा कसला? कधी लागला? शोधत बसले इथे बापडे,
पैशाची ही आग पसरली, प्रत्येकाला गिळू लागली,
.
जालीम उपाय आहे कळला, इह लोक सोडायाचा,
वरती जाण्यासाठी सुद्धा भटजी बुकिंग करू लागली,
.
कलयुग आले म्हणता म्हणता कलकीनेही आत्महत्या केली,
अकरावा अवतार विष्णूचा लोकं इथली घेऊ लागली,
.
देव देखील सच्चा नाही कळले जेव्हा यशवंताला,
लेखणी त्याची एकाएकी ही गझल लिहू लागली..
.
.
.
ता. क. :- कवीच्या इतर कविता पुस्तक स्वरुपात वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Related Posts

  • Reply mayur July 5, 2019 at 2:35 pm

    Wa waa. Surekh. Chaan.

    • Reply admin July 5, 2019 at 3:38 pm

      धन्यवाद मयूर 🙂

    Leave a Reply