vachta vachta marathi blog

एका नवोदित वाचकाचा प्रवास

गेले काही महिने मी प्रत्येक आठवड्यात वाचलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल लिहित आलोय. आठवड्याला एक पुस्तक वाचून लगेच दुसरं पुस्तक हातात घेताना मला काही अडचणी जाणवल्या. त्या खालील प्रमाणे-

  • पुस्तक पूर्ण वाचून होतं, तेव्हा तुम्ही त्या पुस्तकाच्या प्रभावात राहणं पसंत करता, त्या पुस्तकासोबत तुम्हाला एक कनेक्शन जाणवायला सुरुवात होते. (नवीन आठवड्याला नवीन पुस्तक अशा गणिताने) लगेच दुसऱ्या पुस्तकाकडे वळण मला थोडं यांत्रिक वाटलं.
  • पुस्तक वाचून झालं कि पुढे थोडा वैचारिक ब्रेक घ्यावा असं वाटतं. (शाळेच्या मधल्या सुट्टीचं लॉजीक आता कळाल मला).
  • लेखकाने पुस्तकात सांगितलेले विचार दैनंदिन जीवनात Apply करण्यासाठी थोडा वेळ हवा. त्याच वेळेत कोणतं तरी दुसरं पुस्तक हातात घेणं थोडं घाईच होईल. एक न धड भाराभर चिंध्या नकोत आपल्याला.

आठवड्याला एक पुस्तक वाचून त्यावर ब्लॉग लिहिणारे किंवा व्हिडियो बनवणारे माझ्या माहितीमध्ये आहेत, पण मी तितका हुशार नाही. माझ्या बऱ्याच वाचकांनी अशी प्रतिक्रिया दिली कि आठवड्याला एक पुस्तक पूर्ण करू न शकल्याने ते स्वतःला थोडे कमी समजू लागले. (आणि वाचनाचा छंद सुरु होण्याआधीच संपला). आपल्याला वाचकांची संख्या वाढवायची आहे.

ह्या प्रवासात माझ्या हातात (माझ्या मते) तितकीशी चांगली नसणारी पुस्तकं सुद्धा पडतात. ज्याबद्धल मी लिहिण टाळतो. बरं.. मी वाचलेलं प्रत्येक पुस्तक तुम्हाला वाचू वाटेलच असा माझा अट्टहास नाही.

तुम्ही वाचलेलं पुस्तक कसं होतं हे नक्की कळवा. कारण मलाही तुमच्या पसंतीची पुस्तकं वाचायला आवडेल, त्याबद्धल इथे लिहायला आवडेल. महिन्याला निदान दोन ते तीन मंगळवार तरी मी तुमच्यासाठी नवीन पुस्तक घेऊन येईन. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात. कारण त्यामुळेच मला लिहायला आणि वाचायला प्रेरणा मिळते.

तुमच्या विचारात घर (Book) करणारा,

– यशवंत दिडवाघ

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *