जगणं वसूल

स्वप्न पहायला शिकलो की जगणं वसूल,
त्यातलं एखादं जगता आलं तरी जगणं वसूल..
.
उंच डोंगर, दुसऱ्याचा हात न धरता,
चढायला शिकलो तरी जगणं वसूल..
.
दहा गोष्टी मेहेनतीने कमवून,
त्यातली एक दान दिली तरी जगणं वसूल..
.
मनात आलेली लहानशी इच्छा मन न मारता,
पूर्ण करता आली तरी जगणं वसूल..
.
विद्यापीठाचे कागद नुसता पगार न देता,
माणूसपण देऊन गेले तरी जगणं वसूल..
.
आयुष्याचं फुल दगडी मूर्ती पायी न जाता,
‘तिच्या’ केसांत एक रात्रं विसावलं तरी जगणं वसूल..
.
स्वप्नांची रांग वाढत जाईलच एक एक करून,
बस्स..पाहिजे तेव्हा मरता आलं की जगणं वसूल..
.
.
.
.
ता. क. :- कवीच्या इतर कविता पुस्तक स्वरुपात वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Related Posts

Leave a Reply