the miracle morning 6 habits that will transform your life marathi book review

६ जादुई सवयी दिवस बनवणाऱ्या

आजकाल बरीच जण मोठ्या अभिमानाने बोलतात कि ‘रात्री लेट झोपून सकाळी लेट उठायची मजाच काही और आहे!’, किंवा… ‘सकाळी लवकर उठून कोणी मोठे झंडे गाडले आहेत म्हणा!’ (तुम्ही पण असं बोलता? तर आता फूल्ल अटेन्शन देऊन वाचा पुढचं) सकाळची वेळ तुम्ही नकोत्या गोष्टींमध्ये वाया घालवताय तर ‘यशस्वी भविष्य’ बनवणं फार अवघड आहे राव तुमच्यासाठी!

मी पण असंच काहीसं बरळत बसायचो. सकाळी उठल्या-उठल्या मोबाईल चेक करणं (उदा- watsapp – फेसबुक – इन्स्टा – युट्यूब – इत्यादी-इत्यादी). जगाचे अपडेट घेण्यात कधी वेळ जायचा कळायचं सुद्धा नाही. पण माझं हे सगळं बंद झालं जेव्हा मी एक पुस्तक वाचालं The Miracle Morning by Hal Alrod’ (जादुई सकाळ – लेखक हेल एल्रोइड)

हे पुस्तक वाचल्यानंतर सकाळच्या ताकदी बद्धल मला आश्चर्य वाटू लागलं. सकाळची ३०-४० मिनिटे प्लान करून ठेवलीत तर दिल्ली दूर नाही भाऊसाहेब! ह्या पुस्तकाच्या लेखकाला त्याच्या लहान वयातच खूप अडचणींना समोर जावं लागलं होतं. त्या सर्व अडचणींवर त्यांनी ह्या सवयींच्या मदतीने मात केली. (त्या अडचणींची लिस्ट मी आता सांगत बसत नाही. आपण मेन पॉईंट वर येउ.) ह्याच सवयींबद्धल त्यांनी ह्या पुस्तकात सांगितलं आहे.

आपल्यापैकी काही लोकं जन्मतःच नशिबवान असतात. जन्मापासूनच श्रीमंत असणं, दिसायला छान असणं, किंवा गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या घरात राहायला मिळण. हा झाला नशिबाचा भाग. पण अशा लोकांचं काय ज्यांना ह्या गोष्टी आधी पासून मिळत नाहीत?

त्यासाठी त्यांना त्यांचा स्वभाव आणि सवयींमध्ये बदल करावा लागतो. अर्थातच, हे बोलन सोप्पं आहे, करण अवघड! पण तुमच्या यशापर्यंत तेजीने वाटचाल करायला तुम्हाला ह्या सवयी जोपासन गरजेचं आहे.

‘जादुई सकाळ’ म्हणजे नक्की काय?

ह्या अशा सवयी आहेत ज्या तुम्हाला रोज सकाळी उठल्या-उठल्या करायच्या आहेत. आयुष्यभर!

बेसिकली, ह्या अशा सवयी आहेत ज्या तुम्हाला तुमचा दिशादर्शक बनून मार्ग दाखवतील. यामुळे बाकी लोकं त्यांच्या अंथरुणात आहेत तोवरच तुम्ही इतकी कामं केलेली असतील कि ज्याची तुम्ही आता कल्पना सुद्धा केली नसेल. तुम्हाला हळू हळू समजेल कि यशस्वी लोकं सकाळी लवकर तुम्ही त्यांची जास्तीत-जास्त कामं का आटोपून घेतात.

ह्या सवयी तुम्हाला यशस्वी होण्याचा खडतर मार्ग सोप्प्या दृष्टीकोनातून बघायला शिकवतील.

लेखकाने यासाठी एक शोर्ट-फॉर्म वापरला आहे,

‘S-A-V-E-R-S

S- Silence 

A- Affirmation

V- Visualization

E- Exercise

R- Reading

S- Scribing

 

S– Silence – ध्यानधारणा करण.

तुम्हाला तुमचं डोकं थोड्या वेळासाठी शांत ठेवायचंय. आपले विचार आणि भावना नियंत्रित करण्यासाठी याचा खूप उपयोग होईल. ह्या गोष्टींवर नियंत्रण म्हणजे तुम्ही यशस्वी झालाच म्हणून समजा!

याआधी कधीच ध्यानधारणा केली नसेल तर गांगरून जाऊ नका. सोप्पय खूप. बस्स, एका जागी शांतचित्ताने बसायचं आणि ५ मिनिटचा टायमर लावायचा (मार्केटमध्ये असे टायमर उपलब्ध आहे. ह्या लिंक वर.) तुम्हाला स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. बाकी कसलाच विचार नाही. हे करत असताना बाकी विचार येणं सुरुवाती-सुरुवातीला साहजिक आहे. तसे विचार येऊ द्या ते आपोआप थोड्या वेळात निघून जातील. नको तो विचार आला म्हणून विचार न करण्याचा विचार करण पण विचार करण्यासारखंच आहे कि! आलेला विचार म्हणजे एक फुगा आहे असं समजून तो मनातल्या मनात फोडून टाका. श्वासावर लक्ष असू द्या, मग बाकी विचार जातील नकळत आपोआपच.

A- Affirmation – सकारात्मक विचार.

तुम्हाला तुमच्या आदर्श राहणीमानाबद्धल विचार करायचा आहे. एका कागदावर वर्तमान काळात वाक्य लिहायची. तुम्हाला जशी जिदंगी हवीय त्या बद्धल. मग पूर्ण फील घेऊन त्याच वाक्यांना रिपीट करायचं. तुम्हाला आठवड्याला एक पुस्तक वाचून काढायचंय तर कागदावर तसं लिहा. ‘मी दर आठवड्याला एक पुस्तक वाचतो’. किंवा असं कोणताही काम. मग ते ‘वेळेवर ऑफिसला जाण’ असेल किंवा ‘आर्थिक उत्पन्न वाढवण’ असेल. सगळ्या गोष्टी वर्तमान काळात कागदावर लिहा.

तुमच्या ध्यानधारणे नंतर हे सकारात्मक विचार तुम्हाला रोज वाचायचे आहेत.

V- Visualization – बघणं.

५ मिनिटांसाठी तुम्ही तुमच्या परफेक्ट लाईफ बद्धल विचार करा. एक मोठ्ठा श्वास. आणि आता अशी कल्पना करा कि तुम्ही आता ह्या क्षणाला तसं आयुष्य जगत आहात.

असं केल्याने तुम्हाला दिवसभरासाठी एक ‘चावी’ लागते. चावी फिरवलेलं खेळण कसं टपा-टप टाळ्या वाजवू लागतं. आपलं पण तसच असतं 😉 . ह्यामुळे तुम्हाला दिवसभरासाठी प्रेरणा मिळते.

E- Exercise – व्यायाम. २० सूर्यनमस्कार आणि ५ किलोमीटर धावायला जाण्याची गरज नाही.

हे तर खरंच खूप सोप्पंय. सकाळी-सकाळी रक्तप्रवाह संपूर्ण शरीरातून सुरळीत चालू झाला कि डोळ्यांवरची झोप उडून जाते. यासाठी जागच्या जागी थोड्या उड्या मारल्या तरी पुष्कळ झालं. किंवा फार-फार तर ५-६ पुश्-अपस् खूप झाल्या! तुम्हाला फक्त तुमचा रक्त प्रवाह वाढवायचाय.

R- Reading – वाचन.

रोज उठल्या उठल्या आंघोळ करण, हि झाली शरीराची स्वच्छता. तसच चांगल्या पुस्तकाच वाचन हि झाली बौद्धिक स्वच्छता. आणि कृपा करून उठल्या-उठल्या वर्तमानपत्र वाचण टाळा. त्यात अर्ध्याहून अधिक नकारार्थी गोष्टीच असतात. अशी पुस्तकं वाचा ज्यातून चांगलं काहीतरी शिकायला मिळेल. अशा पुस्तकांबद्धल YashwantHo वर आम्ही बरेच ब्लॉग्स लिहिले आहेत. तुमची वाचनाची गोडी वाढायला हवी.

जास्त खोल जाऊन वाचण्याची गरज नाही. बस ५ मिनिट वाचलं तरी खूप झालं. मी स्वतः कविता किंवा गझलांची पुस्तकं वाचतो. किंवा एक १०१ प्रेरणादायी कथांचं पुस्तक आहे ते पण ट्राय करायला हरकत नाही. रोज एक छोटी गोष्ट वाचली तरी बस!

S- Scribing – लिहिणं.

तुम्हाला आत्मचरित्र लिहायचं नाहीय ह्यासाठी. एक वही बनवा ज्यात ५ मिनिट रोज तुम्हाला तुमच्या लाईफ बद्धल लिहायचंय. थोडा वेळ काढून तुम्हाला तुमच्या भावनांबद्धल लिहायचंय. तुमच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही गुणांकडे लक्ष असुद्या. एकदाचं मनात पक्कं ठरवा, पुढे काही वर्षांनी तुम्ही खरोखर यशस्वी व्हाल (हो ह्याची १००% शाश्वती आहे!) तेव्हा ह्यातले किस्से खूप कामाला येणार आहेत, दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी.

मी बहुदा माझं डेली रुटीन लिहितो, मला दिवसभरात काय करायचंय ते. ‘टू-डू लिस्ट’ म्हंटलत तरी चालेल त्याला. ह्यामुळे मला माझा दिवस कोणत्या दिशेने घालवायचा आहे ह्यांची कल्पना येते.

अति परिणामकारक लोकांच्या ७ सवयी – 7 Habits of Highly Effective People’ पुस्तकात पण ह्या अशाच मुद्यांवर लिखाण केलेलं आहे.

ह्या सवयी तुम्हाला तुमच्या आयुष्याचं कोणतही ध्येय मिळवून देण्यासाठी मदत करतील. जे कोणी ह्यांना अवलंबतात त्याचं इन्कम वाढतं किंवा नातेसंबंध सुधारतात, शारीरिक स्वास्थ्य सुधारत खूप-खूप काय-काय करता येतं ह्या सवयींमुळे!

मी स्वतः ह्या मुळे खूप आनंदी आहे. चहा कॉफीची सवय मला नव्हतीच कधी, पण ह्या ६ सवयी चहा-कॉफी पेक्षा खूप इफेक्टिव आहेत. चहा सोडू नका, पण निदान ह्यांना फॉलो करण आजपासूनच सुरु करा.

ब्लॉग आवडला असेल तर मित्रांसोबत शेयर करा, त्यांना पण त्यांची स्वप्न पूर्ण करायची असतीलच कि! आणि ह्या सवयीमध्ये तुम्हाला अजून काही सजेशन्स द्यायचे असतील तर बिंदास द्या खाली कॉमेंट्स मध्ये. इथपर्यंत वाचल्याबद्धल धन्यवाद! मंडळ आभारी आहे.

ता.क. – तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं (चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.

  • Reply जोशी निरंजन दत्तात्रेय निशिगंधा August 21, 2018 at 9:14 pm

    खूपच सुंदर, नक्की याप्रमाणे आयुष्य जगेन आणि अनुभव आला की इतरांना ही सांगेन…

  • Reply pravin August 23, 2018 at 9:32 am

    Nice one

  • Reply राहुल पोवार September 12, 2018 at 5:59 pm

    खूपच सुंदर.. तूमच्या सांगण्यावरून बुक दिलेल्या लिंक वरून मागवलं, वाचून काढलं, गेल्या आठवड्यापासून त्यात सांगितलेल्या गोष्टी करायला सुरुवात पण केली.. अप्रतिम अनुभव 🙂 धन्यवाद.

  • Leave a Reply