काळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव

आपला समाज इतका शिकला सवरलेला नव्हता तो काळ म्हणजे १८००-१९०० सालचा. किंवा त्याही आधीचा. ह्या काळात असलेला पुरुषाचा स्वभाव आणि स्त्रीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन वेगळाच होता. तसच स्त्रियांचा पुरुषांकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा होता. तर ह्यावरच आमचा प्रश्न आहे.

असं काय आहे ज्यामुळे मुलांची टिप्पीकल पुरुषी दादागिरि (किंवा पुरुषी अहंकार म्हणा हवं तर) आणि मुलींची ताईगिरी (मुलींची घरगुतीकाम करण्याची पद्धत)  यात बदल झाला? पाहिलं तर सांगा तुमच्या मते असा कोणता बदल झाला आहे का? कोणते स्पेसिफिक बदल सांगायचेअसल्यास प्लीज आवर्जून सांगा.. आणि हो.. सर्वात महत्वाच म्हणजे ‘हे बदल योग्य आहेत का?’.

Facebook Comments

Related Posts

6 Comments

 • Reply shubham beluse December 29, 2016 at 7:24 pm

  Ho badal zala ahe.
  Aata chya striya ani 1800-1900 striyan madhye khup motha farak zala ahe. Aata chi generation khup fast generation ahe. Ani aatachya striya well educated aslya muke swatach kamavtat tyana konachya aadharachi garaj lagat nahi .
  Ani ha badal khrch khup mahatvacha ahe

 • Reply Shreya Vartak December 30, 2016 at 4:35 am

  काळ बदलला आहे पण 100 % नाही!
  आपण वेस्टर्न culture follow करतो पण हळू हळू आपण आपली भारतीय संस्कृती विसरत चाललो आहोत.
  शिक्षणा मुळे काळ बदलला आहे पण त्या शिक्षणा चा उपयोग काय जर स्त्रियांनी आरक्षणाचा हक्क गाजवून माणुसकीच विसरली तर??
  पूर्वी च्या काळी स्त्रियांना आदर होता , आता आपण gender equality मुळे तो स्त्रियांसाठी आदर विसरत चाललो आहोत. आजही काही ठिकाणी मुलींच्या कपड्यांवरून तिचं character judge होतं. मुलीने छोटे कपडे घातले म्हणजे मुलांना invitation to friendship/ hook up नाही. हा विचार आता बदलला पाहिजे.
  जग technology मुळे खूप पुढे चालले आहे, आपणही तसेच प्रगती करत आहोत,पण ह्या सगळ्या प्रगती मध्ये आपली भारतीय संस्कृती विसरून चालणार नाही!

 • Reply Shrutika Manchkar December 30, 2016 at 6:42 am

  Kaal ter khupach badalela ahe. Jithe shikshan ter ahe pan tyasobat changlya vicharanchi jod rahileli nahi. Attache generation ase sidha karaun dakhavte ki shikshan ani changle vichar hyacha kahi sambhand nahi. Purvi chya kaalat bhale shikshanala itke mahatve dele jaat nawhate pan sanskruti zopasane, manusaki dakhavne ani lokanchya bhavnana samjun tyachya sukh dukhat sahabhagi hone hyat khup motha pratisaad asaycha.. Pan attache lok he sagale visarat challe ahet. Jithe apala faayda nahi tithe apale kahich kaam nahi ashi vaagnuk hot challi ahe.. Lok ata fakt fake zale ahet.. Changlyanshi apulaki ani konabaddalche dukhah he ata fakt social networking sites varach disun yete pratyekshat kunala kahi padleli nasate. To fakt swahtala entertain kase karata yeil hyat magn zalela ahe.. Bolayche zale ter hya bhavya attachya samajat sagale available asun pan tyane swahtala khup ekte karun ghetale ahe. Women’s related law baddal bolayche zale ter hyacha jo gairfaayda ghetla zaat ahe toh thambavala pahije nahiter purush samaj itka ghabrun jagayla lagel ki equality ter durach rahili ha samaj women dominating houn jail..

 • Reply Amir Phadatare December 31, 2016 at 6:22 am

  काळानुसार बदलला नाहीत तर काळाच्या प्रवाहात हरवून जाल.! हे ञिकालबाधित सत्य आहे. पुरुषांचा आणि स्त्रीयांचा स्वभाव त्याला अपवाद नाहीत. एक काळ होता जेव्हा स्त्रीयांना सामाजिक सांस्कृतिक बंधनात बांधल जायच त्याना अभिव्यक्ति स्वतंत्र अस न्हवतं, पुरुष प्रधान संस्कृतिमुळे पुरुषी अहंकार , मीपना, स्ञीयांना दुय्यम वागणुक अशा सामाजिक विषमता होत्या, काळ बदलला आणि वेळही. आता स्ञीयां पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वागु वावरु लागल्या, स्वतावरची बंधन झुंगारुन स्वत:च स्वतासाठीच व्यासपीठ वाढवू लागल्या, स्वताच्या गरजा पुर्ण करायला पुरुषांवर अवलंबुन न राहता त्या कष्ट करु लागल्या परिणामी पुरुषांचा स्ञीकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलला, स्ञी-पुरुष समानता हे तत्व आमलात येऊ लागलं. हा बदल लगेच किंवा अचानक घडला नाही या बदलाला एक सामाजिक, वैचारिक क्रांती घडावी लागली, एक काळ लोटावा लागला. काही समाजसुधारकांनी यासाठी आपलं जीवन खर्ची करुन या बदलाचा पाया घातलाय. आजची शिक्षण व्यवस्था, स्ञी संरक्षणाचे कायदे, समानता, एकमेकांना दिली जानारी वागणुक हे सगळ याच भक्कम पायावर उभं आहे. आपल्या संस्कृतित स्ञी-पुरुषांना स्वतचं वेगळ वलयं सुरवातीपासुनच आहे यात बदल हा काळानुसार झाला, या वलयाला वैचारिक, शैक्षणिक, समानतेची लकाकी मिळाली आणि पुरुषांचा मीपना, स्ञीयांचा दुबळेपना त्यात विरुन गेला एवढंच.! कुणीतरी म्हणलयं- The world as we have created it is a process of our thinking. It cannot be changed without changing our thinking.” काळ बदलला त्यामुळं स्ञी-पुरुषांचे विचारही..! असो nothing is permanent.. काल वेगळा होता,आज वेगळा, अनं उद्या काही वेगळचं..!

 • Reply अनोळखी January 7, 2017 at 8:01 pm

  खूप छान उपक्रम आहे.. पण फेसबुक प्रोफाईल MUST आहे का किंवा आपली identity सांगणं?

  • Reply Admin January 7, 2017 at 8:02 pm

   नाही.

  Leave a Reply to Shrutika Manchkar Cancel Reply