त्याला तिच मदत करू शकते

मुंबई-कोल्हापूर सेमी-स्लीपर बस. ओवर-नाईट प्रवास. वेळ रात्रीचे १०.३०. मुलगा झोपण्याच्या तयारीत होता.

‘सीट जेवढी मागे करता येईल तेवढी करू’ असा विचार करत तो सीट मागे करणार तितक्यात..

‘Excuse Me’

मागे बसलेल्या मुलीने त्याला हटकलं.

‘मी माझ्या laptop वर काम करतीय आणि तुमच्या असं बसण्यामुळे मला अडचण होतेय! तुम्ही सरळ बसू शकता का?’

‘का?’

तो अजून पुढे काही बोलण्याआधीच त्याची बायको मध्ये बोलली,

‘माझ्यामते हि झोपण्याची वेळ आहे, आणि सगळ्यांच्याच सीट्स अशा आहेत’

त्या मुलीने मग पुढे काहीच वाद घातला नाही, बाजूच्या मुलीसोबत काहीतरी खुसुर-पुसुर केलं, पण त्याचा काही उपयोग नव्हता.

आणि मग आपलं जोडपं ख़ुशी-ख़ुशी ने झोपी गेलं : ) .

किस्सा खतम!

पण.. जर का हा मुलगा एकटाच प्रवास करत असता, तर त्याला असं उत्तर देता आलं असतं का? हा किस्सा इतक्या सहज संपला असता का? त्या मुलाला तेव्हाच्या तेव्हा झोपता आलं असतं का?

“समाजात वावरताना पुरुष कितीही बळकट-दणकट-हुशार असला तरी ‘एका स्त्री’ सोबत त्याला त्याच्या लिमिट्स मध्ये राहूनच वागावं लागतं, आणि वेळ प्रसंगी त्याला एका स्त्रीची मदत घ्यावीच लागते!”

———

मान्य आहे कि एका घटनेवरून आपण हवा तो तर्क लावणे ठीक नाही, पण ह्यावरून मला WWF रेसलिंग मधला ‘The Rock’ चा एक किस्सा आठवला.

किस्सा पुढीलप्रमाणे…

०१ रॉक दादाला एकीने चेतवले

 

०२ रॉक दादाला चक्क कानाखाली सुद्धा मारली

 

०३ रॉक हतबल – काहीच न करता माघार

 

०४ त्याला एक मुलगी सोबत देते

 

०५ लफडा!! लफडा!!

 

०६ लफडा!! लफडा!! लफडा!!

 

०७ कारण त्याला ‘तिच’ मदत करू शकते

 

०८ Happy Ending!!

 

 

Source :- https://www.youtube.com/watch?v=PL5lUJriUSk

हा पूर्ण किस्सा स्क्रिप्ट नुसार केला गेला होता हे खरंय, पण स्क्रिप्ट्स सुद्धा खऱ्या आयुष्यावरूनच तर सुचतात.

आणि मुलींनो आता तुम्हाला ठरवायचंय ह्यातली तुम्ही नक्की कोणती मुलगी आहात.

हो आणि तुमची गरज तुमच्या आस-पासच्या प्रत्येक (अबला) पुरुषाला आहे, ‘So Please , Do The Needful : ) ’.

ब्लॉग आवडला असेल तर प्लीज..  ‘Like’ ‘Comment’ & ‘Share’

तुमचा पण असा कोणता किस्सा असेल तर प्लीज फील फ्री टू शेयर इट!

Related Posts

  • Reply Niranjan D. Joshi July 14, 2018 at 12:13 pm

    आणि याचा big boss मधल्या कोणाशीही काहीही संबंध नाही…

    नाहीतर लोकांना वाटेल, तो जो मैत्रिणींची मदत घेतो वगैरे वगैरे…

    असो!

  • Leave a Reply