गझल सुचली

.
आयुष्य २-२ ओळीत मांडलेली गझल सुचली मला,
त्यातली एक-अन्-एक ओळ खोल आत पटली मला,
.
काल स्वप्नांना डावलून केलेली लठ्ठ पगार-नोकरी,
आज रात्रीच्या स्वप्नांमध्ये टोचली मला,
.
कदाचित माझा आळसंच नडला असेल नेहमी,
प्रत्येक गोष्टीची शहानिशा करण्याची हौस कुठली मला,
.
शिक्षकांनी उजव्या हाताने फटके दिल्या नंतर आणि,
जिंदगीने धक्के दिल्या नंतर अक्कल सुचली मला,
.
मनात आलं जगाची रीत अशीच असते का?
की नेहमी शेंडी लावणारी लोकंच भेटली मला!
.
ही गझल लिहिता लिहिता शहाणा झालोय वाटतं,
कारण छोटी मोठी प्रत्येक चूक माझीच दिसली मला,
.
प्रयत्न करण्याची उत्कट इच्छा माझ्यात आहेच,
बाकी यशापयशाची गणितं कुठे सुटली मला!
.
यश नाही मिळालं तरी शेवटच्या ओळीत ‘यशवंत’ नाव लिहिणच,
 ‘नाम में क्या रखा हैं’ ची सवय कुठली मला!
.
.
-यशवंत दिडवाघ
.
.
.
ता. क. :- कवीच्या इतर कविता पुस्तक स्वरुपात वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Related Posts

 • Reply शेखर गायकवाड June 27, 2019 at 1:28 pm

  अप्रतिम नेहमी प्रमाणे!!👍👍

  • Reply admin July 5, 2019 at 3:39 pm

   आभारी आहे शेखर 🙂

 • Reply Pranali June 27, 2019 at 11:31 pm

  Khupach Chan

  • Reply admin July 5, 2019 at 3:38 pm

   🙂 धन्यवाद

  Leave a Reply