फार थोड्या

 .
हृदयाच्या जखमा खूप खोल इजा करून जातात,
घाव दिसत नाहीत ते म्हणून तर लोक फसून जातात..
 .
घरं का वाढली इथली इतकी मी विचारलं बऱ्याचदा ,
ते म्हणाले ‘कारण इथे पिल्ल मोठी झाली की घरट्यातून उडून जातात’..
 .
अंत जवळ आला की रंग बदलण्याची प्रथा जुनीच आहे की,
या लाल रक्ताच्या पेशी सुद्धा मरु लागल्या की काळ्या होऊन जातात,
 .
फारच थोडे असतात (असामान्य) जगण्याला अर्थ देणारे,
नाहीतर बाकी लोक तर नुसतेच जळून जातात,
 .
मनाचे श्लोक मनापासून म्हणणारे कमी उरलेत खरंय बुवा,
ते कितीही मोठी मंदिरं आली तरी दुरूनच पाया पडून जातात,
 .
शाळेत सोडवलेल्या गणितांचे कागद रद्दी असतात कोणासाठी,
तर कोणासाठी पावसात सोडायच्या होड्या बनून जातात,
 .
बरीच वर्ष मनाच्या भिंतींवर साठलेल्या आठवणी,
लक्ष न दिल्यामुळे धुळीच्या जाळ्या बनून जातात,
 .
आयुष्यभर इतरांच काव्य खूप वाचल, अभ्यासल तरी..
जवानीत सुचलेल्या कविताच म्हातारपणीच्या काठ्या होऊन जातात,
 .
दगडी मारणारे दगड, दगड फोडणारे दगड खूप आहेत,
पण हजारात मोजकेच खडे असतात जे हिरे ठरून जातात,
 .
धनवंत खूप आहेत जगात, किर्तीवंत ही अमाप,
मोहापासून अलिप्त फार थोड्या वल्ली, ‘यशवंत’ बनून जातात..
 .
-यशवंत दिडवाघ
.
.
.
ता. क. :- कवीच्या इतर कविता पुस्तक स्वरुपात वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Related Posts

Leave a Reply