सबबी ज्या तुम्ही पुस्तक न वाचण्यासाठी देता

वाचून झालेल्या पुस्तकांबद्धल गेला एक महिना मी दर मंगळवारी माझं मत ह्या ब्लॉग वर पोस्ट करतोय. ह्या मागचा ‘पवित्र’ हेतू हा कि माझ्या परिचयातील लोकांनी पुस्तकं वाचण्यास जोमाने सुरुवात करावी. ह्या उपक्रमानंतर  काही अंशी माझ्या मित्रांनी पुस्तकं वाचून काढली देखील, काहींची अर्ध्यात आहेत. काही ‘मी वाचायला घेईन नक्कीच’ ह्याच विचारात आहेत. मग म्हंटल ह्या विषयावर थोडं लिहावं. (तरी (माझंच) नशीब कि पुस्तकं नाही वाचली तरी हे ब्लॉग्स तुम्ही वाचताय!)

तुम्ही तुमच्या दररोजच्या वेळापत्रकात किती वेळ वाचता?

मी बातम्या किंवा फुकटात आलेले Whatsapp मेसेजेस बद्धल बोलत नाहीय. तुम्ही किती वेळा तुम्हाला स्वतःला एखादी सुंदर कादंबरी वाचून किंवा आत्मचरित्र वाचून त्या शांत सुखाचा अनुभव घेऊ देता. डोक्याला थोडंस पेलवायला जड जाणाऱ्या सेल्फ-हेल्प बुक्सकडे आपण नंतर येउच, पण ज्यांना मुळात वाचनाचीच आवड नाही त्यांनी एखादी छानशी कादंबरी किंवा शोर्ट-स्टोरीजच पुस्तक वाचायला घेण्यात काय हरकत आहे? किंवा मग सुरुवात एखाद्या छोट्या पुस्तकाने करावी. उदाहरणार्थ – माझं चीज कोणी हलवलं?

पण तरी ह्यात कारण देणारी लोकं आहेतच. मला मिळालेली कारण खालील प्रमाणे –

 • माझा शोन्या (कुत्रा, मांजर, गोल्डफिश किंवा असा कोणताही पाळीव प्राणी) आजारी होता रे (SAD FACE इमोजी)!
 • यार हि पुस्तकं वाचन म्हणजे खूप टाईम लागतो रे, माझ्यात तेवढा संयम नाही मित्रा.
 • माझा चष्मा हरवलाय रे कधीपासून.
 • हि पुस्तकं खूप जड असतात, कोण वागवेल त्यांना रोज रोज (Kindle माहिती नाही वाटतं दादाला!)
 • मी पुस्तक वाचायला घेतलं आणि ते बोरिंग निघालं मग? (माझा ब्लॉग वाच कि लेका पुस्तक वाचायच्या आधी)
 • पुस्तक वाचता-वाचता मला झोप येते रे. (आता ह्याला काय बोलू!)
 • माझ्या घरात वाचायला बसता येईल अशी जागा नाहीय (म्हणजे हा दहावी पर्यंत पुस्तकं न वाचताच पास झाला)
 • झोपायच्या आधी टी.व्ही. बघितलं कि मस्त वाटतं रे (रोज झोपण्याआधी २०-३० मिनिट पुस्तक तर वाचून बघा.)
 • अभ्यासाची पुस्तकं वाचून कसा-बसा पास झालो आणि आता अजून कशाला डोक्याला ताप!

आता सत्याला सामोर जाण्याची वेळ आलीय. वरच्या कारणांपैकी तुम्ही पण एखादं कारण पुढे करून पुस्तकं वाचन टाळलंय का? कन्फेशन टाईम मित्रांनो. खाली comment करा तुमची सबब पुस्तक न वाचण्याची. तुमच्या (पुस्तक वाचण्यात) आळशी मित्रांसोबत शेयर करा हे.


Upcoming Book Blogs on Think and Grow Rich , The Code of The Extraordinary Mind

Related Posts

 • Reply जोशी निरंजन दत्तात्रेय निशिगंधा October 3, 2018 at 10:25 am

  हे वाचनाची आवड असून सवड न काढणार्यांसाठी देखील आहे…
  अर्थात मी ही त्यातला एक… So आता घेईन वाचायला.. आणि कळविन

  • Reply admin October 3, 2018 at 12:06 pm

   हो.. मी तुझ्या प्रतिक्रियेची वाट बघीन 🙂

  Leave a Reply