गिटार शिकायला किती वेळ लागेल!

नवीन नवीन गिटार शिकताना तुम्ही हा प्रश्न विचारणार हे साहजिकच आहे. मग मी म्हंटलं प्रत्येकाला तोंडी किंवा Chat वर उत्तरं देण्यापेक्षा इथे सविस्तर ब्लॉग लिहून काढू.

महत्वाचे मुद्दे –

  • तुम्ही किती वेळ गिटार वाजवता आणि किती वेळ सराव (Practice) करता.
  • तुमची सरावाची वेळ तुम्ही कशी घालवता.
  • तुमची आकलन शक्ती (grasping power) किती आहे.
  • तुमची नवीन गोष्टी शिकण्याची भूक किती तीव्र आहे.
  • तुमचं ध्येय काय आहे. तुमच्यासाठी ‘चांगला गिटारिस्ट’ म्हणजे नक्की काय?

तुम्ही किती वेळ गिटार वाजवता आणि किती वेळ सराव (Practice) करता –

गिटार वाजवणे आणि सराव करण ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे. तुम्हाला आधीपासून येत असलेली धून पुन्हा वाजवणं म्हणजे सराव नाही. सरावात तुम्ही अशा गोष्टी सुद्धा केल्या पाहिजेत ज्या तुम्ही याआधी कधीच केल्या नाहीत, किंवा केल्या असल्या तरी त्या तितक्या उत्तमरीत्या तुम्हाला जमत नाहीत.

आठवड्यातून दोन तीन वेळा १५-२० मिनिट सराव करणारे आणि रोज २-३ तास सराव करणारे यात रोज सराव करणारा पटकन शिकेल यात वाद नाहीच. मोठे मोठे कलाकार रियाजाला म्हणूनच महत्व देतात. “Practice makes perfect”.

तुम्ही तुमच्या गिटारला जितका वेळ द्याल तितके रिटर्न्स तुम्हाला तिच्याकडून मिळतील. (म्हणजे याचा अर्थ असं नाही कि तासंतास गिटार न वाजवता तशीच मांडीवर घेऊन बसावी 😛 .)

तुमची सरावाची वेळ तुम्ही कशी घालवता –

सराव करताना बऱ्याचदा एखादी ट्यून आपण तासंतास प्रयत्न करून पण हवी तशी वाजत नाही, अशा वेळी हताश न होता थोडा वेळ दुसरा कसला तरी सराव करावा. उदाहरणार्थ – स्केल्स करून कंटाळा आला कि कोर्डस् वाजवायला घ्या, तेही करून कंटाळा आला तर अजून काही तरी दुसरं करा. पण वारंवार बदलण्याच्या नादात एक-न-धड-भाराभर-चिंध्या तर होत नाहीत ना यावर लक्ष असुद्या.

क्वांटीटी सोबत क्वालीटी पण महत्वाची आहे. प्रत्येक गोष्ट एकापेक्षा जास्त पद्धतीने करता येते. तुम्हाला ह्या अशा बऱ्याच स्टाईल्स जमल्या पाहिजेत. सुरुवातीला एका स्टाईलवर कॉन्सट्रेट करा, ती जमायला लागली कि नवीन स्टाईल शिकायला घ्या.

थोडक्यात, तुमचे विक-पॉइंट शोधून काढा आणि त्याचा सराव करा. सरावाचं महत्व समजून घ्यायला खालचा विडीयो बघा.


तुमची आकलन शक्ती (grasping power) किती आहे –

आता पर्यंतच्या अनुभवानुसार माझ्या असं लक्षात आलाय कि प्रत्येकाचा लर्निंग स्पीड वेगवेगळा असतो. मग त्याचा आणि वयाचा काही एक संबंध नसतो. माझे १० वर्षाचे अगदी लहान हात असलेले स्टुडंट सुद्धा कधी कधी एखादी गोष्ट जॉबला जाणाऱ्या मोठ्या लोकांपेक्षा पटकन शिकतात. किंवा याउलट एखादी गृहिणी कॉलेज गोईंग मुलीपेक्षा चांगली समजून घेते आणि पटकन शिकते.

तुमची नवीन गोष्टी शिकण्याची भूक किती तीव्र आहे –

आकलन शक्तीचं आणि तुमच्या आवडीचं कनेक्शन असू शकतं. बऱ्याचदा दुसऱ्यांच्या सांगण्यावरून गिटार शिकायला आलेली मुलं आणि स्वतःची इच्छा, आवड आहे म्हणून शिकणारी मुलं ह्यांच्या आकलन क्षमतेमध्ये देखील खूप फरक पडतो. स्वतःला शिकण्याची आवड असणारी मुलं पटकन ग्रास्प करतात. हे लॉजिक प्रत्येक क्षेत्रात लागू पडतं.

तुमचं ध्येय काय आहे. तुमच्यासाठी ‘चांगला गिटारिस्ट’ म्हणजे नक्की काय –

तुमच्यासाठी गिटार शिकण हे जर का २-४ आवडती गाणी शिकण्यापुरत मर्यादित असेल तर तुम्ही तुमचं गिटारिस्ट होण्याचं ध्येय पटकन साध्य कराल (पण अशा गिटार प्लेयरला रट्टा मास्टर म्हणायचं, गिटारिस्ट नाही.)

जर का तुम्हाला सोलो, रिदम, म्युजिक नोटेशन रीडिंग ह्या आणि अशा बेसिक महत्वाच्या गोष्टी शिकायच्या असतील तर त्याला तशी मेहेनत पण घ्यावी लागेल. थोडा वेळ पण जाईल. आणि तरच तुम्हाला एका गिटारिस्टला होणारे फायदे ह्या माझ्या ब्लॉग मध्ये लिहिलेले फायदे अनुभवता येतील.

At the end, मी तर म्हणीन वेळ बघून शिकूच नका कोणी, गिटार शिकायला आवडतं म्हणून शिका. हळू हळू तुम्हाला हि शिकण्याची प्रोसेस इतकी आवडेल कि हे शिक्षण कधी थांबूच नये असं वाटेल. जसं आता मला वाटतं. गिटार शिकण कधीच थांबू नये असं मला का वाटत यावर पण कधी तरी डिटेल्ड ब्लॉग लिहीन म्हणतोय.. पण आधी तुम्ही शिकायला तर घ्या..!

Facebook Comments

Related Posts

No Comments

Leave a Reply