Ek hota carver book review

प्रेरणादायी पुस्तक – ‘एक होता कार्व्हर’

मराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मित्रांपर्यंत पोहचवा

‘एक होता कार्व्हर’ हे पुस्तक इतकं प्रेरणादायी का वाटतं, याबद्दल उत्तर देताना एकदा ‘वीणा गवाणकर’ मॅडम बोलल्या होत्या की, “आपल्याला धाडस आवडतं. मला मुलांना हेच सांगायचं होतं, की धाडस किती प्रकारचं असतं? केवळ बलदंड असणं, गोळी मारणं, एखाद्याला हाणून पाडणं म्हणजे फक्त धाडस नाही. धाडस, परिस्थितीवर मात करणं असतं.

आपण जो एक निर्णय घेतलाय, त्यावर ठाम राहणं किंवा अपयश पचवायला शिकणं हे सुध्दा धाडस आहे.

आपल्याला हवी ती गोष्ट करताना, कोणतीही तडजोड न करता जगणं, हे सुध्दा एक धाडस आहे. कार्व्हरच्या आयुष्यातून हे धाडसच आपल्याला दिसतं आणि आपल्यातील प्रत्येकाला प्रेरणा देतं.”

मी एकदा एका नेचरट्रेलला गेलेले. तिथे आम्हाला जंगलाबद्दल, विविध प्रकारच्या झाडांबद्दल, वनस्पतींबद्दल माहिती सांगणारे जे सर होते, त्यांच्या ज्ञानामुळे, माहिती सांगण्याच्या पद्धतीमुळे आम्ही अक्षरशः भारावून गेलो होतो. त्या सरांनी तेव्हा सांगितलं होतं, की ‘वनस्पती शास्त्रज्ञ होण्याचं मी ठरवलं, ते ‘एक होता कार्व्हर’ हे पुस्तक वाचल्यामुळे.’ त्या पुस्तकाविषयी ते फार भरभरून बोलले होते. मी दुसऱ्याच दिवशी शाळेच्या लायब्ररीमधून ‘एक होता कार्व्हर’ घेऊन वाचलं.

सतत कार्यमग्न राहण्याची आणि नैराश्यातून बाहेर पडण्याची प्रेरणा मिळवायची असेल तर ‘एक होता कार्व्हर’ वाचाच. माझी खात्री आहे, की तुम्हाला या पुस्तकाच्या सुरुवातीपासूनच इतकी एनर्जी आणि सकारात्मकता मिळेल, की कधी पुस्तक पूर्ण वाचून होतंय आणि मी काहीतरी प्रॉडक्टिव्ह करतोय/करतेय याची ओढ तुम्हाला लागेल. (हा माझा अनुभव. तुम्हालाही असाच अनुभव आला असेल, तर कंमेंटमध्ये नक्की सांगा.)

एक साधा सामान्य लाजाळू दुबळा निग्रो मुलगा, ज्याला धड नीट बोलता येत नाही तो कष्टाने, स्वकर्तुत्वाच्या बळावर आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आपली कमालीची उत्सुकता शमवत वेगवेगळ्या कलांमध्ये, क्षेत्रांमध्ये पारंगत होतो. आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रात रमलेला असताना, सगळं सुस्थितीत असताना फक्त एका पत्रामुळे आपल्या वैयक्तिक विकासाचा मार्ग एका क्षणात सोडून देत, ‘माझ्या बांधवांना माझी गरज आहे’, म्हणत एका ओसाड माळरानावर नाविन्याची निर्मित करण्यासाठी जातो आणि बघता बघता त्यात यशस्वी होत, ‘१९४० सालचा महामानव’ म्हणून ओळखला जातो…. जॉर्ज डब्ल्यू कार्व्हर यांचा हा प्रवास इतका भन्नाट आणि प्रेरणादायी आहे की तो वाचल्याशिवाय अनुभवता येणारच नाही.

प्रा. कार्व्हर यांच्या हाताखाली शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी आपली पात्रता बाहेरच्या जगात सिद्ध करून दाखवली. त्यांना आपल्या विद्यार्थ्यांचं नेहमीच कौतुक वाटे. ते म्हणायचे,

“तुम्ही कोणाला काही नवीन शिकवू शकत नाही. मुळातच त्यांच्यात जे काही आहे, त्याचाच विकास करू शकता.”

आपल्या विद्यार्थ्यांतील ‘चांगलं’ शोधून त्याचा विकास करण्याचं काम प्रा. कार्व्हर मोठ्या आत्मीयतेने करत होते.

वीणा गवाणकर यांचं ‘एक होता कार्व्हर’ हे प्रा. कार्व्हर यांचं चरित्र वाचून प्रभावित झालेले अनेकजण कृषीनिगडित क्षेत्राकडे वळलेले दिसतात. तुमच्या ओळखीमध्ये देखील असे काही जण असतील, जे या पुस्तकामुळे, डॉ. कार्व्हर यांच्या प्रतिभेमुळे प्रेरित होऊन ‘कृषी’ क्षेत्रातील अभ्यासक्रमाला गेले असतील.

लहानपणी कार्व्हरचं पालनपोषण केलेल्या सुझनबाईंनी कार्व्हरच्या हातचं कसब टिपलं होतं आणि पुढे अनेकांनी त्या लांबसडक बोटांतील जादूवर शिक्कामोर्तब केलं होतं. त्या  जादूची कितीतरी उदाहरणं पुस्तकात वाचायला मिळतात. त्यात अगदी मरायला आलेली बाग किंवा झाडं फुलवणं, चित्रकला, विणकाम, पियानो वादन, जेवण बनवणं, खेळाडूंच्या वेदना पळवून लावणं, मातीतुन रंग निर्माण करणं, शेंगदाणे, रताळी आदींपासून अनेक पदार्थ तयार करणं, आणि असं खूप काही आहे. आपल्यालाही असं काहीतरी करता यायला हवं असं कायम वाटत राहतं.

प्रा. कार्व्हर चित्रकार किंवा संगीतकार होऊ शकले असते पण ते झाले एक दक्षिणी शेतकरी. एका छोट्या पण धडपडणाऱ्या शाळेचे शिक्षक, मुळ्यांचे डॉक्टर! आणि रंगारीही! एका उजाड, ओसाड माळरानाला त्यांनी नवजीवन दिलं होतं, फुलवलं होतं, लोकांच्या डोळ्यांवरच्या डॉलर्सच्या पट्ट्या काढून त्यांना ‘बघायला’ शिकवलं होतं. आणि ते लोकंही आता डॉक्टर कार्व्हरांप्रमाणे चिखलात, मुळ्यांत, पाना-फुलांत ‘देव’ शोधायला शिकले होते. निसर्गाच्या रहस्यांचा मागोवा घेऊ लागले होते. सद्य स्थितीला आपल्यालाही निसर्गाशी आपली नाळ जोडून देऊ शकणाऱ्या डॉ. कार्व्हर यांची नितांत गरज आहे. बरोबर?

तर हे पुस्तक नक्की वाचा!

पुस्तक विकत घेण्यासाठी पुढे लिंक देत आहे –

वीणा गवाणकरांची इतर पुस्तकं खालील प्रमाणे


  पुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त वाटलेलं असं हे BOOK STAND ज्याचा तुम्ही iPad , Mobile किंवा Kindle यातून वाचन करताना सुद्धा उपयोग करू शकता.

वाचकांच्या विनंतीवरून मी पुस्तक वाचण्यासाठी आणि इतर लिखाण किंवा laptop सोयीस्कर रित्या वापरता यावा म्हणून जो टेबल गेली ४-५ वर्ष वापरत आलो आहे त्याची लिंक येथे देत आहे. Click Here.

For Other Products by the same brand Click here

वाचनाच्या आवडीला पूरक असं साहित्य मी वेळो वेळी तुम्हाला सांगत जाईनच.


ashwini survey

अश्विनी सुर्वे

अश्विनी लहानपणापासून वाचन वेडी आहे.. इतकी की भेळ खाल्लेला कागद सुद्धा तिने न वाचता फेकला नाही (अर्थात कचऱ्याच्या डब्यात)!

Facebook Profile

Instagram Profile

ता.क.१.  तुमच्या आवडीची पुस्तकं व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही BOOK BAGS बनवल्या आहेत, त्या नक्की पहा.

ता.क.२ तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.

तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहतोय.

 

 


मराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मित्रांपर्यंत पोहचवा

Related Posts

16 Comments

 • Reply Rajendra sankpal September 3, 2020 at 2:46 pm

  सुंदर खूप छान विवेचन

  • Reply admin September 3, 2020 at 6:18 pm

   Dhanyawad Rajendra 🙂

 • Reply Vaishali Mohite Patil September 3, 2020 at 2:47 pm

  Maza atyanta aavadata pustak ahe……punha punha vaachava asa ahe.

  • Reply admin September 3, 2020 at 6:17 pm

   Dhanyawad Vaishali 🙂

 • Reply Pournima Katyare September 3, 2020 at 2:50 pm

  खुप छान विश्लेषण केले. वाचावे असे वाटते आहे.

  • Reply admin September 3, 2020 at 6:17 pm

   Dhanyawad Pournima 🙂

 • Reply Ketaki Masade September 3, 2020 at 2:51 pm

  Surekh lihilay tumhi pan, pustak nakki Vachel

  • Reply admin September 3, 2020 at 6:16 pm

   Dhanyawad Ketaki:)

 • Reply Prakash Bawane September 3, 2020 at 2:52 pm

  खुप सुंदर पुस्तक, वाचल्यावर अगदी झपाटून टाकते मनाला, काही करुन मनातून निघत नाही हा महामानव. सलाम यांच्या कामाला.

  • Reply admin September 3, 2020 at 6:16 pm

   Dhanyawad Prakash 🙂

 • Reply Nilay Sadvikar September 3, 2020 at 4:54 pm

  अप्रतिम पुस्तकाचा छान परिचय !

  मुळात हे पुस्तक गवाणकरांनी मुलांसाठी लिहायला घेतलं होतं. पण मुलांबरोबरच मोठ्यानासुध्दा खूप आवडलं.

  मुळात कार्व्हर ही व्यक्ती आणि तिचा प्रवास ईतका अद्भुत आहे की पुस्तक वाचनीय झालं नसतं तरच आश्चर्य ! त्यात वीणा गवाणकरांनी असोशीने लिहिलंय.

  नुसतं वाचनीय नाही तर संग्रही असावच असं पुस्तक !!

  • Reply admin September 3, 2020 at 6:15 pm

   Dhanyawad Nilay 🙂

 • Reply Shweta September 3, 2020 at 7:59 pm

  Pustak cha sampurnpne vyavsthit parichay dila ahe tumhi.. Nakkich vachu

 • Reply Rajaram Salaskar September 4, 2020 at 9:32 am

  आपले लिखाणही तेवढेच छान आहे,पुस्तक वाचण्या इतकेच त्यातील आशय कागदावर उतरविणे महत्वाचे,यशस्वी व्हा

 • Reply Anuradha Shinde September 4, 2020 at 9:33 am

  पुस्तक तर अप्रतिम आहेच पण त्याबद्दलचे तुमचे विवेचन इतके सुंदर आहे की मी आधी वाचलेले असतांनाही कपाटातून शोधून परत वाचले

  • Reply admin September 4, 2020 at 9:37 am

   Dhanyawaad Anuradha 😇

  Leave a Reply

  Whatsapp करा
  1
  मदत हवी आहे?
  नमस्कार! यशवंतहो.com वर आपलं स्वागत!

  विविध पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी 7208-7272-36 हा मोबाईल क्रमांक कृपया सेव्ह करावा.
  Whatsapp Broadcaste द्वारे तुम्हाला सर्वात पहिली अपडेट मिळत राहील. त्यासाठी आम्हाला Whatsapp करा.

  चांगल्या पुस्तकांची ओळख तुमच्यापर्यंत पोहोचविण्यास आम्हाला आनंद होत आहे.
  वाचत रहा,
  धन्यवाद!