डॉक्टरच बोलतात भटकून या!

हे तर जग-जाहीर सत्य आहे कि निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यावर तुमच्या मनाला, शरीराला आणि आत्म्याला एक वेगळीच शांती मिळते; पण आता विज्ञानाने हे सुद्धा स्पष्ट केलं आहे कि अशा प्रकारे राना-वनात, डोंगरकपारीतून फिरल्यावर आपल्या मेंदूची देखील उत्तम वाढ होते!

भटकंतीमुळे तुमच्यात Positive बदल होतात आणि मनात खराब विचार  येत नाहीत

फिरण्याची गोडी लागल्यामुळे आपल्याला चांगल्या विचारांसोबत आनंदी रहायचे तंत्र मिळते आणि आपण समाधानी राहायला शिकतो. हे सगळं होत असताना नकारत्मक भावनेला आपण कधी विसरून गेलो हे आठवत देखील नाही. बऱ्याचदा आपण अशाच नकारात्मक भावनांच्या आहारी गेल्यामुळे आयुष्यातला आनंद विसरून गेलेलो असतो. आणि ह्यामुळे आपण चालू क्षणातली मजा कशी घ्यायची हे विसरूनच जातो.

नुकत्याच झालेल्या (Proceedings of the National Academy of Sciences च्या) अभ्यासावरून असे आढळून आले आहे की निसर्गासोबत वेळ घालवला तर ह्या सगळ्या दृष्टचक्रातून आपण काही अंशी बाहेर पडून मोकळा श्वास घेऊ शकतो. ह्या सर्वेसाठी अभ्यासकांनी भटकंतीला गेलेल्या व्यक्तींच्या मानसिक उदासीनतेवर एक ओझरती नजर टाकली. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आले आहे कि, ९० मिनिटांहून जास्त वेळ नैसर्गिक वातावरणात वावरणाऱ्या व्यक्तींच्या उदासीन दृष्टीकोनात बऱ्यापैकी फरक पडला आहे, आणि ते काही प्रमाणात आधीपेक्षा आनंदी देखील आहेत. याचं शास्त्रीय कारण असं कि, आपल्या मेंदूचा subgenual prefrontal cortex ह्या भागाला, जिथे मानसिक संतुलन राखले जाते, त्याला निसर्गात पोषक वातावरण मिळते. याउलट, शहरी वातावरणात हे होत नाही. आणि परिणामी आपल्यात चिडचिडेपणा वाढतो.

म्हणजेच काय तर वाढत्या शहरीकरणामुळे, आणि त्यासोबतच वाढत जाणाऱ्या तणावामुळे अशा मानसिक व्याधी वाढत जाताना दिसत आहेत. तर यावर एक साधा सरळ सोपा उपाय म्हणजे आठवड्यातून थोडासा का होईना पण Free वेळ काढून मित्र मंडळींसोबत, नातेवाईकांसोबत फिरावं. किंवा कोणाही सोबत फिरू वाटत नसले तर निदान एकटे तरी निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जाणं कधीही चांगलंच! याने आपलं मानसिक संतुलनही राखलं जातं आणि तब्बेत देखील ठणठणीत राहते !!

समस्येवर रचनात्मक रित्या Creative उपाय शोधायचाय? चला मग भटकंती तर झालीच पाहिजे

रुथ एन एचले आणि डेविड एल. स्ट्रेयर या प्रसिद्ध मानसोपचार तज्ञांनी केलेल्या अभ्यासानूसार असे लक्षात आले आहे कि भटकंतीमुळे कोणत्याही समस्येवर रचनात्मक रित्या विचार करून उपाय काढण्याची क्षमता देखील वाढते. या अभ्यासात काही लोक्कांना ४ दिवसासाठी भटकंतीवर पाठवण्यात आलं होतं. त्यांना अशा जागी फिरवण्यात आलं जिथे टेक्नोलॉजी संबंधीत कोणतीही गोष्ट नव्हती. आणि त्याहूनही मोठा सांगाण्यासारखा मुद्दा म्हणजे तिथे सगळ्यांना अशी कामं दिली गेली ज्यात दिलेल्या समस्येवर मात करण्यासाठी लोक्कांना त्यांची Creative बुद्धी वापरावी लागणार होती.

तर या अभ्यासाच्या शेवटी तज्ञांना असं आढळून आलं कि, निसर्गाच्या सानिध्यात काही दिवस वावरल्यामुळे लोकांची रचनात्मक रित्या Creative उपाय शोधण्याची क्षमता ५०% हे वाढली आहे, आणि तज्ञांच्या मते हि कमाल त्यांनी केलेल्या टेक-फ्री भटकंतीमुळे झाली आहे. म्हणजेच काय तर टेक्नोलॉजी आणि ध्वनीप्रदूषित शहरी वातावरण यामुळे शहरी लोक्कांची एकाग्रशक्ती ढासळू लागली आहे.

 

तुमची मुलं बनतील अजून हुशार!

हो.. उगाच काहीही बडबडत नाहीय.. खरंच!! ‘Attention Deficit Hyperactivity Disorder (ADHD)’ हा आजकाल लहान मुलांमध्ये सर्रास पाहायला मिळतो. आता तुम्ही विचार करत असाल कि हे ADHD काय आहे तरी काय! ह्यामुळे लहान मुलांना एकाग्र चित्ताने अभ्यास करण कठीण जातं.

ADHD हि आजकालच्या पालकांना मोठ आव्हाहन आहे. साधारणतः पालक मुलांना ह्यावर सोपा आणि जलद उपाय म्हणून रासायनिक औषध गोळ्या देतात, पण हा तुमच्या मुलांसाठी धोकादायक पर्याय असू शकतो, कारण रासायनिक औषधांचे इतर दुष्परिणाम सुद्धा असतात. पण आपल्याकडे इतके चांगले नैसर्गिक पर्याय असताना कशाला खायच्या त्या गोळ्या! प्रसिद्ध अभ्यासक फ्रान्सेस इ कूप, PhD आणि एन्डरे फेबर टेलर, PhD, यांनी केलेल्या अभ्यासानुसार असे लक्षात आले आहे कि लहान मुलांना जास्तीत जास्त हिरवळीत राहायला दिल्यावर ADHD ची लक्षण कमी होतात.

 

निसर्गाच्या सानिध्यात मेंदूला चालना मिळते आणि व्यायाम सुद्धा होतो!

आपल्या सगळ्यांनाच माहित आहे कि व्यायामाने आपल्या शरीराला मजबूत बनविता येतं. ब्रिटीश कोलंबिया मध्ये झालेल्या अभ्यासात असे लक्षात आले आहे कि जास्त ऑक्सिजन असलेल्या जागी व्यायाम केला तर मेंदूतील ‘hippocampal volume’ मध्ये वाढ होते, ज्यामुळे आपला मेंदू अजून तल्लक बनतो. या अभ्यासात असेही जाणवले आहे कि अशा व्यायामामुळे वयोवृद्ध व्यक्तींमध्ये विसरभोळे पण कमी होतो. बरीच लोकं यासाठी केमिकल गोळ्या खातात, पण कदाचित त्यांनी अजून हा लेख वाचला नसावा!

 

पण सुरुवात कशी करू?

सुदैवाने, ह्यात जास्त पैसे देऊन काही करावं लागत नाही. त्याहूनही चांगली गोष्ट हि कि, गेलेल्या पैशापेक्षा होणारे फायदे हे नक्कीच जास्त आहेत. यात वयाची अट अजिबात नाही, साध्या सोप्या भटकंतीसाठी मोठ्या कौशल्याची हि गरज नाही. पण आता तुम्ही विचाराल कि नक्की सुरुवात तरी कुठून करू आम्ही भटकंतीला!? ‘तुम मुझे वाह धुंद रहे हो और मै तुम्हारा यहा इंतेजार कर रहा हु, हांय!!’ ह्या हिंदी सिनेमातल्या डायलॉग सारखं झालं कि!

अहो हे ‘भटकंती’ चं सदर खास तुमच्या सारख्याच तर भटक्या जमातींसाठी सुरु करायचं ठरवलंय आम्ही. बस्स.. जसा हा लेख अगदी शेवटपर्यंत वाचलात तसा आमचा प्रत्येक लेख तुम्ही वाचाल याची हमी तुम्ही आम्हाला द्या. बाकी १२ महिने ३६५ दिवस कुठे कुठे फिरता येईल ते एक-एक करून सगळ सांगू आम्ही तुम्हाला. वाचाल तर वाचाल, आणि म्हातारे झालात तरी नाचाल!

Related Posts