देवाच्या देव्हाऱ्यातला देव

.
.
दमला असेल तो सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करून,
मला त्याच्या इच्छांना पूर्ण करायचंय
प्रसन्न होऊन त्यालाच तथास्तू म्हणायचंय
मला देवाच्या देव्हाऱ्यातला देव बनायचंय..
.
त्याच्या उपवासाच कारण मी असेन,
त्याला संकटात बघून मी ही हसेन,
मला त्याचा
संकट मोचक, कैवल्य संहारक ठरायचंय,
मला देवाच्या देव्हाऱ्यातला देव बनायचंय..
.
‘देव माणसं’ आता कमी झालीच आहेत तशी,
मला ‘माणूस देव’ असतो का ते बघायचंय,
देवाच्या मोबाईल चा स्क्रिन सेव्हर व्हायचंय
मला देवाच्या देव्हाऱ्यातला देव बनायचंय..
.
माणसं फायदा असेल तेव्हाच विचारतात हालचाल,
‘माणुसकी’ कमी झालीय म्हणतात ते आजकाल,
जरा ‘देवूसकी’ असं काही आहे का ते पहायचंय,
मला देवाच्या देव्हाऱ्यातला देव बनायचंय..
.
तो सुद्धा टेंशन मध्ये दारू पितो का,
त्याची ही अर्धवट स्वप्न,
दहा वर्षांनी पूर्ण पजेशन मिळणारा वन बी.एच.के.,
आणि अशा हजार संसारतल्या अडचणींवर पर्याय आहेत का ते बघायचंय,
.
देव आस्तिक आहे की फक्त
भिंतीवर श्रद्धे पोटी काढलेलं स्वस्तिक आहे,
ते बघायचंय
मला देवाच्या देव्हाऱ्यातला देव बनायचंय..
.
-यशवंत दिडवाघ
.
.
.
ता. क. :- कवीच्या इतर कविता पुस्तक स्वरुपात वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Related Posts

 • Reply Vinay June 20, 2019 at 4:04 pm

  Waah !!

  • Reply admin July 5, 2019 at 3:41 pm

   धन्यवाद 🙂 विनय

 • Reply Kameshwari kulkarni June 20, 2019 at 5:10 pm

  Masttt ekdam sundar kavita. A different perspective of God and Godliness😍🙏A hardcore fan of yashwanth and yashwanth ho❤

  • Reply admin July 5, 2019 at 3:42 pm

   Thank you Kameshwari 🙂

 • Reply प्रणय June 20, 2019 at 5:46 pm

  छान

  • Reply admin July 5, 2019 at 3:45 pm

   धन्यवाद प्रणय !

 • Reply Dadaji Tanaji Yashwantrao June 20, 2019 at 8:05 pm

  छान आहे कविता. देवाला कळेल इथे किती झंझट आहेत ती. पण तूम्ही देव होसाल तर या भक्ताकडे पहिले कृपादृष्टी असू दया देवा. बाकी गिऱ्हाईक मी तुम्हाला तुम्ही माझे टक्के (कमीशन ) दयाल या अटीवर देईन. नाहीतर आमचे तुम्ही सोडून (32 कोटी वजा एक) बाकी आहेतच..

 • Reply Dadaji Tanaji Yashwantrao June 20, 2019 at 8:07 pm

  Sorry 33 crores

  • Reply admin July 5, 2019 at 3:47 pm

   Hahahaha… खरंच असं झालं तर तुम्हाला पाहिजे ते देऊन टाकलंच म्हणून समजा !! तथास्तू घेऊन ठेवा आत्ताच 🖐️!!

 • Reply गोरड सुदाम धुळा June 21, 2019 at 1:59 am

  चांगली अर्थपूर्ण आणि क्रतज्ञ मणसाची व्यवहारीक कविता

  • Reply admin July 5, 2019 at 3:48 pm

   प्रतिक्रिये बद्धल खूप खूप धन्यवाद !

  Leave a Reply