देव

माणसासोबत कसं वागावं म्हणजे चांगलं, ह्याचा विचार करत होतो. प्रत्येकासोबत गोडीने राहावं.. कि त्यातल्या कुणाला तरी हाड्तुड करावं!?

मग मनात आलं, उद्या उठून आपल्याला कळाल कि ज्या माणसाला हाडतुड केलं तो तर साक्षात कृष्णाचा अवतार होता (किंवा कुठलाही तुमचा आवडता देव अवतरला होता).

आता, हे कळल्यावर तुम्ही त्यासोबत कसे वागाल तसे आजपासूनच वागा. म्हणजे होतं असं कि उद्या तो देव असो वा कोणी साधारण मनुष्य, फायदा आपलाच होतो (हा बघा.. शेवटी केलाच मी एका सर्वसामान्यासारखा स्वकेंद्री, फायद्याचा विचार).

त्याचं काय आहे, त्याला तुम्ही आदराने वागवता आणि जर का तो खरंच कुठल्या देवाचा अवतार निघाला आणि तथास्तू बोलून निघून गेला तर! आपल्या विश-लिस्ट मधली फुल-ना-फुलाची-पाकळी तरी तो तोडून जाणारच कि.

बरं.. दुसरी शक्यता तो साधारण मनुष्य-जन्मातलाच कुणीतरी निघाला तर आपल्या चांगल्या वागण्यामुळे तो जाता जाता आपल्याला देवत्व देऊन जातो. आणि चार-चौघात आपली तारीफ होते. (आहे कि नाही फायदा!!?)

हा आता तुम्ही म्हणाल सगळ्यांसोबत चागलं वागण्याइतकी सहनशीलता नाहीय आमच्यात! कुणासाठी तरी अशा वेळी तोंडातून शिवी निघतेच.

अहो.. मी म्हणतो.. मग द्या कि बिनधास्त , कुणी अडवलंय. मी हि देतो, बस.. फक्त तेव्हा मी हि वर लिहिलेली कल्पना थोडी वेगळ्या पद्धतीने वापरायची. कंस, रावण, शूर्पणखा ह्यापैकी कुणाचा तरी अवतार तुमच्या पुढे आलाय असं समजा आणि मग होऊन जाऊद्या भांडण! (अच्छा, विनोद पुरे आता) चला सगळ्यांमध्ये देव शोधायच्या मोहिमेला निघू.

 

Related Posts

  • Reply Pratibha Pukale July 8, 2018 at 2:47 pm

    👌

  • Leave a Reply