काळोखातला – कोथळीगड

शनिवार, १९ नोव्हेंबर, रोजच्या सारखं ऑफिसमधून दमून येऊन जेवून झोपण्याचा तरी हा वार नक्कीच नाही! वीकेंड म्हंटलं कि मी तुम्हाला कुठल्यातरी गडावर तरी भेटीन किंवा मुंबईच्या ‘Midnight Cycle Ride’ला तरी! याआधी मी २ वेळा कोथळीगडावर गेलो होतो. पण आज आम्हाला एक स्पेशिअल अनुभव येणार होता. थंडी. चांदण्या. गिटार. गाणी. आणि मिट्ट काळोख. हो, तुम्ही बरोबर ओळखलंत, आज आम्ही नाईट ट्रेकला चाललो होतो.

एकदाचा प्लान पक्का होतो आणि तुम्ही घरातून ट्रेकसाठी निघता:

माझ्यासोबत १० अनोळखी ट्रेकर्स असणार होते. त्यातले ३ तरुण डॉक्टर ट्रेकर्स मला दादर स्टेशनलाच भेटले.  आता डॉक्टर आपल्यासोबत आहेत ऐकल्यावर ‘First Aid Kit’ च टेन्शन घेणं मी तेव्हाच बंदच केलं 😛 . ‘डॉक्टर’ हा शब्द ऐकला कि जो सिरिअस चेहेरा डोळ्यासमोर येतो, तसे हे तिघं अज्जिबात नव्हते. उन बंदोमे कूच अलगही ताजगी थी! खरं सांगायचं तर.. ट्रेक्सला जाणारी माणसं शक्यतो वेगळीच असतात, एकदम happning, charming, fun loving…  (हो मी स्वतःची थोडी ‘AutoLaal’ 😛 करतोय).

रात्रीच्या किर्र काळोखात ट्रेन कर्जत स्टेशनला लागली. ९ वाजले होते. स्टेशनवर जेमतेम २०-२२ माणसांची वरदळ. ट्रेनच्या भोंग्यावर announcement करणाऱ्या काकू कोणी लक्ष देत नव्हतं तरी तिच-तिच announcement परत करत होत्या. (हो मला माहितीय, तो रेकॉर्डेड आवाज असतो.)

‘आंटी, खाना खाके सोजाओ.. कोई नही सून राहाए आपकी बात!’, बोलत ट्रेनमधून उतरताना एका डॉक्टरने दुसऱ्या डॉक्टरला जोरात टाळी दिली. ‘म्हणजे हि डॉक्टर पोरं आजच्या ट्रेकला रंगात आणणार तर’, मी मनातल्या मनात म्हंटलं. सगळ्यांनी एकमेक्कांना फोनाफोनी केली आणि १० अनोळखी चेहेरे एका जागी भेटून टमटमची वाट बघत उभे राहिले.

OK, स्टेशनवरून टमटम पकडून सुरुवात करण्याआधी bag मधलं सामान चेक करूयात (हे आपण घरून निघतानाच बघायला हवं Actually 😛 )

Things To Carry:

 • गरम कपडे (जे मी बिलकुल कॅंरी केले नव्हते).
 • सुका खाऊ (‘दुसऱ्याचंच खाता येईल’ या प्लानिंगने हे सुद्धा घेतलं नाही).
 • Torch (घ्यावंच लागला 😀 )
 • First Aid Kit – शुद्ध मराठीत ‘प्रथमोपचार पेटी’ 😀 .
 • कॅप, गॉगल, सनस्क्रीन.
 • चांगले ट्रेकिंग शूज (Must)
 • बेड शिट / Sleeping Bag / Mat (In Short मराठीत ‘अंथरून-पांघरून’ आणायचंच Must)
 • जास्तीचे सॉक्स, फुल स्लीव्स कपडे, चप्पल.
 • हे सगळं वागवायला पाठीवरची bag (तिरक्या पट्याची bag आणू नये)
 • पिण्याच पाणी
 • आणि कॅमेरा.

तुम्ही वरची सगळी लिस्ट कॅरी केली आहे म्हणजे नाईट ट्रेकसाठी तुम्ही फुल सेट आहात. यासोबत तुम्ही एखाद वाद्य उदा. माउथ ऑर्गन, बासरी) सुद्धा घेऊन जाऊ शकता. Obviously, ते वाजवायला येत असेल तरच 😛 . रात्री रंगणाऱ्या गप्पा आणि त्यांच्या पाठीमागे एखादी सायलेंट धून.. अहाहा.. फुलऑन चिल्..!

एकदम काहीच नाही तर आपल्या आवडत्या व्यक्तीला आठवत एखाद्या काळोख्या कोपऱ्यात (जो सेफ असेल) तुम्ही गाणी गुणगुणत बसू शकता. आणि Trust Me.. अशा वेळी तुम्ही एकटे कधीच नसता, त्या डोंगरांवरची थंड हवा तुमच्या सोबत गात असतेच नेहमी. 🙂 .

मी ह्यावेळी गिटार नेली होती. नेक्स्ट टाईम कधी तरी माझ्या ‘येथे कविता लिहून मिळतील’ Band मधल्या बाकी म्युसिशिअन मित्रांना पण घेऊन जायचा विचार करतोय.

P.S : आणि हो.. लाउड स्पीकरवर मोठ्या आवाजात गाणी लावून, दारू-सिगारेट फुकून, पत्ते खेळणाऱ्या लोकांमधले तुम्ही असाल तर प्लीज… हे तुमचं वाचन इथेच थांबवलं तरी चालेल. तसल्यांचा मला जाम राग येतो! निदान ट्रेक्सच्या वेळी तरी कंट्रोल करा यार!

descending-in-the-morning

On The Way:

तिथे निर्सगाचा इतका positive feel होता कि भुताच्या गोष्टी ऐकून कोणीच घाबरायला मागत नव्हतं! कदाचित स्टोरी टेलरच थकेला होता वाटत :P. ( 😀 😀 😀 By The Way.. मीच तो स्टोरी टेलर :D). किंवा कदाचित असं पण असेल कि आमचा म्युसिकल सेशन इतका रंगला कि अंधाराची भीती वाटण्याऐवजी त्यातंच एक वेगळा आपलेपणा वाटायला लागला (म्युसिकल माहोल बनवणारा 😀 By The Way मीच तो :D) आणि त्या रातकीड्यांना विसरून कसं चालेल, ते तर रात्रभर जीव तोडून आम्हाला पर्कसिव धून देत होते 🙂 . त्यात पण एक म्युजिक आहे यार !

चंद्र थोडासा तांबडा झाला होता. मला ग्रह-तारे यांचं खागोल्शात्रीय ज्ञान तितकसं नाही, पण रात्री चंद्राने त्याचा बदलेला रंग जणू आमच्या रंगलेल्या मेहीफिलीची पोचपावतीच देत होता. रात्रीच्या मेहेफिलीचे माझ्याकडे फोटो नाहीयत. सगळे ऐकण्यात इतके गुंग होते कि कोणी फोटोच काढले नाहीत. डॉक्टरसाहेबांनी माझा एक क्लोजप फोटो काढायचा प्रयत्न केलेला.. पण.. माझ्या डोळ्यावर इतका प्रखर flash आला कि गाण मध्येच अडखळल :P. नेक्स्ट नाईट आउटला नक्की फोटोंचा पण बंदोबस्त करीन. (I know, फोटोंमुळे feel येतो ना वाचायला 🙂 ! ). कदाचित हेच लक्षात आलं आणि कोणीतरी सकाळी उठल्यावर एक फोटो काढला :P.

start-of-the-day-with-melodies-on-the-top-of-the-kothaligad

रात्रभर – जागते राहोssss:

रात्री रस्त्यात एक दोन जागी मनाला वाटेल तिथे थांबत, टिप्पिकल भटक्या ट्रेकर्सची गाणी गात (हळू आवाजात) आम्ही चढण केली आणि रात्री १ च्या सुमाराला कोथळीगडाच्या पायथ्याला पोहचलो.

खऱ्या प्लानिंग नुसार गडाच्या पायथ्याला असणाऱ्या गुहेमध्ये झोपण्याचा बेत होता. हीच ती गडाखालची नैसर्गिक ‘पंच तारांकित’ जागा जिच्या भरोश्यावर राहून मी स्वेटर आणला नव्हता. कितीही थंडी असुद्या गुहेत तुम्हाला एकदम मस्त वातावरण मिळणार. पण इथे मात्र एक गोची(प्रोब्लेम) झाली. आम्ही येण्याआधीच एका ग्रुपने पूर्ण गुहा अडवून ठेवेली (आणि तेव्हाच रात्रभर थंडीत कुडकुडण्याची मी मनाची तयारी केली :D).

Unfortunately किंवा fortunately गडावरची ‘नैसर्गिक पंच तारांकित’ गुहा online बुक करायची सोय अजून तरी झालेली नाही.

तशी गुहेला आतमध्ये अजून एक खोली आहे. पण त्या ग्रुपने लावलेल्या शेकोटीचा धूर त्या ‘पंचतारांकित’ वातावरणाला तोंडात ‘पंच’ मारेल असा होता. (हो, हा थोडा खराब पंच होता 😀 ). सगळीकडे धूर, आणि हि मंडळी डाराडूर.. कशी झोप लागते काय माहित. कदाचित गडाची चढण ह्या पोरांना खूप दमवून गेली वाटत.

तिथे बाजूलाच मंदिर सुद्धा आहे. सकाळी इथे पाया पडायला यायचं असं म्हणत आम्ही तिथून पुढे निघालो, देवाला पण प्रायवसी दिली पाहिजे ना. रात्री कशाला त्याला त्रास द्या उगाच!

गुहा आणि मंदिर सोडून थोडं पुढे चालत गेलं कि बाजूलाच एक रिकामी जागा आहे. तिथे तत्कालीन मोडकळीला आलेली तोफ ठेवलीय. मग तोफेच्या बाजूला आम्ही आमचा बस्तान मांडलं. आपापलं अंथरून काढून सगळे त्यावर विराजमान झाले.

आकाशाची चादर आणि जमिनीचा बिछाना करण कोणालाच झेपलं नसावं कदाचित!! थंडी कसली होती! अशा कवी कल्पना कवितेतच बऱ्या वाटतात बाबा!

%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%af%e0%a4%b6%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5

डॉक्टरांचा ग्रुप जुनी गाणी गाता-गाता कधी झोपून गेला कोणालाच कळाल नाही. मूडला शोभतील अशा ३-४ कविता, इथल्या तिथल्या गप्पा आणि आयुष्य ह्या न संपणाऱ्या विषयावर चर्चा रंगत गेली.

आम्ही झोपलेलो ती जागा तशी रिस्की होती. जेमतेम एखाद्या छोट्या अंगणा एवढी. आणि या अंगणाचा वेगळेपणा म्हणजे, हे कुंपण नसलेलं अंगण ३००० फुटांवर होतं आणि तिन्ही बाजूने खोल उतार होता, एवढंच.

‘रात्री कोणाला गरज लागलीच तर एकट्याने उठू नका कोणाला तरी सोबत घेऊन जा, नाही तर… खाली दरी किती खोल आहे ते मला पण नाही माहित.. ती उद्या उठल्यावर कळेलच तुम्हाला’, अशी Strict Warning समीर सरांनी आम्हाला दिली.

पण इथे झोप कोणाला लागतीय. त्यात मला झोपेत चालायचा प्रोब्लेम आहे!!! अंथरुणात नुसता पडलेलो, तरी दोन्ही बुटांची लेस एकमेकांना बांधून ठेवली. म्हंटलं चुकून झोप लागली तर.. दरीची खोली मोजायचा नंबर माझ्यावर नको रे बाबा!

no-no-these-are-no-our-tents

पूजा आणि तिचा बिल्डींग फ्रेंड पौशिक तर एक मिनिट सुद्धा झोपले नाहीत. नुसत्या रातकिड्यांचा आणि वाऱ्याचा आवाज ऐकत ३ वाजेपर्यंत आम्ही बसलो. बाकी सगळ्यांची झोप लागली ती सकाळी ५.३० ला सूर्योदय बघण्यासाठीच सगळे उठले. सकाळी उठलो तेव्हा सगळे जागच्या जागी होते, (मला स्वतःला धरून).. नशीब आज रात्री झोपेत चालायचा मूड झाला नाही मला!.

सूर्य येण्याआधी आकाशात पसरलेला तो मंद प्रकाश अंकुर ‘सिंग’ने कालच्या अंधारात गायलेल्या गाण्याचे सूर जणू पुसू पाहत होता. मग अंथरून गोळा करून सगळे सज्ज झाले ते ‘कोथळीगडाच्या कोथळात शिरायला’.

सकाळी मिळालेलं गडाचं पाहिलं दर्शन:

रात्रभर अंधारातून चालत चालत किती उंचावर आलोय याची जाणीव सगळ्यांना सकाळी उजाडल्यावर झाली. कधी एकदाचा ह्या कोथळीगडाच्या शेंड्याशी पोहोचतोय असं झालं होतं. सूर्य वर येण्याआधी वरती पोहचून त्याच्या स्वागतासाठी तयार राहायचा आमचा बेत झाला.

रात्री गुहेसमोरून पावूल वाटेने येताना लागलेला काळोख म्हणजे हाच तो कातळकड्याच्या पोटात खोदलेला वरती जाणार भुयारी मार्ग.  पहिली लागते ती देवीची गुहा आणि मग भैरोबाची गुहा.  या गुहेत कोरीवकाम असलेले छताला आधार देणारे स्तंभ आहेत.

‘किल्ल्याचा लहान आकार लक्षात घेता हा फक्त एक चौकी म्हणून वापरला जात असणार.’ अशी माहिती आम्हाला समीर सरांनी दिली.

%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a5%e0%a4%b3%e0%a5%80%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af

वर चढण्यासाठी बनवलेल्या पायऱ्या जवळजवळ गुडघ्याइतक्या उंच आहेत. भुयारात अंधार होऊ नये म्हणून मध्ये-मध्ये छिद्र सुद्धा ठेवण्यात आली आहेत. इथे तिथे हाताने पकडल्याशिवाय चढणे वा उतरणे बिलकुल शक्य नाही. किल्ल्याला भक्कमपणा यावा यासाठी माथ्यावर नरसाळ्याच्या आकारात बांधकाम केलेले आहे. आणि बर का.. डोंगरावरचा हा इतका नरसाळ्यासारखा भाग म्हणजेच कोथळीगड.

या किल्ल्याच्या उभारणीसाठी बनवणाऱ्याने मन मोकळं करून खर्च केला असणार. आणि हे समजायला त्या अखंड दगडात कोरलेल्या पायऱ्या पुरेशा आहेत. या आधी मी नुसतं याबद्धल वाचून होतो, जसे तुम्ही हे आता वाचत आहात.. पण हा किल्ला खरंच वसूल आहे. हा कोरलेला भुयारी मार्ग बघण्यासाठी तर नक्की यावं इथे!

किल्ल्याचा दरवाजा अजूनही भक्कम रित्या उभा आहे. पुढे आतमध्ये पाण्याच्या दोन टाक्या देखील आहेत. शनिवार रविवार बघून ट्रेकिंगसाठी येणाऱ्यांना दुपारी इथे लिंबू सरबत विकणारे काका भेटू शकतात. २० रुपये एक ग्लास असतो, पण इथे येण्यासाठी केलेल्या परीश्रमापुढे हा लिंबू सरबत वसूल वाटतो.

पेठ गावाच्या जवळ असल्यामुळे याला ’पेठचा किल्ला’ असेही म्हणतात. कोणी म्हणतं दगडाला आतमधून ‘कोथळून’ तयार केला म्हणून ह्याला कोथळीगड म्हणतात. याचं नाव बाकी झक्कास ठेवलंय हे नक्की.

कोथळीगडाबद्दल अजून थोडी खुफिया माहिती:

गावकरी सांगतात, कर्जतहून खेड-कडूसकडे जाणाऱ्या सावळ आणि कोलिंबा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी कोथळीगडाचा उपयोग केला जायचा. ह्यावरून तुम्हाला खूप काय काय बघता येईल. माथेरानचं पठार, प्रबळगड, चंदेरी, नागफणी, माणिकगड, सिधगड,  पिशाळगड.

पुढे आम्हाला एक सुशिक्षित गावकरी भेटला आणि त्याने या गडाच्या रक्तरंजित इतिहासाची माहिती दिली.

‘हा जरी दिसायला लहान असला तरी खूप महत्वाचा किल्ला होता. आणि विशेष म्हणजे याची बरीच माहिती आपल्याला मोघली कागदपत्रांमधून मिळाली आहे’. म्हणजे मोघल इतिहासकारांना सुद्धा या किल्ल्याला इतिहासाच्या सोनेरीपानात जपून ठेवण्याचा मोह आवरला नाही. गावकरी दादा पुढे म्हणाला, ‘हा बलाढ्य दुर्ग नाही पण एक संरक्षक ठाण नक्कीच होता. इथल्या जुन्या तोफा आणि तोफगोळे, व इतर व्यवस्था पाहता हा किल्ला म्हणजे मराठ्यांचा शस्त्रसाठा ठेवण्याचा स्पॉट होता.  आणि याला विशेष महत्त्व संभाजीमहाराजांच्या काळात प्राप्त झालं.’

वाट :

कर्जतहून आंबिवली किंवा कोठिंबे गावी बसने जाता येते. इथुन साधारणतः ४-५ तासात गडावर पोहचता येते. पेठच्या किल्याला ट्रेकला जायचंय तर रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळील आंबिवली हे गाव गाठायचं. चार चाकी गाड्या इथवर आरामात येतात. अगदी एसटीसुद्धा येते इथे. आंबिवलीलाच तुमची जेवणाची उत्तम सोय सुद्धा होऊ शकते. रात्रीचं जेवण आम्ही इथेच केलं आणि आमचा ट्रेक सुरू केला.

वाट अगदीच सोप्पी आहे मग वाटाड्याची गरज भासणार नाही, तरी कोणी तरी ओळखीचा माणूस सोबत असला तर चांगलंच आहे. साधारण पाऊण-एक तासात आपण टेकडीचा चढ चढून एका पठारावर येतो. हा एक फोटोजेनिक स्पॉट आहे. तुमच्या उजव्या बाजूला खोलवर तुटलेली दरी (जी आम्हाला रात्र असल्यामुळे दिसली नव्हती) आणि त्यापलीकडे आकाशाला शिवू पाहणारा पेठचा सुळका!

‘समीर सर, आपण सिधा इधरसेहि क्यू नाही जाते.. इतना घूम के क्यू जानेका?’ वेणुगोपाल ने विचारलं. अंधारामुळे त्यामध्ये असलेली दरी कळत नव्हती, त्यामुळे हा प्रश्न साहजिक होता. ‘वो क्या हे ना, उसका रिजन आपको कल उजालेमे रिटर्न जाते टाईम समझेगा..’, असं बोलून समीर सर माझ्याकडे बघून हसले.

पुढल्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही परतीच्या वाटेवर होतो, तेव्हा समिताला वेनुगोपालचा तो प्रश्न आठवला, ‘ओके.. सो इस लिये इतना घूम के गये थे?!’. आम्ही थोडा वेळ तिथे तसेच उभे राहिलो (आणि ऑफ कोर्स ४-५ फोटो पण काढले). भान हरपायला लावणारं दृश्य आमच्या समोर होतं. त्या खोल दरीच्या सुरुवातीला warning बोर्ड सुद्धा लावलेला होता.

‘यार .. आपण इतना चले..!! डोंट टेल मी! अच्छा हुआ रात में गये .. दिन में जाते तो इधरसे देख के हि में रिटर्न चली जाती..’, समिताने कबुली दिली. तिचा नवरा अंकुर तिच्यावर मनातल्या मनात जोरात हसला. एव्हाना हे दोघे नवरा बायको उतरण्याच्या साध्या सरळ रस्त्यावर कमीत कमी ५ वेळा तरी पडून झाले होते. रस्त्यात दगडी आणि मातीच तशी स्लीपरी होती. आणि त्यात भर म्हणून तो उतार. सवय नसणारे किंवा निष्काळजी पणे चालणारे त्यावरून घसरले म्हणून समजाच एकदा तरी. गडावरून उतरल्यावर प्यायलेल्या लिंबू सरबताची चव आठवत सगळ्यांनी आंबिवली गावात आमची वाट बघणाऱ्या टमटमला गाठलं. सोबत होत्या त्या खूप साऱ्या आठवणी.

energy-refilling-lime-juice-rs20-per-glass

अनोळखी लोकांमधली अनोखी Bonding:

मला माहित नाही आता आम्ही लोकं पुन्हा कधी भेटू. पण हे फोटो आणि त्यांना बघताना आठवणारे किस्से मला नक्कीच त्या गडावर घेऊन जातील.

Related Posts

Leave a Reply