Chandakshari Marathi Gajal Chandashastra

‘छंदाक्षरी’ – काव्यलेखन प्रवासातील योग्य दिशादर्शक!

मराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मित्रांपर्यंत पोहचवा

“एक विद्यार्थी म्हणून अभ्यास चालू आहे.”

आश्चर्य वाटतं, जेव्हा राष्ट्रीय पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलेले जेष्ठ गजलकार, अब्दुलरहमान करीमभाई शेख उर्फ ए. के. शेख सर असं  म्हणतात; ज्यांनी हजारो विद्यार्थ्यांना काव्यलेखनात, मुख्यत्वे करून गझल लेखनात मार्गदर्शन केलेलं  आहे. २० पेक्षा जास्त पुस्तकं लिहून सुद्धा सर स्वतःला ‘विद्यार्थी’ समजतात तर हा काव्यमहासागर नक्की किती खोल असेल याचा अंदाज बांधण्याच्या खटपटीत न पडलेलच बरं! ही खोली मोजता आली नाही तरी चालेल पण या प्रवासाला सुरुवात करण्याची इच्छा तरी नक्कीच होईल. आणि या वाटेवर योग्य दिशादर्शक संकेतचिन्हांचा शोध घ्यावासा वाटेल. हे पुस्तक वाचलं तर इथे तिथे धडपडत फिरण्याची बिलकुल गरज नाही!

‘छंदाक्षरी’, प्रत्येक काव्यलेखन शिकू इच्छिणाऱ्या कवीसाठी खूप फायद्याचं पुस्तक आहे, ज्यात मराठी गझलांचं छंदशास्त्र व्यवस्थित समजावून सांगितलं आहे. याच संदर्भात याआधी सरांनी ‘गझल एके गझल’ नावाची वीस पानी पुस्तिका प्रकाशित केली होती ज्यात गझल लेखनाबद्दल खूप महत्वाची माहिती दिली होती. ‘छंदाक्षरी’ ही त्याची अजून पुढची आवृत्ती म्हणता येईल.

ग़ज़लकाराकडून ग़ज़लच्या काही अपेक्षा आहेत.

१. प्रासादिकता

२. वावगा शब्द वर्ज

३. शिव्या-शाप नको

४. शेर हळूवार असावा. तो नाजूकपणे हाताळला जावा

५. शेर लागट-जखमी करणारा नसावा

६. काफिया शुद्ध असावा

७. ग़ज़ल शक्यतो अक्षर गणवृत्तात असावी

८. सहजता असावी

९. आपण जे बोलतो तशी रचना असावी

१०. कल्पना स्पष्ट असाव्यात, दुर्बोध नसाव्यात

ग़ज़ल साधी-सोपी, सहज-सुंदर असावी. तिचा मतला आकर्षक हवा. खरं म्हणजे ग़ज़लेवरून ग़ज़लकाराची ओळख पटते. रसिकांच्याही ग़ज़लेकडून काही अपेक्षा असतात.

१. आम्हाला सुखी कर

२. आमची करमणूक कर

३. आम्हाला भावोत्कट कर

४. आम्हाला स्वप्न पाहू दे

५. आम्हाला हसू दे

६. आम्हाला रडू दे

७. आम्हाला विचारप्रवृत्त कर

रसिकांच्या या मागण्या ग़ज़लेनं पुरवायला हव्यात.

आपल्यापैकी बरीच जण मराठी माध्यमातून शिकलेलो असलो तरी सध्याच्या चॅटिंगच्या जगात भाषेची होणारी भेळमिसळ, त्यातून होणारे अशुद्ध शब्दांचे प्रयोग, होणाऱ्या खूप साऱ्या शुद्धलेखनाच्या चुका, यावर मात करायला हे पुस्तक नक्की मदत करेल. गझलच्या उत्पत्तीपासून ते हा काव्यप्रकार इतर भाषांमधून फिरत फिरत मराठीमध्ये कसा आला याची देखील माहिती या पुस्तकात मिळेल.

प्रत्येक भाषेची काही बलस्थाने असतात, तर काही मर्यादा, काही नियम असतात. उदा. बाराखडी, शुद्धलेखन, शब्दांमधील वजन, उच्चार, वेळ; या सर्वांचा गजलमधील गेयता निर्माण करण्याच्या प्रक्रियेत कसा उपयोग करता येईल; त्यासाठी मराठीमध्ये आधीपासून असलेली वृतं जी आपण इतर काव्यप्रकारांमध्ये वापरत होतो. त्याचा उपयोग गझल लेखनामध्ये कसा करावा याची सविस्तर माहिती दिलेली आहे.

डॉ. राम पंडित म्हणतात, “ए. के. शेखांकडे तरल व लयदार छंदाची गजल आहे. ती अनेक नवोदित कवींना भावते, त्यामुळे त्यांच्याकडे गजल विषयीचे समग्र शास्त्र शिकू इच्छिणारे कवी येत असतात. त्या नव्या पिढीसाठीच हा ग्रंथ योजिला आहे.”

गझल मुळात इतर भाषेतून आलेला काव्यप्रकार असल्यामुळे सरांनी इतर भाषेतील काव्यलेखनाचा थोडक्यात आढावा घेतला आहे. याची मदत आपल्याला ह्या काव्यप्रकारामागील मूळ संकल्पना लक्षात घेण्यात होते. अधिक स्पष्टीकरणासाठी हिंदीतील प्रसिद्ध गीतांच्या काही ओळी पुस्तकात त्यांच्या तांत्रिक माहिती सोबत वाचायला मिळतील.

‘गझल एके गझल’ मधील माहिती यात पुन्हा दिलेली असली तरी ही दोन्ही पुस्तकं सोबत असल्याचा नक्कीच कवींना-गजलकारांना फायदा होईल यात शंका नाही. गझल बांधणीतील घटक, जसं की; बहर (वृत्त), जमीन (आकृतीबंध), काफिया (यमक), रदीफ (अंत्ययमक), मतला (पहिला शेर), मिसरा (ओळ), मक्ता (शेवटचा शेर ज्यात ‘तखल्लूस’ म्हणजेच कवीचे नाव असते), हासिले गझल शेर, अलामत या आणि अशा बऱ्याच तांत्रिक बाबींची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर हे पुस्तक वाचावच लागेल! अशाप्रकारच्या तांत्रिक बाबी आपण दुसऱ्यांकडून नुसत्या ऐकून लक्षात ठेवल्या असतील तर त्या विसरण्याची किंवा चुकीच्या लक्षात ठेवण्याची शक्यता असते. लिखित स्वरूपात असल्याने त्या केव्हाही पुस्तक उघडून बघता येतात.

गजलचा ‘इस्लाह’ म्हणजे सर्वात महत्वाचा टप्पा. त्याबद्दल सर म्हणतात,

संगीताप्रमाणेच इथे गुरू-शिष्य परंपरा पाळली जाते. योग्य मार्गदर्शन, चिंतन, अभ्यास, ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. उर्दू परंपरेनुसार उस्तादने आपल्या शिष्याची गजल तपासून पाहणे, ती दुरुस्त करणे, याला इस्लाह म्हणतात. गजलच्या दुनियेत इस्लाहाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. निर्दोष व चांगल्या निर्मितीसाठी इस्लाह आवश्यक आहे. असे म्हणतात की अनभिज्ञाची दाद आणि जाणकाराचं मौन दोन्हीही गजलेला मारक ठरतं.

सरांची हीच गोष्ट अजून समजवून सांगायची शैली पहा, ते पुढे म्हणतात,

आई जशी आपल्या मुलाला बाहेर फिरायला नेताना तयार करते. तिचं बाळ तिला कसंही, केव्हाही सुंदरच दिसतं, पण ते ज्याच्या बरोबर जायचं असतं ती व्यक्ती त्रयस्थाच्या नजरेनं त्या बाळाकडं पाहात असते. असं पाहताना तिच्या लक्षात येतं की, अरे थोडं काजळ फरकटलंय, पावडर पुसलेली नाही, बटणं वरखाली झालीत. केस नीट बसलेले नाहीत. अतिप्रेमामुळं ते आईच्या लक्षात येत नाही. दुसऱ्याच्या मात्र लक्षात येतं. मग ती व्यक्ती थोडं थोडं त्या बाळाला ठाकठीक करते. ते अधिकच सुंदर दिसू लागते. ह्याला म्हणायचं ‘इस्लाह’.

गझलमधील वेगवेगळे प्रयोग, प्रकार, मराठी व्याकरण व लेखन याची थोडी माहिती, विरामचिन्हांचा वापर कसा करावा अशा छोट्या-छोट्या पण महत्वाच्या विषयांना सुद्धा सर या पुस्तकात नीट समजावून सांगतात.

पुस्तकात दिलेले सरांचे काही विचार जे मला खूप आवडले ते खाली देत आहे. जमलंच तर पुस्तक विकत घेऊन नक्की वाचा! पुस्तक विकत घेण्यासंबंधीत अधिक माहिती तुम्हाला 7208-7272-36 या Whatsapp क्रमांकावर मिळेल. किंवा इथे संपर्क साधू शकता.

 • सर्व साधारण लोकांच्या तोंडून निघालेले सहज उद्गार म्हणजे म्हणी आणि वाक्प्रचार हे भाषेचे भूषणभूत अंग आहे.
 • दुर्बोध शब्द आणि शब्दांची कारागिरी यांना स्थान मिळाले की काव्य अर्थापासून दूर जाते. आणि परिणामकारकतेस बाधा येते.
 • आहार रूचकर हवा हे भोजनाचं वैशिष्ट्य, रूचकर असून तो स्वादिष्ट, सात्विक आणि पौष्टिक असेल तर उत्तमच त्यातूनही तो चांदीच्या ताटात वाढला तर अहंविशेष! तसंच काव्याचंही, स्वाभाविकता, परिणामकारकता आणि शब्दार्थाचं सौष्ठव असून ते सहजगत्या आलं तर दुधात साखरच.
 • गजलेने रदीफ- अन्त्ययमक हा प्रकार काव्याला दिला.
 • गजल वाचण्यापेक्षा ऐकण्यात मजा आहे. त्यात नाट्यात्मकता आहे. शब्दाचा क्रम, त्यावरचा आघात, यमक, अनुप्रास, लय पाहिली जाते. त्यातला शेर पेश करण्याचा ढंग फार महत्त्वाचा. त्यातल्या शेराच्या मिसऱ्यामधून एक विशिष्ट प्रेरणा व्यक्त होते, तर दुसऱ्या ओळीतून प्रतिक्रिया उमटली जाते. ती कधी विरोधी असते, त्यामुळे श्रोता एकरूप होतो.

 पुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त वाटलेलं असं हे BOOK STAND ज्याचा तुम्ही iPad , Mobile किंवा Kindle यातून वाचन करताना सुद्धा उपयोग करू शकता.

वाचकांच्या विनंतीवरून आम्ही पुस्तक वाचण्यासाठी आणि इतर लिखाण किंवा laptop सोयीस्कर रित्या वापरता यावा म्हणून जो टेबल गेली ४-५ वर्ष वापरत आलो आहोत त्याची लिंक येथे दिली आहे. Click Here.

For Other Products by the same brand Click here

वाचनाच्या आवडीला पूरक असं साहित्य आम्ही वेळो वेळी तुम्हाला सांगत राहू.


Yashwant didwagh

यशवंत दिडवाघ

पुस्तकांपासून लांब पळणारा मी, कधी पुस्तकांमध्ये रमायला लागलो कळलंच नाही. पण आत्ता… मी पुस्तकांच्या प्रेमात पडलोय. तुम्ही पण बघा एकदा पडून (अर्थात प्रेमात)!

Facebook Profile

Instagram Profile

ता.क.१.  तुमच्या आवडीची पुस्तकं व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही BOOK BAGS बनवल्या आहेत, त्या नक्की पहा.

ता.क.२ तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.

तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहतोय.


मराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मित्रांपर्यंत पोहचवा

Related Posts

2 Comments

 • Reply जीतू आर. म्हात्रे March 13, 2021 at 2:52 pm

  अप्रतिम खुप छान माहिती दिल्याबद्दल… तू असच छान छान लिहाव. हिच ईश्वर चरणी प्रार्थना…. यशवंत हो…
  👌👌👏👏❤❤💐💐

  • Reply admin March 13, 2021 at 3:02 pm

   धन्यवाद जीतू दादा 🙏
   तुमच्या सारखं चित्रपट सृष्टीसाठी काम करायला मिळालं तर अजून छान लिहीन 😇

  Leave a Reply

  Whatsapp करा
  1
  मदत हवी आहे?
  नमस्कार! यशवंतहो.com वर आपलं स्वागत!

  विविध पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी 7208-7272-36 हा मोबाईल क्रमांक कृपया सेव्ह करावा.
  Whatsapp Broadcaste द्वारे तुम्हाला सर्वात पहिली अपडेट मिळत राहील. त्यासाठी आम्हाला Whatsapp करा.

  चांगल्या पुस्तकांची ओळख तुमच्यापर्यंत पोहोचविण्यास आम्हाला आनंद होत आहे.
  वाचत रहा,
  धन्यवाद!