चालेल का?

देव त्याचं देवपण विसरला तर चालेल का?

त्याने रोज एकाला धंद्याला लावला तर चालेल का?

 

रिकामटेकडा बाप बापासारखं वागत नाही म्हणून,

मुलगा पोटच्या मुला सारखा नाही वागला तर चालेल का?

 

तो जन्माला का आला हा विचार करतच नाही आणि,

आयुष्य मरणोत्तर जगायला शिकला तर चालेल का?

 

अनंताच्या पोकळीत जाऊदे किंवा गुलाबाच्या पाकळीत,

अणू मूलद्रव्यात नाही मिसळला तर चालेल का?

 

पाणी, जमीन, हवा या सर्वांनी बंड पुकारला

आणि तुमचा श्वास बंद पाडला तर चालेल का?

 

अर्जुनाला युद्धभूमीत मार्ग दाखवणारा कृष्णा,

स्वतःच कुठे तरी भरकटला तर चालेल का?

 

शेरांवर बेहेत्तर शेर असलेली गझल लिहून,

त्यात शेवटी ‘यशवंत’ लिहीनं विसरला तर चालेल का?

 

– (१७जुलै२०१८)

Related Posts

Leave a Reply