चल बस, एक राऊंड मारून येऊ – सुहास मळेकर

मराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मित्रांपर्यंत पोहचवा

‘चल बस, एक राऊंड मारून येऊ’, म्हणत लेखक सुहास मळेकर आपलीला अशा जगात नेतात, जे जग आपल्या  आजूबाजूलाच आहे पण उघड्या डोळ्यांनी कधी आपण त्याकडे पहिलं नाही किंवा पाहण्याची तसदी घेतली नाही. अनेक साप्ताहिक, मासिकं व वृत्तपत्रातून ‘फोटो जर्नलिस्ट’ म्हणून काम करताना लेखक सुहास मळेकर यांना हे जग कधी कॅमेऱ्याच्या लेन्समधून दिसलं तर कधी लेन्सबाहेरून. छोट्या छोट्या कथांच्या माध्यमातून अगदी तरलपणे त्यांनी हे जग आणि अनुभव वाचकांसमोर उलगडले आहेत.

‘भूक’ या कथेमध्ये लेखकाने अशा एका कष्टकरी म्हाताऱ्याची व्यथा रेखाटली आहे, ज्याला आपणही कुठेतरी  कधीतरी नक्की बघितलं असणार. पंचवीस-तीस रुपये होते, म्हणून त्याने हॉटेलमध्ये येण्याचं धाडस केलं होतं. जमलंच तर वडा नाहीतर निदान थोडावेळ पानी पित हॉटेलमध्ये बसता येईल म्हणून त्या हॉटेलमध्ये तो आला होता. पण एखाद्या फाटक्या, गरीब माणसाकडे पाहून जशी प्रतिक्रिया बहुधा दिली जाते, तशीच तेथील वेटरने दिली आणि वडा तर दूर राहीला पण आयुष्यभर कष्ट करून साध्या हॉटेलमधला साधा चहाही त्या म्हाताऱ्या माणसाला परवडू  नये, या गोष्टीचं लेखकाला वैषम्य वाटलं. लेखकाने त्या म्हाताऱ्यासोबत शेवटी जेवण केलं; पण ते लिहितात,

‘एकीकडे पैसा संपत नाही म्हणून वाममार्गी उधळणारी अन् दुसरीकडे आयुष्यभर कष्ट करूनही वीतभर पोटासाठी वणवण करणारी माणसं आपल्याकडे रोज पाहावी लागतात तेव्हा पिळवटून जायला होतं.’

‘मॉडेल’ या कथेतील मॅनेजरही आपल्याला असा वेगळा दृष्टिकोण देतात. एका बँकेच्या प्रॉडक्ट ब्रोशरसाठी फोटोग्राफी करण्यासाठी लेखक गेले असताना बँकेत काम करतानाचे सुंदर फोटो कसे घेता येतील हे आर्ट डिरेक्टरसोबत  ठरवल्यावर त्यांनी बँकेच्या मॅनेजरला मॉडेल्सना बोलवायला सांगितले आणि ‘मुलींनो या’ असं म्हणत साठीच्या मॅनेजर साहेबांनी चाळीशी-पंचेचाळीशीच्या बँकेच्या कर्मचारी मुलींना बोलावलं. ‘फोटोशूट साठी या महिला मॉडेल्स?’ असं आर्टडिरेक्टरने विचारल्यावर मॅनेजर बोलले,

“याच मुली आमची ब्रँच चालवतात. आमच्या ग्राहकांसाठी त्याच मॉडेल आहेत.”

किती वेगळा विचार आहे हा.

त्याचसोबत ‘अदृश्य रेषा’ मधील निरागस किसन, ‘ग्लॅमर’ कथेतील जोशी, ‘पोचपावती’ कथेतील ‘आयडिया’, ‘शिक्षकांची काही तत्वे असतात’ या कथेतील दिग्या, ‘एक काळकुट्ट मुलगा’ मधील प्रभूबाई आणि इतर कथेतील अशा अनेक व्यक्तिरेखा कधी तुमच्या डोळ्यांत पानी आणतात तर कधी वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला भाग पाडतात. प्रस्ताविकेत भगवान निळे म्हणतात तसं,

‘दुर्लक्षित होऊ शकतात अशा सामान्य अनुभव आणि घटनांना सुहासने अधिक व्यापक व वाचनीय केले आहे.’

आणि खरंच, अतिशय तरल, साध्या, सोप्या भाषेत या लघुकथांमधुन लेखकाने मांडलेले अनुभव आपल्याला एक वेगळं भावविश्व दाखवतात जे अनुभवण्यासाठी हे पुस्तक एकदा वाचलंच पाहिजे.

आता हे पुस्तक किंडल स्वरूपात सवलतीमध्ये उपलब्ध आहे. 

_______________________________

ashwini survey

अश्विनी सुर्वे

अश्विनी लहानपणापासून वाचन वेडी आहे.. इतकी की भेळ खाल्लेला कागद सुद्धा तिने न वाचता फेकला नाही (अर्थात कचऱ्याच्या डब्यात)!

Facebook Profile

Instagram Profile


मराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मित्रांपर्यंत पोहचवा

Related Posts

 • Reply Pranjali May 11, 2021 at 1:02 pm

  मस्त 👌🏻👌🏻👌🏻

 • Reply Charusheela Agashe May 11, 2021 at 6:06 pm

  वा , नेहमीप्रमाणे छान परीक्षण. अगदी वेगळ्याच पुस्तकाची ओखळ करुन दिल्या बद्दल धन्यवाद . उपलब्ध आहे का बाजारात ?

 • Reply Shrisiddha Dhawale May 11, 2021 at 10:48 pm

  दोनच कथांचा परिचय इतका सुंदर करून दिला आहे की बाकीच्या कथा कशा असतील याविषयी उत्सुकता लागून राहिली आहे! 🙏

 • Leave a Reply

  Whatsapp करा
  1
  मदत हवी आहे?
  नमस्कार! यशवंतहो.com वर आपलं स्वागत!

  विविध पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी 7208-7272-36 हा मोबाईल क्रमांक कृपया सेव्ह करावा.
  Whatsapp Broadcaste द्वारे तुम्हाला सर्वात पहिली अपडेट मिळत राहील. त्यासाठी आम्हाला Whatsapp करा.

  चांगल्या पुस्तकांची ओळख तुमच्यापर्यंत पोहोचविण्यास आम्हाला आनंद होत आहे.
  वाचत रहा,
  धन्यवाद!