Category: कथा

  • भावासारखा मित्र

    भावासारखा मित्र

    ‘आज पण चार चपात्या! चंदूअण्णा, तुम्हाला नको बोललो ना! मी बनवतो की काहीतरी! कशाला उगाच वैनीला त्रास!’ ‘आरं, गप की बाबा! कसला तरास त्यात! ते काय जास्त हाय व्हय! चार चपात्या अन इतकुशी भाजी. तिला काय जड नाय जात!’ ‘आव्हो पण…’ ‘आरं बाबा, तिला नाय कसला तरास! ती सोताच मनापासनं दिती डबा. खा आता पटदिशी.…

  • खेळ

    खेळ

    सरका! सरकाss! बाजूला व्हा! वॉर्डबॉयचा जोरात आवाज आला. धावतच त्यांनी स्ट्रेचर आत आणलं. लोकं नाकावर हात ठेवतंच बाजूला झाली. पोलीस पण होते सोबत. रुग्णाला कॅज्युअल्टीमध्ये नेलं. त्याच्या साथीदाराला पेपर काढायला पाठवलं. लोकं कुजबुजायला लागले. ‘बुडाला होता वाटतं!’ ‘शीss बाई! कसला दारूचा भपकारा आला!’ ‘अजून वास येतोय!’ इतरांनी माना हलवल्या. नाकावर पुन्हा रुमाल धरले. एकाने विचारलं,…

  • आनंदाचा बाप्पा!

    आनंदाचा बाप्पा!

    बाप्पाला नवस केलेला. आमची नित्या आणि अणव! त्याचाच आशीर्वाद! जुळी भावंड. अतिशय गोड! खूप गुणी! अगदी नावासारखी. बाप्पा तर त्यांचा फेव्हरेट. अगदी, माय फ्रेंड गणेशा! 5 वर्षांचा नवस बोललेला. नंतर जमलं तर बघू. पण नाहीच जमलं. मागचं वर्ष शेवटचं. वर्षं कशी पटकन निघून गेली. कळलंच नाही. मुलं यावेळी एकदम शांत. आठवणीत हरवून गेलेली. त्यांना फार…

  • तिच्यासाठी वडापाव

    तिच्यासाठी वडापाव

    वडापाव. घरात सगळ्यांचा फेव्हरेट. तसं, पोरांना नाही एवढं कौतुक, पण माझ्या आठवणीतला मोठा हिस्सा. मुंबईत शिकायला आलो, तेव्हा कित्येक रात्री वडापाव वरच गेल्या. लहानपणीसुद्धा. दर बुधवारी वाट बघायचो. आई आठवड्याच्या बाजाराला जायची. घेवडा, उडीद, लसूण विकायला. तेवढेच चार पैसे जास्तीचे संसाराला. येताना हमखास वडापाव आणायची. लिंबाएवढा. पेपरात गुंडाळलेला. 2 रुपयाचा. प्रत्येकाला एक. चार भावंड. आमचं…

  • रव्याचा केक

    रव्याचा केक

    दहावीच्या निकालानंतर सई आठवते. दरवर्षी, न चुकता. माझा रिजल्ट तर मी कधीच विसरले. तसा कोणाच्या लक्षात राहण्यासारखा नव्हताच. आम्ही सामान्य, आमचा अभ्यास सामान्य, आणि रिजल्ट तर त्याहून सामान्य. असो, रात गई, बात गई.. कशाला जुन्या आठवणी. पण, ‘सई’ आठवते. मलाही आणि माझ्या आईलाही. आईला तर जरा जास्तच कौतुक तिचं… तशी होतीच ती. अभ्यासू, हुशार, शांत,…

  • वेगळं शिक्षण

    वेगळं शिक्षण

    कालच एक बातमी वाचली, ‘ऑनलाईन शिक्षणासाठी टॅब घेण्याची घरच्यांची परिस्थिती नसल्याने मुलाची आत्महत्या’… खूप सारे विचार, प्रश्न मनात येऊ लागले. आता या बातमीचा अँगल खरा की बनवलेला! ऑनलाइन शिक्षण चांगले की गरिबांवर अन्याय करणारे असे अनेक अभ्यासाचे आणि वादाचे मुद्दे होऊ शकतात, पण मला सर्वात आधी महानगरपालिकेच्या शाळेत नववीत शिकणारा ‘गणेश’ आठवला. मागच्या वर्षी करियरविषयक…

  • समस्या

    समस्या

    त्याला बघताच तिच्या कपाळावर आठ्या उमटायच्या. रोज कामावर आली, की पहिलं दर्शन त्याचंच व्हायचं. कधी कधी राणी सोबत असली, की कुजकट हसून तिला चिडवायची पण, “बघ, त्याने तुझ्यासाठी फुलांचा गालिचा अंथरलाय.” ते बघून तर तिचा पारा अजूनच चढायचा. त्यामुळेच तर तिचं काम अजून वाढत होतं. हे असं कधीपासून सुरू होतं ते तिला आठवतही नव्हतं; कदाचित…

  • राहून गेलेली साखरेची वाटी (लेखक-शेखर)

    राहून गेलेली साखरेची वाटी (लेखक-शेखर)

    सकाळची वेळ आणि साडे दहा वाजताची दारावरची डोर बेल हे गणित आता मला नित्यनियमाचं झालं होतं. दरवाजा उघडताच शक्य तेवढ्या दातांचे दर्शन देत एक स्मित (तशी पद्धत आहे म्हणून स्मित) हास्य आमच्या घरात शिरतं. साधारण साठी ओलांडलेलं; सतत टाळी मागणारं आणि आवाजाच्या पट्टीला सतत वरचा सा असलेलं हे व्यक्तिमत्त्व. ‘राणे आजी अहो! बेल वाजवून सोडून…

  • नाडीवर चालणार घड्याळ (लेखक – शेखर)

    नाडीवर चालणार घड्याळ (लेखक – शेखर)

    कॉर्पोरेट वाढदिवस, मेदू वड्याचा प्लान आणि माझा डाएट सर्व एकत्र जुळून आलं आणि आम्ही सर्व जण कॅन्टीनमध्ये जायला निघालो. उशिरा पोहचल्यावर पडणाऱ्या शिव्या टाळण्यासाठी पळत कॅन्टीन मध्ये आलो. नेहमी प्रमाणे संतोष परब टेबल पकडून बसलेला. बाकीची मंडळी अजून आली नव्हती म्हणून आमच्या नेहमीच्या गप्पा सुरु झाल्या. परब हा नेहमी अप टू डेट राहणारा पण आज…

  • जनहित में जारी : ब्रेकअप-के-बाद

    जनहित में जारी : ब्रेकअप-के-बाद

    त्या दिवशी ठाण्याच्या तलावपाळी शेजारी बऱ्याच दिवसांनी अन्विता भेटली. तिचा ब्रेकअप झाल्यापासूनची हि आमची पहिलीच भेट.. एरवी दुखीयारी असणारी ती सिंगल आत्मा आज जाम खुश दिसत होती.. सोबत ७ ८ मुलींचा घोळका सुद्धा होता. एकमेकींना जोर-जोरात टाळ्या देत पूर्ण फूटपाथ त्यांनी व्यापून टाकलं होतं. एक पोट धरून खाली बसून खिदळत होती, एक तोंडावर हात पकडून…